Skip to main content

<अगणीत>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 22/10/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा... न सांगताही समजला असालच... अगणीत!
काव्यरस

((गणित))

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 22/10/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
अशा गणितांची प्रेरणा सांगायलाच हवी का? :? गच्च मीटिंगमध्ये शिरताना तो स्वतःशीच म्हणाला, "डॉक्यूमेंट्स, मॉडेल, पॉवरपॉइंट, स्प्रेडशीट, स्लाईड्स - सगळ्या, अपूर्ण की पूर्ण?" प्रेझेंटेशन जमेनासं झालं तेव्हा, टकल्यानं टाकलेला एक कटाक्ष पुढल्या वादळाची नांदी देणारा... *** लॅपटॉप बंद करुन क्यूबमध्ये परतताना टेबलवर पाहिलं त्यानं तेव्हा कागदाच्या ढिगातही त्याला 'त्याचं' अक्षर दिसलं... इंजिनिअर, आणि मॅनेजर या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... उंचावत मान त्यानं ती नोट वाचली तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती म्हणाली, "०/१०!" रचना : गणित चुकल्यानंतर २००८
काव्यरस

गणित!

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 22/10/2009 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द अरण्यात शिरताना हंस स्वतःशीच म्हणाला, "शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध - शून्य, अपूर्ण की पूर्ण?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, अंधुक फुटलेला एक हुंदका शून्याकडून पूर्णाकडे झेपावला... *** पंख आवरून उतरताना भूमीवर पाहिलं हंसानं तेव्हा 'शून्या'तही त्याला एक संख्या दिसली... दिसणं, आणि असणं या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... उंचावत श्वेत-धवल पंख एकाकी उड्डाण केलं तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती संख्या म्हणाली, "शून्य हेच तर पूर्ण!" रचना: केव्हातरी, २००८
काव्यरस

आयटीवर बोलू काही..!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 22/10/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
(संदीप - सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची क्षमा मागून) जरा मजेने, जरा खरोखर बोलू काही चला दोस्तहो, या आयटीवर बोलू काही उगाच गाजर ऑनसाईटचे दाखवित रहा तू गळले नाही प्रोजेक्ट तोवर बोलू काही पी एम. पाहून चॅटींगवर कुजबुजली पोरे पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही हवेहवेसे फ्लर्ट तुला जर हवेच आहे स्मार्ट देखण्या ट्रेनीबरोबर बोलू काही किती काळजी अप्रेजलची बघ रांगेतुन एप्रिल नाही तर ऑक्टोबर बोलू काही स्किल्स असू दे सीवीमध्ये काठी म्हणुनी रिसेशनचा प्रवास खडतर बोलू काही मूळ गीत - आयुष्यावर बोलू काही कवी - संदीप खरे
काव्यरस

प्लॉटच्या कर्जासाठी माहिती हवी आहे!

लेखक राजमुद्रा यांनी गुरुवार, 22/10/2009 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी PCMC हद्दीमध्ये प्लॉट पाहिला आहे. तो मला कर्ज क्कगून घ्यायचा आहे. पण त्या प्लॉटचे NA झालेले नाही. मला माहिती हवी आहे की NA नसताना मला कर्ज मिळेल का? मिळत असेल तर कुठल्या Bank मधून मिळेल? जर मी स्वतः NA करून घेतले तर किती खर्च येईल? कॄपया जाणकारांनी मदत करावी. यासंदर्भात कुणी जणकार असतील तर त्यांची मदत मिळाली तर बरे होईल. मदतीच्या अपेक्षेने वाट पाहणारी राजमुद्रा :)

पहा निकाल अपडेट

लेखक भोचक यांनी गुरुवार, 22/10/2009 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचं अपडेट येथे नकाशाद्वारे पहायला मिळेल. नकाशावर कर्सर नेल्यास राज्याची एकूण स्थिती कळेल. नकाशावर क्लिक केल्यास प्रत्येक मतदारसंघातील स्थिती कळेल. येथे टेक्स्ट व्ह्यू पहायला मिळेल.

महाराष्ट्रातील राजकारणाची कुंडली...

लेखक विकास यांनी गुरुवार, 22/10/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
अजून थोड्याच वेळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल लागणार आणि तमाम राजकारण्यांचा निकाल लागणार... तर अशा या निवडणूकीत म.टा. मधे म्हणल्याप्रमाणे आघाडीस इजा-बिजा-तिजाचे तर युतीस सत्तांतराचे वेध लागले आहेत.

स्क्रँबल्ड फ्रेंच टोस्ट

लेखक प्रभो यांनी बुधवार, 21/10/2009 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्क्रँबल्ड एग्स (मसाला कमी असलेली / नसलेली अंडा भुर्जी) व फ्रेंच टोस्ट आपण नेहमी खातोच.....