Skip to main content

खुप दिवस

Published on 30/07/2008 - 14:08 प्रकाशित मुखपृष्ठ
खुप दिवस झाले खर तर तुला भेटून वषा झाले असावे बहुतेक .. सगले कसा ठरवून केला होते मी ,,,,,स्वताच्या हाटटने ,,,तुला न भेटण्याची हत्ताही मझ्याचा ....सगले कसा मनाला समजावून.......पण तरी ही तुला विसरने जमात नही मला ..सगले कसा अवघड होते आहे .जम्यचाया पलीकडले...... परवाच तुझ्या बर्थडे होतो .खुप ठरवले ग्रीटिंग.ईमेल समस फ़ोन कही नही करयाच .......लक्षात नही कही असा दाखवायच .पण सगळा अथाव्दा तुझ्या बर्थडे ला क्या द्याच हा विचार करण्यात गेला.....शेवटी शेवटी तर एक ईमेल...एक ग्रीटिंग अणि फ़ोन यावर सेत्त्लेमेंट झाली काय बोल्याच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7460

धरणीकंप!!

Published on 30/07/2008 - 09:37 प्रकाशित मुखपृष्ठ
आज लॉस एंजेलिस परिसरात सकाळी ११.४० च्या सुमाराला धरणीकंप झाला.... आम्ही आपले रोजच्याप्रमाणे ८.३० ला ऑफिसात आलो होतो..... पुढ्यातल्या कामाचा आढावा घेतला...... त्यातील किती हाताखालच्या लोकांवर सोपवता येतील ती सोपवली..... अगदी स्वतःलाच करावी लागणारी कामं उरकून मिसळ्पाव उघडला....... जरा कुठे इस्ट्-कोस्ट वाल्यांचा मिपा कट्टा वाचून त्यावर एक खट्याळ प्रतिक्रिया लिहून एन्टर करतोय न करतोय तोच....... सगळी केबिन थरथरायला लागली...... प्रथम वाटलं की बिल्डींगमध्ये काहीतरी ड्रिलींगचं काम वगैरे चालू असेल......... पण मग माझी चाकं असलेली खुर्ची कंप्यूटरपासून लांब-लांब जाऊ लागली...... आम्ही नेहमी बूट का
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 21099

उन्हाळा-१ व २

Published on 30/07/2008 - 08:59 प्रकाशित मुखपृष्ठ
होळी पेटली, पुरणपोळी खाऊन दुसरया दिवशी ची धुळवड खेळून झाली कि कपाटा वरचा टेबल फॅन खाली यायचा. रविवारी दुपारी जेवल्यावर त्याच्या आवाजच्या लयीत आपसूकच डोळे मिटायाचे. पांगारा लाल सडा घालायचा अंगणात, त्याच्या मखमली पाकळ्या आणि स्वर्गिय रंग.. आहा, भर दुपारी डोळ्यातून मनात उतरत जायचा.त्याचा मधहि तितकाच अफलातून असला पहिजे, पोपट (काहि काहि वेळा जंगली राखाडी पोपटंचे थवेच्या थवे उतरायचे पांगार्याच्या झाडांवर) बुलबुल, हळद्या, मैना, कोतवाल, धनेश, भारद्वाज, कवड्या असलेच आणि आणखीही अद्भुत पक्षी तिथे जमायाचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2511

"कवडसा"

Published on 30/07/2008 - 00:56 प्रकाशित मुखपृष्ठ
खिडकीतूनी उतरे अलगद असा देई उजेडाचा वसा अंधारलेल्या खोलीला प्रकाशाचा एक कवडसा | गोल, शुभ्र, उजळसा धरती वरती चंद्र जसा अंधाराला छेदुनी आला प्रकाशाचा एक कवडसा | सप्तरंग सामावे कसा भूमिवरी ना दिसे ठसा तेजाचा तो मोहक तुकडा प्रकाशाचा एक कवडसा | अंधार निराशेचा असा दाटे फार मनी कसा उजळीत येई नवीन आशा प्रकाशाचा एक कवडसा |
लेखनविषय:

याद्या 2084

"ठेविले अनंते तैसेचि रहावे"

Published on 30/07/2008 - 00:13 प्रकाशित मुखपृष्ठ
अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही.कदाचित, "ठेविले अनंते तैसेचि रहावे." असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला. अनंत नाडकर्णी आमच्या समोरच्या कॉलनीत रहायचा.त्याची आमच्याशी ओळख वसंत सबनीसमुळे झाली.वसंत सबनीसचा हा मेहुणा. अनंता एम.कॉम होता.त्याला एका बॅंकेत सिनीयर मॅनेजरची नोकरी होती.त्याचं लग्न झालं होत आणि त्याला एक लहान मुलगा होता. अनंताला दोन तीन बहिणी होत्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1974

यु मी और 'हम'............

