दिवाळी २००९
म्हणतात ना दुखःवाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो.
आता काही लिहीन म्हणतो.
[मास्तर चतुरंग यांची प्रेरणा आणि मुळ लेखकाची क्षमा मागून]
वाचन खूप झाले, आता लिहीन म्हणतो.
आडून प्रतिसादाच्या गंभीर लिहीन म्हणतो
पेन खिशातला हा मी काढणार आहे
जे जे दिसेल ते ते सारे लिहीन म्हणतो.
बरेच प्रतिसाद आहे मी उधळलेले या जागी
आहेत विचार डोक्यात जे इथे लिहीन म्हणतो
दिवाळी अंकातून मी निर्दोष आज सुटलो ?
(लेख लिहिण्याचा कोणीच आग्रह केला नाही :( )
शब्द शब्द जमा करुन काही लिहीन म्हणतो
सारेच सिद्धहस्त लेखक, ना साधा इथे कोणी
नसलो मोठा तरिही आता लिहीन म्हणतो.
ती टीका नव्हती सदस्य
दिवाळी किल्ला - किल्ले सिंधुदुर्ग !!
दिवाळी म्हणले की लहानमुलांना फटाके, नवीन कपडे, फराळाचे पदार्थ याचबरोबर उत्सूकता असते ती किल्ला बनवण्याची. आजच्या फ्लॅट संस्कृतीतही आपल्याकडे मातीचे किल्ले तयार केले जात आहेत हे विशेष.
काही ठिकाणी ( पुणे , मुंबईकडे ) तयार किल्ले विकत घेण्याकडे कल ( काही अपवाद वगळता) वाढायला लागला आहे. जागेची उपलब्धता हे त्यामगचे मुख्य कारण असावे. पण तरीही तयार किल्ले बनवण्यातली मजा काही वेगळीच.दिवाळीत सांगलीला गेलो असता माझ्या भाच्यांनी ( चि. आदित्य ओगले, चि. श्रीराम ओगले) केलेला हा सिंधुदुर्ग किल्ला.
(सुज रंग)
ह्या काव्याचे हे एक मुक्त स्वरुप-
लालसर झाल्या त्या जागा
जेथे डासा रे तू मला चावला
उडत ये तसाच गुणगुणूनी
आजच तू या संध्याकाळी...
टायर, डबे, घाण अंगणी
त्यात पाणी थोडे ठेवूनी
तुझिया स्वागताची तयारी
जय्यत करोनी ठेविली...
डोक्यावर तेल लावून,
बसले मी ओट्यावरी
गुणगुण तुझी ऐकूनी
कांती माझी आसुसली...
टचकन तुझी सोंड खूपसुनी
पी हे माझे रक्त लवकरी,
सांग मित्र-सग्या-सोयऱ्यांना...
अधीर ही तनू बावरी..
खाजवू ती चाव्यजागा,
मजाच त्याची निराळी
तुझ्या चाव्यांच्या खूणा घेऊनी
सुज्जित बाला दिसे निराळी...
तुझ्या असंख्य डोळ्यातूनी
ऊडून पहा खालती
लाललालती सुजगर्विता
स
काव्यरस
'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो
आंतरजालावर दिवाळी फराळ चालू असताना ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले!
काव्यरस
डार्विनच्या अनुयायींनो ह्या प्रश्नांची उत्तरे द्या
आधीच सांगते की, डार्विनचा सिद्धांत मला पटलेला नाही व दिशाभूल करणारा आहे.
माणूस जर माकडापासून उत्क्रांत झाला आहे तर हे असे कसे?-
१. माकडात आणि मानवाच्या गुणसुत्रांमधे फक्त २ टक्क्यांचाच फरक आहे असे तुम्ही म्हणता. म्हणजे मानव हा माकडाची सुधारीत आवृत्ती आहे असे तुमचे म्हणणे जर असेल तर प्राणी उत्क्रांत होतांना तो निसर्गाच्या जवळ न राहता दूर कसा जाईल?
- माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते
- माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो?
आठवणींतले दिवस
२५-३० वर्षांमागचे ते दिवस आजही तसेच आठवतात. सुट्टी लागली की दुसर्या दिवशी गावी पळायचो, मग ती दिवाळीची असो, गणपतीची वा मे महिन्याची. सुदैवाने आजोळ पण याच गावात, अगदी चार उंबर्या पल्याड आईच माहेर. आईच्या माहेरचा गोतावळा मोठ्ठा. आईला पाच सख्खे काका आणि एक आत्या. त्यासगळ्यांना किमान ४ मुलं. आता इतक्या मावश्या आणि मामांची मुलं सगळी जमलो की नुसता कल्ला व्हायचा. काही जणांची आजोळं वेगळ्या गावी असल्याने त्यांची सुट्टी विभागली जायची. पण मी आणि बहिण या बाबतित भाग्यवान. प्रत्येक सुट्टीच अस वेगवेगळ वैशिष्ठ्य आसायच. निसर्गाने पण मुक्तहस्ताने उधळण केली आहे माझ्या गावावर.
बुजगावणं
जुईली श्रीहरी ढवळीकर.
खरतरं मला नुसतं 'जुई' म्हटलेलच आवडते. तो 'ली' नकोच होता सोबत. पण आहे तो आहे. करणार काय ?
आई म्हणते, 'कित्या उगाच तोंड वाकडा करतस. इतरांची नावं बघ काय असतत. त्यामानान तुजा बरा हा...... आणि ताही काय जास्त दिवस रवाचा नाय. उद्या लगीन झाल्यार घो बदलतोलो.'
मी तर ठरवलय. लग्नानंतर नवर्याला सांगून तो 'ली' काढायचा आणि....... सॉरी....
खरचं सॉरी... हे माझं नेहमीच असं होतं. वाहावत जाते बोलताना.... विषय माझा नव्हताच मुळी. तशी मी आहे म्हणा या विषयात. पण खरा विषय आहे काकांचा. पद्माकर ढवळीकरांचा. माझे सख्खे काका. त्यांच्याबद्दलच सांगायचय. पण त्या आधी एक महत्त्वाचं.
'गिरी' वाद
त्यांनी आयुष्यभर गांधीवाद जोपासला....
....असं ते म्हणतात.
त्यांना 'गांधीगिरी' भावली नाही.
आम्ही म्ह्टल, " तुमचा विरोध नक्की कशाला ? "
तुम्ही उभं आयुष्य 'गांधीं'च्या मागे
'वाद' लावून जगलात.
पण वादाने प्रश्न सुटत नाहीत......
..
...
आम्ही त्यांच्या मागे 'गिरी' उभा करतोय.
आधी लोकांना हिमालयाची भव्यता दिसू दे...
मग गंगेचे फायदे हळू हळु कळतीलच...............
काव्यरस
मिसळपाव