Skip to main content

महोत्सव महामातेचा: वैदर्भी महालक्ष्मी सण

लेखक वृषभ खोंडे यांनी शनिवार, 29/08/2026 14:11 या दिवशी प्रकाशित केले.

लहानपणी शाळेत जायच्या वयात वडिलांनी सरकारी लायब्ररी लावून दिली होती. त्यातून उत्तमोत्तम पुस्तके आणून वाचणे आणि त्यावर त्यांच्याशी साप्ताहिक चर्चा करणे असा एक शिरस्ता लावून दिला होता. ह्यावेळी ना. धो. ताम्हणकरांची पुस्तके हाती लागली होती. गोट्या, चिंगी, खडकावरला अंकुर ह्यांच्याशी ओळख झाली होती. ह्यात एक मजेशीर भाग वाचला होता, गोट्या त्याची बहीण आणि दादा वहिनी दिल्लीला दाबके नावाच्या एका गृहस्थांकडे जातात तेव्हा गौरी गणपतीचा सीझन असतो, दाबक्यांचा तरुण गोष्टीवेल्हाळ जावई आलेला असतो आणि त्याची गोट्याने उडवलेली भंबेरी असा काहीसा त्या कथा भागाचा प्लॉट होता. 

सूर्याचं विश्व

लेखक akshardas यांनी शुक्रवार, 28/08/2026 23:49 या दिवशी प्रकाशित केले.

दिवसभरातलं रणरणतं ऊन कमी केलं

मुलांना भेटायचं म्हणून रूप सौम्य केलं

 

घर जवळ येताच आठवणींच फुल फुललं

गोड आठवांनी ध्यान चक्क गुलाबी झालं

 

एरव्ही जो प्रखर जळजळता तप्त गोळा

डोळेभरून पाहावं अश्या दोनच त्या वेळा

 

आई म्हणाली किती तापलंय माझं बाळ

सुनबाई जरा गार पाण्याने अंघोळ घाल

 

कितीही जग गाजवलं तरी आईचा बाळ

भूमीच्या कुशीत क्षितिजावर शमला जाळ

 

आवरून झोपला तोच आली गोड उषा

बाबा खेळाची वेळ आता झोपतोस कसा

 

उशेसोबत बागडत केव्हाच सरली निशा

कॉकटेल लाउंज : जिंजर बग (Ginger Bug)

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 28/08/2026 09:50 या दिवशी प्रकाशित केले.

आज विकांत, पण कॉकटेल लाउंज मधे हे आजचे कॉकटेल नाही, तर पुढच्या अनेक ड्रिंक रेसिपींना जीवंतपणा देणारी एक भन्नाट गोष्ट, जिंजर बग!

नेपाळमधील महापूर निसर्गनिर्मित?

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 27/08/2026 10:10 या दिवशी प्रकाशित केले.

नेपाळमधील भोटेकोसी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे तांडव माजले आहे. शेकडो मृत्युमुखी पडले असून अजून काही शेकडोंचा संपर्क नाही. यात अनेक नेपाळी नागरिक व काही चिनी नागरिक आहेत. अनेक भारतीय नागरिक व परदेशी पर्यटक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक घरे, पूल संपूर्ण वाहून गेले आहेत.

ही नदी तिबेटच्या सीमेवरून नेपाळमध्ये प्रवेश करते. तिबेट चीनने बळकावला आहे. तेथील सीमेवर असलेले काही चिनी अधिकारी वाहून गेले आहेत.

 

भूकंप, भूस्खलन, हिमनद्यांचे वितळलेले पाणी, दरडी कोसळणे ही या महापुरामागील कारणे असावी असे सांगण्यात येत आहे.

दिवाळी अंक २०२६ : आता लिहायला घ्या!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 27/08/2026 08:15 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळी अजून जरा दूर आहे.

म्हणजे कॅलेंडरमध्ये दूर आहे. संपादक मंडळाच्या डोक्यात मात्र ती आतापासूनच सुरू झाली आहे. बाकी लोकांना दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, रांगोळी, नवीन कपडे असं काहीबाही दिसतं. संपादकांना रिकामी अनुक्रमणिका, शेवटच्या तारखेला एकदम येऊन आदळणारे व्यनि, ई मेल्स आणि “लेख जवळजवळ पूर्ण झाला आहे, आणखी दोन दिवस मिळतील का?” असे प्रश्न दिसायला लागतात.

