Skip to main content

महामानवास अभिवादन!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 06/12/2010 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज ६ डिसेंबर. मुंबईतले यच्चयावत रस्ते दादरच्या दिशेने वाहत असतील. त्यात हौशे, नवशे, गवशे, चोर, संधिसाधू राजकारणी असे सगळेच असतील. तसे ते प्रत्येक उत्सवात असतातच. पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. त्यांच्या मनातील कृतज्ञतेची मी केवळ कल्पनाच करू शकतो.

फिफा विश्वचषक - २०१० : सांख्यिकी आणि गुणतक्ता

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 12/06/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो. मागे एका धाग्यावर आलेल्या सुचनेप्रमाणे स्पर्धेच्या रोजच्या सामन्यांच्या अद्ययावत निकाल, झालेले गोल्स, विजयी-पराभुत संघांच्या बदलत्या क्रमवारी आणि त्यानुसार पुढच्या फेरीसाठीच्या पात्रतेची शक्यता, मिळालेले एकुण गुण आदी बाबी ध्यानात घेऊन आम्ही एक तक्ता बनवला आहे. ह्या तक्त्यावर नजर टाकली तर सर्व आवश्यक माहिती "एका नजरेत" मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. तक्ता बनवताना शक्य तितकी अधिक माहिती तक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. हा तक्ता "रोज अद्ययावत होईल" .... !!! १.
विशेष

गणेशचतुर्थीला शुभारंभ!

लेखक सरपंच यांनी बुधवार, 12/09/2007 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, ह्या संकेतस्थळाचा शुभारंभ गणेशचतुर्थी, शनिवार दि १५ सप्टेंबर २००७ या शुभदिनापासून होत आहे! इच्छुक मंडळींनी तो पर्यंत सभासदत्व अवश्य घेऊन ठेवावे ही विनंती.. कळावे, आपले नम्र, मिसळपाव पंचायत समिती.

भगवद्गीते माते सुखसरिते भरिते,

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 12/09/2026 20:31 या दिवशी प्रकाशित केले.

भगवद्गीते माते ,सुखसरिते भरिते, 

सांभाळी आम्हासी, ज्ञानाच्या सरिते |

जयदेवी जयदेवी जय भगवती गीते 

पाळी अखंड आम्हा ज्ञानाच्या सरिते ||ध्रु||

रडता पडता घेते,  उचलुनी आम्हांतें,

जगताच्या संघर्षि, आत्मिक बळ देते |

जयदेवी जयदेवी जय भगवती गीते 

पाळी अखंड आम्हा, ज्ञानाच्या सरिते ||

कार्य करिता देते, मंत्र हा आम्हांतें

यत्न कसून करा , जरि त्यागुनि फलातें ||

जयदेवी जयदेवी जय भगवती गीते 

पाळी अखंड आम्हा, ज्ञानाच्या सरिते ||

कर्मी निष्कामाचे , गुज आम्हा दावी 

पैलतीरास जाण्या, नौका बनून पावी

काव्यरस

विवादी सूर : टेनिस कोर्टवरची युद्धगर्जना!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 12/09/2026 17:42 या दिवशी प्रकाशित केले.

गोष्ट थोडी पर्सनल आहे.. पण तुम्ही आपलीच लोकं आहात... म्हणून सांगतो. फक्त ह्यावरून माझ्याविषयी काही ग्रह करून घेऊ नका. नाही करणार तुम्ही - कारण तुमच्यापैकी अनेकांची पण हीच कथा असणार आहे. 

 

कर्वेतले दिवस ८: राजस्थानमधला अविस्मरणीय स्टडी टूअर

लेखक मार्गी यांनी शनिवार, 12/09/2026 12:37 या दिवशी प्रकाशित केले.

✪ संस्थांना भेटी, चर्चा, रात्री उशीरापर्यंत प्रश्नोत्तरं आणि गाणी! 

✪ प्रत्यक्ष काम करणार्‍या संस्था व कार्यकर्त्यांसोबत संवाद 

✪ एक सदस्यीय "वेळ पाळा समिती" 

✪ उदयपूरमधली शिक्षांतर संस्था- "स्वपथगामी" 

✪ दोन वर्षांमधल्या खडतर टप्प्याची सुरूवात 

✪ फिल्ड वर्कमधले अनुभव, गावं आणि शिकणं 

✪ प्लॅन ऑफ वर्कचा पाचवा ड्राफ्ट! 

मानवाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड (Turning point)

लेखक चामुंडराय यांनी गुरुवार, 10/09/2026 16:27 या दिवशी प्रकाशित केले.

 

नुकताच मानवजातीने एक महत्वाचा लोकसंख्याशास्त्रीय टप्पा ओलांडला आहे. मानवाच्या संपूर्ण इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे किंबहुना असे काही घडेल अशी कल्पना कधीही केली गेली नसेल.

वेदवाणी :मत्सर: वैयक्तिक अधोगतीपासून ते राष्ट्रीय प्रगतीच्या विरोधापर्यंत

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 10/09/2026 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी मनाच्या दुर्गुणांमध्ये ‘मत्सर’ (ईर्ष्या किंवा जळफळाट) हा सर्वात घातक विषारी विकार आहे. अथर्ववेदातील हा सूक्त मानवाला आत्मपरीक्षण करण्याचा आणि मत्सररूपी विकाराला मनात उमलताच मुळासकट उपटून नष्ट करण्याचा सखोल आध्यात्मिक व मानसिक संदेश देतो. वेद आपल्याला सावध करतात की, मत्सर इतरांचे वाईट करण्यापूर्वी स्वतः आपलीच आंतरिक शांती आणि सारासार विवेक भस्म करून टाकतो