ध्रांगध्रा - ४
जिंदगी का क्या पता .. राहे किस ओर मुडेंगी.
हाल हो ... बेहाल हो ....चलना अपना काम है...
मागील दुवा ध्रांगध्रा-३ http://misalpav.com/node/49727
गाणे गुणगुणायला सुरवात कोणी केली ते सांगता येणं कठीण आहे. पण आम्ही दोघेही तेच गाणं गुणगुणतोय. इतका वेळ ती चढणीची वाटणारी वाट आता तितकीशी चढणीची वाटत नाहिय्ये.डोंगरात चालताना ती गोष्टीत असते तशी दाट झाडी तशीही नव्हतीच तुरळक एखादे झाड दिसायचे तेही आता नव्हते.
पायाखाली येऊन घसरायला होणारे गवत आता जवळजवळ नाहिसे झालंय. पायवात निसरडी नाही पण मुरुमाड धुळीची झालीये..
मिसळपाव