Skip to main content

फ्रॅक्टल्स

लेखक केदार भिडे यांनी शनिवार, 30/10/2021 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी चौथीत असताना माझ्याकडे एक पुस्तक होते. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा आणि मुलगी हे एक पुस्तक हातात घेतलेले दाखवले होते. त्यांच्या हातात दाखवलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ तसे कोरेच होते. पण मी काहीतरी चित्र काढावे म्हणून त्या मुलांच्या हातातल्या कोऱ्या पुस्तकावर अजून एक मुलगा मुलगी काढले. अर्थात, त्या छोट्या जागेत मावतील असे आणि माझ्या चित्रकलेप्रमाणेच. महत्वाचे म्हणजे त्या मुलांच्या हातात मी पुन्हा तसेच एक पुस्तक दाखवले. तेव्हा मी काही फार पुढे विचार केला नाही.

वाईन

लेखक श्रीगणेशा यांनी गुरुवार, 28/10/2021 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
(कधीही मद्य प्रकाराच्या वाटेला न गेलेल्या श्री व सौ मधील हा संवाद!) सौ: मला एकदा वाईन घ्यायचीच आहे. आपण दोघे मिळून एकदा एखादी बाटली घेऊच. वाईन मुळे स्किन चांगली राहते असं वाचलं आहे मी. श्री: वाईन? आणि आपण दोघे? काहीही. तुला इथे thums up घेताना चार वेळा ठसका लागतो. तू काय वाईन घेणार? सौ: वाटलच होतं. नकारात्मकता पुरेपूर भरली आहे तुमच्यात. आणि मला तुम्ही नेहमी कमी समजता. श्री: अगं, तसं नाही. आपल्याला अभ्यास करावा लागेल खूप. मद्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक पेयामधे अल्कोहोलचं प्रमाण वेगळं. प्रत्येकाची चव वेगळी. खूप अभ्यास करून निर्णय घेऊयात.

गुढे पाचगणी पठार - सांगली जिल्यातील मिनी महाबळेश्वर

लेखक व्लॉगर पाटील यांनी गुरुवार, 28/10/2021 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुढे पाचगणी पठार - सांगली जिल्यातील मिनी महाबळेश्वर ठिकाण - गुढे पाचगणी पठार जायचा रस्ता - पुणे - कराड - मलकापूर - तळमावले - गुढे - १८५ किमी सांगली - इस्लामपूर - पेठ नका - मलकापूर - तळमावले - गुढे - ९२ किमी नवीन bike घेतल्यानंतर पहिल्या सफारी साठी कुठे जायचा प्लॅन सुरु होता . सुरुवात करायची तर आपल्या गावाकडूनच म्हणून Bike Riding साठी काही ठिकाणी शोधण्यास सुरवात केली. मग समोर आलं ते सांगली जिल्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे एक पर्यटन स्थळ - गुढे पाचगणी पठार. सांगली जिल्यात सहयाद्रीची डोंगर रांग हि शिराळा तालुक्यातच आहे, त्यामुळे या भागात पर्यटनासाठी भरपूर ठिकाणे आहेत .

रुक्मिणी-अनय संवाद

लेखक मिडास यांनी बुधवार, 27/10/2021 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ कोजागिरीच्या मध्यरात्री वृन्दावनातल्या सळसळत्या पिंपळ वृक्षाखाली रुक्मिणी वाट बघत होती. काही अंतरावर कालिंदी आपल्याच नादात वाहत होती. त्या मंजुळ नादात रुक्मिणी काही वेळ रमली सुद्धा असेल. पण हे मान्य करायची तिची तयारी मात्र नव्हती. लोक म्हणत हिमासारखी शुभ्र अशी ती नदी कृष्णाच्या सावळ्या रंगात रंगून कालिंदी झाली. आज पौर्णिमेच्या मध्यान्हाला चंद्र कालिंदीवर चांदणं शिंपडून तिला पूर्वीच्या रूपाची आठवण करून देत होता. पण तिचं ते रुपडं बघायला रुक्मिणीशिवाय तिथे कुणीच नव्हतं. जिथे पाहावं तिथे रुक्मिणीला कृष्णाच्या नाना लीळांच्या खुणा जाणवत होत्या.

माझी पुस्तकं

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 26/10/2021 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. माझी बरीच पुस्तकं आता Amazon, Flipkart, Book Ganga वर उपलब्ध असल्याचं प्रकाशकांकडून कळवण्यात आलं आहे. पैकी या वर्षी प्रकाशित झालेल्या चार पुस्तकांपैकी एखादं पुस्तक प्रकाशकाकडून ऑन लाईन मागवलं तर पूर्ण पुस्तकाची Instant कॉपीही आपल्या मोबाईलवर तात्काळ उपलब्ध होते. (Buy the Print Book & get the access to read Instantly.

लैंगिक वाङ्मय : स्वानुभव आणि स्थित्यंतरे

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 26/10/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
.img1 { float: left; width:50%; margin-right:15px; margin-top:32px; } .img2 { float: right; margin-left:15px; width:50%; margin-top:32px; } लैंगिक आकर्षण आणि शरीरसंबंध हा एक मूलभूत मानवी गुणधर्म आहे. वयात येण्याच्या दरम्यान जे काही शारीरिक बदल घडतात त्यातून हे आकर्षण निर्माण होते. हा लेख स्वानुभवकथन असल्यामुळे फक्त भिन्नलिंगी आकर्षण या दृष्टिकोनातून लिहिला आहे. साधारणतः कॉलेज शिक्षणादरम्यानच्या वयात तरुणांमध्ये स्त्रीदेहाबद्दलची ओढ तीव्र होत असते. त्यावेळेस प्रत्यक्ष स्त्री-सहवास आणि शरीरसंबंध या गोष्टी तशा दूर असतात.

वाडा

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 25/10/2021 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती || इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे || कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली || सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली || फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी || आता वाडा असा एकटा सोबत नाही कोणी सोबती मंदिरामध्ये कुणी अनामिक चार दों फुलें वाहुनी जाती || बाकी सारे बेवारस अन कुणीच न
काव्यरस

मी एकटी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 24/10/2021 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
तांबडा का तो चंद्र नभीचा का न असे नेहमीचा चंदेरी ओळख असूनी अनोळखी प्रित लपवीत रागावली स्वारी फुले कळ्या घेवून पाने मी एकटी उभी कधीची वाट पाहूनी रात्र संपली पहाट उजाडली नभाची - पाषाणभेद २४/१०/२०२१
काव्यरस

सांजरंग

लेखक चांदणशेला यांनी रविवार, 24/10/2021 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
किरणांची पाऊले मिटून हळूच गेली उन्हे परतून पाखरांचा सूर सांजपंखी हुरहुर राहिली उरी रेंगाळून निळ्या नभी ढगांची रांग उभी तांबूस रंग गेला त्यात भरून घरट्यात किलबिल पडे काजळी भूल दिशा साऱ्या गेला हरवून रातराणीचा गंध झाल्या वाटा धुंद पसरले माथ्यावर चांदण्याचे रान
काव्यरस