Published on 29/07/2008 - 21:06 प्रकाशित मुखपृष्ठ
सर्व वाचक मंडळीना नमस्कार. 'व्यक्ती आणि व्यक्ती'(२ भाग) व 'वाघ्या' या लिखाणानंतर आता थोडा काही वेगळ लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. आधीच्या प्रतिक्रिया वाचुनच हे लिखण करते आहे , म्हणुनच पुन्हा एकदा आपल्या प्रतिक्रियांची साथ हवी आहे. इतक्यातच काजोल आणि अजय देवगण यांचा ' यु मी और हम' पिक्चर बघीतला. तो कसा बनला आहे किंवा अभिनयाबद्दल मला नाही लिहायच हा पण त्याची 'कथा' मात्र मनात घर करुन गेली. 'alzimer'हा रोग झालेल्या एका स्त्री ला तिचा नवरा नव्हे ' जीवनसाथी' कसा आधार देतो ते यात दाखवले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6840

मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा.

Published on 29/07/2008 - 19:40 प्रकाशित मुखपृष्ठ
समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८. ०७ या दिवशी दुपारी ०४ ते ०७ या दरम्यान 'महाराष्ट्र साहित्य परिषद'च्या, माधवराव पटवर्धन, पुणे येथील सभागृहात 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे. कृपया या विषयात रुची आणि आवड असणाऱ्यांनी या कार्यक्रमात जरुर भाग घ्यावा. संपर्क : प्रा.

याद्या 7599

तुझे नि माझे मिटू दे अंतर

Published on 29/07/2008 - 18:33 प्रकाशित मुखपृष्ठ
दहनाभुमिवर फुले वहाया येशील ना तू माझ्या नंतर मधले सारे विरून जाऊ दे मिटून जाऊ दे आपुले अंतर अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन अश्रु तुझे ते प्रेम बोलतील पुन्हा स्मृतींचे मेघ दाटतील वेळ निघुनी असेल गेला पाचोळ्यावर पाउस ओला उगीच आपुल्या हट्टापायी हरवून बसलो जे काही क्षण पुन्हा परतुनी नाही यायचे किती बोलावा करा निमंत्रण हिशोब कसला झाले गेले आठवणींचे काहूर उरले रंग उडुनी गेला आता दोनच अश्रु जाता जाता असेच ना हे नेहमी होते वेळ जातो अन ओढ लागते तुटण्या आधी रेशीम धागे एकच पाउल येऊ मागे
लेखनविषय:

याद्या 2600
Taxonomy upgrade extras

तुझ्या गळा, माझ्या गळा..!

Published on 29/07/2008 - 15:24 प्रकाशित मुखपृष्ठ
तुझ्या गळा, माझ्या गळा, सीबीआय चौकशीच्या माळा. दाद मागायची कोणाला ? चला रे आता कोर्टात चला. तुज "पोटा", मज "मोक्का". आणखी "टाडा" कोणाला? लाज वाटते का तुम्हाला ? मला कुणाची, देशाला.
लेखनविषय:

याद्या 2231
Taxonomy upgrade extras

सोड्याची खिचडी

Published on 29/07/2008 - 15:22 प्रकाशित मुखपृष्ठ
श्रावण येण्यापुर्वी एक खास सी के पी पाककृती. साहित्य- ४ वाट्या तांदुळ, १ वाटी सोडे, २ चमचे हळद, ४ चमचे तिखट, मीठ, तेल, हींग, लिम्बु/ चिन्चेचा कोळ, २ बारीक चिरलेले कांदे,गरम मसाला, आले-लसुन पेस्ट ,लवंग्,दालचीनी, गरम पाणी, कोथिंबीर्,खवलेले खोबरे कृती- करण्यापुर्वी १/२ तास तान्दुळ धुवुन ठेवावेत व सोडे भिजत घालावेत. सोड्यांचे जरा छोटे तुकडे करुन घ्यावेत. त्यांना हळद, तिखट, मीठ, आले-लसुण पेस्ट, गरम मसाला ,मीठ लावुन लिंबु पिळुन वा चिन्चेचा कोळ घालुन १० मिनीटे ठेवावे. एका तव्यात तेल तापवुन त्यात हिन्ग व थोडा कांदा परतुन घ्यावा.

याद्या 7678