Skip to main content

ध्रांगध्रा - ६

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 05/01/2022 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
महेशला इतक्यावर्षात कितीतरी वेळा शेकहॅंड केला असेल. पण त्याचा स्पर्ष असा कधीच जाणवला नव्हता. त्याच्या हाताचा आधार घेऊन मी उठतो. या वेळेस स्पर्ष मघासारखा नाही. हा स्पर्ष नेहमीसारखाच आहे. शक्य आहे मघाशी चक्कर येत होती. त्यामुळे तसे वाटले असेल. आम्ही उभे राहिलो. समोर एक विलक्षण देखावा दिसतोय. मागील दुवा ध्रांगध्रा - ५ http://misalpav.com/node/49735 पायवाट जिथे वळतेय त्या बाजुने अक्षरशः मोठी परात असावी तसा तांबुस पांढरा पूर्ण चंद्र वर येतोय.डोंगराचा कोपरा , थोडीशी वळणारी वाट आणि त्या मागे पूर्ण गोलाकार चंद्रबिंब. एखाद्या पोस्तरवर सोभेल असं दृष्य.

सिंधूताई सपकाळ

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 05/01/2022 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
अनाथांची एक माय आता राहिली नाय जाता सिंधू सपकाळ गहिवरला खूप काळ असंख्य अन्याय साहिले अपमानांचे धग दाहिले मग मागे नाही पाहिले उपेक्षितांना आयुष्य वाहिले जग वंदू वा नि नींदू होते निराधार जे हिंडू झाली करुणा-सिंधू अनाथाची मान बिंदू एके दिसी दारावर कोण? ना चिट्ठी नाही फोन लिन -दीन ते डोळे दोन पती पापाचे फिटे ना लोन ज्याने केले निराधार उन्मत्त होता जो भ्रतार त्याचाही केला उद्धार विकलांगा दिला आधार झाली जितेपणीच आख्यायिका राखेतून उठता समाज नायिका कीर्ती झाली गुणगान गायिका गौरवू त्या अनाथ आधारदायिका
काव्यरस

गुडबाय ब्लॅकबेरी १०

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 04/01/2022 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
३० जानेवारी २०१३: न्यू यॉर्क, टोरांटो, लंडन, पॅरिस, दुबई, जोहान्सबर्ग, जकार्ता व नवी दिल्ली येथे दिमाखदार सोहळ्यांद्वारे रिसर्च इन मोशन कंपनीच्या नव्या फोन ऑपरेटिंग सिस्टम ( ब्लॅकबेरी १०) व दोन नव्या फोन्सच्या लॉन्च इव्हेंटचा दिमाखदार सोहळा झाला.

ध्रांगध्रा - ५

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 04/01/2022 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार होत चाललाय. त्याही अवस्थेत मी वर पहातो. सुर्याला एका काळ्या मातकट ढगाने झाकून टाकलंय. उजेड संपत चाललाय. जाणवण्यासारख्या दोनच गोष्टी. माझ्या मनगटावरची घट्ट होत जाणारी महेशची "पकड" आणि अंधार...... मागील दुवा ध्रांगध्रा - ४ http://misalpav.com/node/49734 आ......ह. कुणीतरी टाळूवर थेट हातोडीने हाणलं असावं असं दुखतय डोकं. मी डोक्याला मागे हात लावतो. बोटाला काहितरी ओलसर चिकट लागतं. अरे बापरे. हे काय....... रक्त! माझे डोके दगडावर आपटलं. मागच्या बाजूला खोक पडली आहे. आजूबाजूला अंधारच दिसतोय. माझ्या बाजूला कसलंसं मुटकुळं पडलंय.......