Skip to main content

वस्त्र विणताना..

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 12/10/2021 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
वस्त्र विणताना, मन धागा गुंफताना..हवा रंगांचा कोमल बाज, गहिवर स्पर्श साज! रेशीम पाण्याची धार, त्यात चंद्राची साद.. अलगद सांडलेले, प्राजक्त देठ सहवास.. चोचीत धरलेले, आकाश मोतियाचे भास! वाऱ्याची मंगल गुज, हिरवळ मखमल पाऊल वाट.. सागराची तुफान गाज, मातीवर रेंगाळलेली वेडी लाट! -भक्ती

कारपोरेटातली विंग्रजी

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 12/10/2021 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी मूलतः गाढव आहे, चुकुन मनुष्य योनीत आलो असे वाटते. गाढवपणा फक्त रक्तात नाही तर मांसल पेशींच्या रंध्रारंध्रापर्यंत पोहचलेला आहे. असे हे गाढव आयटीत चिकटले म्हणून त्याचा तेनालीराम होत नाही. माझ्या सोबतीची मंडळी सुद्धा गाढव असावीत असा माझा समज होता. आम्हा गाढवांमधे एक सुंदर, हुषार मुलगी होती. बऱ्याच मंडळींना त्या कारणाने आमचा हेवा वाटायचा. आम्ही लिनक्सवर काम करीत होतो. ती डिस्ट्रो, रेडहॅट, डेबियन अशा माझ्यासारख्या गाढवांना न समजनाऱ्या भाषेत बोलत होती. मला ती मुलगी जादुगार वाटत होती. काहीतरी टाईप करायची दोन सेकंदात सार गायब, परत काहीतरी टाईप करायची तर धडधड सारी अक्षरे वर जात होती.

अवघाचि संसार-हिंदळे

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 11/10/2021 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
अहो ऐकलंत का? नुकतीच घरच्या देवाची पूजाअर्चा करून , ग्राम दैवत असलेल्या कालभैरवाच्या देवळात जाण्यासाठी तयार होत असलेल्या हरभटांना पत्नी भागीरथी बाइंची हाक कानी आली.नुकते कुठे झुंजू मुंजु झाले होते. सगळीकडे शांतता होती. नाही म्हणायला गोठयातल्या गायींच्या गळ्यातील बारीक घुंगरांचा, विहिरीवरील पाणी शेंदायचा, कोंबडा आरवल्याचा, रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या बैल गाडीच्या चाकांचा ,असे काही परिचित आवाज येत होते. पण हिंदळ्यासारख्या गावंढ्या गावात असून असून वर्दळ ती कितीशी असणार? कोकणातल्या कोणत्याही गावासारखे एक साधे सुधे गाव. समुद्र किनारा थोडका लांबच , त्या पेक्षा खाडी जवळ.

***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 10/10/2021 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
*******

मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता.

क्वाण्टम जम्प

लेखक सतीश रावले यांनी रविवार, 10/10/2021 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
1 . क्वाण्टम जम्प ................. काळाचा प्रवाह बदल घडवत असतो, बदल स्वीकारायला भाग पाडत असतो.

प्रोपगंडा (Propaganda)

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 09/10/2021 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
a {text-decoration:none;} body { font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size: 16px; } .quoted {font-size: 16px;}

प्रोपगंडा (Propaganda)

आई

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 09/10/2021 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज आई जाऊन ७ वर्ष झाली. आठवणींच्या कालातीत लाटा मात्र निरंतर किनारा शोधत असतात. आई-काका (वडिलांना मी काका नावाने संबोधतो) हैदराबादला पहिल्यांदा आल्यानंतर स्टेशनवर पहाटे साडेचार वाजता आमची वाट पाहत होते तो क्षण आठवतोय. माझ्या नोकरीतील पुढचं पाऊल, आमचं हैदराबादला राहायला येणं, आई-काकांना आनंदाने आणि अभिमानाने खूप काही सांगायची, दाखवायची उत्सुकता हे सर्व मनात घेऊन पत्नी आणि मी त्या दोघांना घेण्यासाठी पहाटे स्टेशनवर गेलो होतो. आम्ही शहरात फिरायला गेल्यावर बागेतील एका झाडाखाली फोटो घेताना खूप आनंदी होते दोघं. आयुष्यात प्रथमच एवढा आनंद, आणि समाधान होतं त्यांच्या चेहऱ्यावर.