लोकायतचे सहर्ष स्वागत...!
राम राम मंडळी,
कालच पार पडलेल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहुरावर लोकायत डॉट कॉम हे मायमराठीतील एक नवे संकेतस्थळ स्थापन झाले आहे. मिसळपावचेच तांत्रिक सल्लागार श्री नीलकांत यांनी हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मी वैयक्तिकरित्या, तसेच समस्त मिसळपाव परिवारातर्फे नीलकांतचे व लोकायत डॉट कॉमचे सहर्ष स्वागत करतो. हे संकेतस्थळ संगणक, संगणकीय तंत्र, तसेच आंतरजाल इत्यादी विषयांवरील तांत्रिक माहितीच्या देवघेवीकरता स्थापन झालेले व त्याला वाहिलेले संकेतस्थळ आहे.
मिसळपाव