Skip to main content

विद्यानंदा ! ओळख इथल्या आनंदी आनंदा !!

लेखक मारवा यांनी बुधवार, 09/09/2026 21:09 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या जो बापट यांनी ऐरणीवर आणलेला ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा आहे त्यावरुन विचार करतांना एक  मुख्य मुद्दा जाणवला आणि इतरही किरकोळ विचार मनात आले ते इथे मांडावेसे वाटतात. तर बघा गणेशोत्सवात गेल्या काही वर्षांपासुन एक नविन विशेष वर्ग निर्माण झालेला आहे.

सोनिया गांधी ह्यांचे संस्मरण (memoir) - Belonging

लेखक साहना यांनी बुधवार, 09/09/2026 12:38 या दिवशी प्रकाशित केले.

सोनिया गांधी ह्यांनी आपल्या आठवणी Belonging ह्या मथळ्याखाली प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेत Alfred A. Knopf हे प्रकाशक ह्या पुस्तकाच्या १००,००० प्रति प्रकाशित करणार आहे. भारतीय पुस्तक एवढ्या मोठया संख्येने अमेरिकेत उपलब्ध होण्याची हि कदाचित पहिलीच घटना असेल. Knof हे पेंग्विन* ह्या विख्यात प्रकाशनगृहाचा भाग आहे. मजेची गोष्ट म्हणजे पेंग्विन भारतांत सुद्धा हे पुस्तक प्रकाशित करणार होते पण संशयास्पद पद्धतीने त्यांनी अचानक माघार घेतली .त्यांच्या वकिलांनी हे पुस्तक भारतांत प्रकाशित करणे धोक्याचे ठरेल असा सल्ला म्हणे त्यांना दिला.

ऍडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध: सत्य आणि विपर्यास

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 08/09/2026 22:30 या दिवशी प्रकाशित केले.

✪ नाझी जर्मनी आणि युद्धासंदर्भातील वेगळी बाजू 

✪ भूगोलाबरोबर इतिहासातही वेगळं स्थान असलेला देश 

✪ आसुरी महत्त्वाकांक्षा असूनही एकही वसाहत नसलेला देश 

✪ लोकशाहीवादी देशांनी केलेली आक्रमणं, जुलुमशाही आणि छळ 

✪ महायुद्धाचा खरा सूत्रधार कोण? 

✪ रशियामध्ये जर्मनीचा पराभव होण्यामागचं वेगळं कारण 

✪ ब्रिटन व अमेरिकेचं नंतरच्या काळातलं वागणं 

गुडियाको गुंडे उठा ले गए!

लेखक निनाद यांनी मंगळवार, 08/09/2026 06:24 या दिवशी प्रकाशित केले.

काल एक व्हिडियो पाहण्यात आला तर तेथे आश्चर्य चकित करणारी माहिती मिळाली.

उत्तर प्रदेश आता देशातील एक प्रमुख डिफेन्स आणि एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग हब (संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र गा पै तुमच्या पासून प्रेरणा घेऊन हे लिहिले!) बनत आहे असे ऐकले.

कृष्णेला पडला प्रश्न?

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 07/09/2026 07:41 या दिवशी प्रकाशित केले.

कृष्ण मिळाला कौरवांना 
पांडव कसे जिंकणार 
धनानंदांच्या सेने पुढे
विद्यानंद कसे टिकणार?

तूनळीतून बाण सुटले
रिळांची मांदियाळी
कुणासाठी वाॅरंट सुटले,
कुणाला मिळाली नळी.

अंधाऱ्या गल्ली मधे
रोज पेटती मशाली
अजगर सुस्त पडले इथे
विद्यानंदाची वस्ती जळाली

कसले साम्राज्य आणी
कसला पाया?
ज्ञान,सत्य भरते पाणी
ज्यांच्या गाठी आफाट माया

वस्त्र फेडण्या अधीर कौरव
फितूर झाला कृष्णसखा,
कोण पुरवणार आता वस्त्रे 
कृष्णेला पडला प्रश्न असा?

 

कवी डी. जे. व्यास
 

समाज

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 06/09/2026 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
रूढींत गुंतला हा सगळा समाज आहे
काही न बदलणे हा इथला रिवाज आहे!
काव्यरस

कर्वेतले दिवस ७: गावांमधलं अविस्मरणीय फिल्ड वर्क

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 03/09/2026 22:03 या दिवशी प्रकाशित केले.

✪ पु‌ण्यातल्या मावळ, खेड आणि भोर तालुक्यातली गावं 

✪ निर्मल ग्राम पडताळणी समिती सदस्य म्हणून फिल्ड वर्क 

✪ गावातले पॉवर डायनॅमिक्स आणि महिला सहभाग 

✪ लातूरमध्ये रिसर्चसाठी माहिती संकलन 

✪ नांदेडमधल्या कावळगांवला भेट 

✪ स्थावर- जंगम मालमत्ता आणि कुत्रा! 

✪ परीक्षेच्या आधीची संध्याकाळ- अभ्यासाऐवजी "कोड बूक" 

हनुमान अंश

लेखक निनाद यांनी गुरुवार, 03/09/2026 16:42 या दिवशी प्रकाशित केले.

नीम करोली बाबा ज्यांना आपण प्रेमाने 'महाराज जी' म्हणतो हे विसाव्या शतकातील भारतातील एक महान आणि चमत्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उत्तर भारतात फिरून घालवले आणि उत्तराखंडमधील कैंची धाम येथे आपला प्रसिद्ध आश्रम स्थापन केला. बाबांची प्रभू हनुमानावर अथांग भक्ती होती. त्यांची निस्सीम भक्ती, नम्रता आणि सेवाभाव पाहून लाखो भक्त त्यांना 'हनुमान अंश' म्हणजेच हनुमानाचे रूप  मानतात.

हॉटेलची गोड, चविष्ट, सुगंधी, मनात दरवळणारी आणि मन तृप्त करणारी आठवण .....

लेखक psajid यांनी गुरुवार, 03/09/2026 15:26 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव कुटुंबातील सर्व कवी, लेखक, वाचक, समीक्षक मित्रांना नमस्कार आशा करतो कि तुम्ही सर्व मजेत आणि आनंदात असाल ! आज सुमारे नऊ वर्षानंतर (२०१७ नंतर) इथे मी तुम्हाला भेटायला आलोय खूप दिवसांपासून जेपी, अतिवास, पाषाणभेद, यशोधरा, सौंदाळा, पेठकर काका, प्यारे, आयुर्हित, पैसा, अतृप्त आत्मा, गवि, चौकटराजा, अर्धवटराव, मुक्त विहारी यांना मिसळपाव वर पुन्हा भेटायला उत्सुक होतो ; खास करून माझ्या सांगली जिल्ह्यातील गाववाले बलवडीचे कपिलमुनी, मिरजेचे बॅटमॅन हे अजून इथे सक्रिय आहेत का ? हे पण पहायचे होते.