समृद्धीची रास, घरोघरी...
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे ऐन दिवाळीतले १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे आठ दिवस देशात `सोनियाचे दिन' होते... दिवाळीच्या दिवसांना सोन्याची झळाळी आली आणि मंदीचे सावट त्यात पुरते झाकोळून गेले.
गेल्या वर्षीपर्यंत,दिवाळीच्या दिवसांची चाहूल लागताच, कामगारांच्या `बोनस'च्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरून जायचे.
यंदा त्या बातम्या दिसल्याच नाहीत... त्या बातम्यांची जागा नव्या बातम्यांनी घेतली.
दिवस खरंच बदललेत काय?
दिवाळीचे दिवस यंदा सोन्याच्या विक्रीच्या दृष्टीने खासच लक्षणीय राहिले. यंदा या दिवसात लोकांनी तब्बल ५६ टन सोने खरेदी केले.
मिसळपाव