Skip to main content

डोळ्यांनी फळे खावित का?

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 30/09/2021 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे: फळे ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते.

गुरुजींचे पालकांना पत्र

लेखक भम्पक यांनी मंगळवार, 28/09/2021 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय पालक, सगळीच मुलं पुढे जाऊन डॉकटर, इंजिनिअर बनत नाहीत.प्रत्येकाच्या वकुबाने प्रत्येक जण तसा बनतो.आणि हो डॉकटर,इंजिनिअर बनणे हे काही यशस्वीतेचा मापदंड नाही.कळेल पुढे पोरांना.पण त्यांना चांगला माणूस घडवूया आपण.आम्ही तर आहोतच,परंतु तो तुमचे अनुकरण करणार आहे त्यामुळे तुम्ही सावध असा.या चार भिंतीत आम्ही जगाचे शिक्षण देऊच त्याला,परंतु तुमचा सहभाग हा त्यात सिंहाचा वाटा असेल. हा समाज प्रत्येक घटकाचा बनलेला आहे, प्रत्येक घटक हा त्याच्या उपयुक्तते प्रमाणे महत्वाचा आहे.म्हणजे अगदी खालच्या पातळीवरचाही मनुष्य तेवढाच महत्वाचा आहे जेवढा वरिष्ठ पातळी वरचा.आपण हे त्याला बिंबवूया.म्हणजे तो प्रत्येकाचा आदर

अजून दरवळतो सुगंध

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 28/09/2021 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
विजय तेंडुलकरांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणाऱ्या ‘अ-जून तेंडुलकर’ या पुस्तकाचा वाचकांना यापूर्वी इथे परिचय करून दिला आहे. त्या पुस्तकात सुमारे पंचवीस नामवंतांनी तेंडुलकरांच्या विपुल साहित्याचा परामर्श घेतला आहे. ‘तें’नी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांपैकी त्यांचे सदरलेखन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या प्रकारच्या लेखनाचा मी चाहता आहे. अशा लेखनापैकी ‘कोवळी उन्हे’ हे पुस्तक माझे भलतेच आवडते आहे. याच धर्तीवर ‘तें’चे अजून एक पुस्तक म्हणजे ‘रातराणी’.

समुद्र..

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 28/09/2021 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र ,सागर नजर टाकावी  तिथपर्यंत अथांग असतो.म्हणूनच तो मला कायम खुणावतो. सागर किनारा अलवार लाटांच घर असतं.कधी त्या दुडू दुडू अवखळपणे धावत येतात बिलगतात त्या किनाऱ्याला,तर कधी उंच उंच होत जोरात धडकतात.. पटकन किनारी मोकळ्या होतात.