म्हणून या वेळी जरा लवकरच हाका मारत आहोत.

तर, प्रथेनुसार यंदाही मिसळपाव दिवाळी अंक २०२६ साठी मिपाकर सदस्य आणि वाचक यांच्याकडून साहित्य मागवत आहोत.

यंदा कोणतीही खास थीम नाही. नकोच..!! खूप झाल्या थीम्स.

कर्वेतले दिवस ६: नवीन असाईनमेंटस, नवीन कौशल्यं आणि नवीन चेहरेसुद्धा

लेखक मार्गी यांनी बुधवार, 26/08/2026 22:11 या दिवशी प्रकाशित केले.

✪ दुसरं‌ वर्ष- समाज कार्य अध्ययनातला मुख्य टप्पा 

✪ कॉलेजच्या शिक्षणातलं सर्वोत्तम वर्ष 

✪ ग्राम विकासावरील फिल्ड वर्कची सुरूवात 

✪ अभ्यासासाठीचे नवीन विषय 

✪ सकाळी ९ वाजेपर्यंत रिपोर्ट पूर्ण करण्यातली मजा 

✪ स्टुडंट फोरमच्या मीटिंग्ज आणि कॉफी! 

✪ ज्युनिअर मित्र- मैत्रिणींसोबत मैत्री आणि असाईनमेंटस 

दुर्लक्षित इतिहास: मध्ययुगीन भारतातील काही क्रांतीकारी स्त्री-मूर्ती

लेखक माहितगार यांनी बुधवार, 26/08/2026 20:51 या दिवशी प्रकाशित केले.

विवीध धर्मांच्या मनुस्मृती, बायबल, कुराण ते  इतरही धर्मग्रंथातून  कळत न कळत स्त्री स्वातंत्र्यावर आलेल्या सर्वच मर्यादा स्पृहणीय होत्या  असे म्हणता येईल का? अशी साशंकता आजच्या आधुनिक काळात वाटणे स्वाभाविक आहे हे खरे.  पण हे धर्मग्रंथ अस्तीत्वात नसते तरी फैमिली प्लानींग सारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध नसलेल्या काळात आणि  एकुण असुरक्षीततेचे  प्रमाण अधिक असलेल्या ईतिहास पुर्व आणि ऐतिहासिक काळात धर्म ग्रंथांनी बंधने घातली नसती तरीही स्त्रीचे समानता आणि स्वातंत्र्य कितपत सोपे  राहिले असते?

एक मृत्यू प्रमाणपत्र, 'बारनिशी' आणि पुणेरी अनुभूती!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 26/08/2026 16:58 या दिवशी प्रकाशित केले.

 

जन्म असो वा मृत्यू प्रमाणपत्र, काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेल्या मूळ प्रतीच दाखल कराव्या लागतात. अर्ज दाखल करून सहसा त्या मिळतात देखील. वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रती संपत आल्यामुळे मी आधी जवळचे पालिका प्रभाग (क्षेत्रीय/वॉर्ड) कार्यालय गाठले; कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जवळच्याच प्रभाग कार्यालयातून सहज मिळाले होते. प्रभागातील कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम तेव्हाही पुणे शहराच्या सेंट्रलाईज्ड डेटाबेसशी संलग्न असावी असे वाटते. 

तुही रास कंची?

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 25/08/2026 22:42 या दिवशी प्रकाशित केले.

गंमत म्हणून काही प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची जन्मरास देत आहे. त्यांचे कर्तृत्व, स्वभाव यांचा व चंद्र राशीचा काही संबंध आहे का याचे स्वतःच विश्लेषण करून संबंध जोडता येईल. 

 

कदाचित काही मिपाकरांची जन्मरास त्यांच्या प्रतिसादांवरून ओळखता येईल. 

 

___________________

 

मेष - शरद पवार, रोनाल्ड रीगन, बिल क्लिंटन, पु. ल. देशपांडे, आशा भोसले, अमित शाह 

 

वृषभ - अनिल कुंबळे, सेहवाग, गांगुली 

 

कर्क - मनमोहनसिंग, लता मंगेशकर