फोटो १

फोटो २

[[साइटवरचे लसान्या पाकृचे किंवा उल्लेख आलेले अगोदरचे धागे
Veg Lasagna /Lasagne |
माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ५-रोम |
काँबीनात्सिऑन | ]]
हल्ली हे लसान्या ( lasagna) वगैरे इतालिअन पदार्थ लोकप्रिय होत आहेत. थोड्याच वर्षांत समारंभाच्या जेवणातही येतील.
'Easy lasagna recipe' search केल्यास बरीच माहिती मिळते.
तर पाककृती थोडक्यात -
१) टोमाटो,लसुण,कांदा हे मिक्सरमध्ये वाटून नंतर तेलावर थोडा परतून सॉस करणे.
२) तीन रंगांच्या भोपळी मिरचा,मशरुम(असल्यास) चिरून ठेवणे. त्यात उकडलेले मक्याचे दाणे मिसळून थोडेसे परतून ठेवणे.
क्रमांक (१) आणि (२) चार पाच तास अगोदर तयार करून ठेवता येतात.
३)व्हाईट सॉस तयार करणे.
४) पावाच्या स्लाईसेस कडा कापून लाटून घेणे. बाजारात ज्या तयार लसान्या पट्ट्या मिळतात त्याऐवजी पाव वापरला.
क्रमांक (३) आणि (४) आयत्या वेळी करायचे.
एका मोठ्या पातेल्यात तळाला एक इंच वाळूचा थर घालायचा आणि रिंग ठेवून त्यावर गोल भांडे अथवा चौकोनी ट्रे ठेवल्यावर तो खालच्या वाळूला टेकायला नको. वाळू घालून मोठे पातेले तापवायला ठेवायचे. तोपर्यंत लसान्या भरायला घेणे.
फोटो ३
अवन साहित्य

छोट्या भांड्यात ( अथवा ट्रेमध्ये) तळाला थोडा टोमाटो सॉस पसरून त्यावर ब्रेड स्लाईस ठेवणे.त्यावर भाज्या, व्हाईट सॉस, चीजचे थर मग परत एक स्लाईस,परत थर आणि वर एक स्लाईस आणि चीज पसरायचे. गोल भांड्यात चार रकाने किंवा ट्रेमध्ये दोन बसतात.
इकडे तापलेल्या वाळूचा हाताने धग पाहून लसान्या आत रिंगवर ठेवून पातेले वरतून झाकायचे. मध्यम उष्णता ठेवून वीस मिनिटांत वरचे चीज वितळले की ग्यास बंद करून लसान्या काढून घेणे.
बिना लसान्या पट्ट्या आणि अवनचा पदार्थ तयार.

वाचने
10126
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
पदार्थ भारी दिसत आहे
नक्की .
In reply to पदार्थ भारी दिसत आहे by मुक्त विहारि
भारी आणि नाविन्यपूर्ण पाककृती
वेगळाच पदार्थ ! मदनबाण.....
मदनबाण.....
फोटो दिसत नाहीयेत पण छानच
फोटो इथे पाहा -
In reply to फोटो दिसत नाहीयेत पण छानच by नचिकेत जवखेडकर
फोटो २
घरगुती ओव्हन कसा बनवावा यावर
ट्रायल करून जमते.
अवन म्हणजे की एका बंद ठिकाणी उष्णता धरून राहायला पाहिजे. त्यात पदार्थ ठेवला की पदार्थाचे वाढते आणि भट्टीचे कमी होते. नंतर एक ठराविक तापमान म्हणजे साधारणपणे १८० डिग्री ठेवले वीस मिनिटे की पदार्थ त्यातल्याच पाण्याने शिजतो. नंतर पाणी आटल्यावर भाजून जळू लागतो तेव्हा बाहेर काढला पाहिजे. हात वरती धरून धग किती आहे हा अंदाज येतो. आंघोळीचे पाणी - 60 अंश उकळते पाणी - 100 पोळी भाजतो - 150 तेलात तळणे -180 केक भाजणे - 180 शेंगदाणे भाजणे - 220 पदार्थ जळणे - 250 च्यापेक्षा अधिक 300- 350. इथे मोठ्या पातेल्यात खाली वाळू घालून वर झाकण ठेवून तापवून घ्यायचे. यावेळी Gas मोठा ठेवला तरी चालतो. मग पदार्थ त्या लहान भांड्यात घालून ते आतमध्ये वाळूवर ठेवायचे. एका तिवई/जाळीवर असे ठेवायचे की तळ वाळूला टेकायला नको. मग Gas मध्यम किंवा बारीक ठेवायचा . पंधरा मिनिटांनी आणि नंतर पाच पाच मिनिटांनी केक,पाव वगैरे कच्चा आहे का शिजला हे तपासायचे. दोन तीन प्रयोगांत हे अवन प्रकरण यशस्वी होते. आपली गरज असेल तसे मोठे पातेले घेतले की काम होते. घरगुती वापरासाठी एवढे पुरेसे आहे. इतालिअन पदार्थांत चीज वितळले की पदार्थ तयार झाला. प्रथम रवा,मैदा,पीठ यातले पाणी आटते. त्यानंतर तापमान शंभरच्यावर जाऊ लागते. मग चीज वितळते. दोन चार ट्रायल करावी मग सेट होते. समजा दुप्पट प्रमाणात पदार्थ हवा आहे तर ते सर्व दुप्पट घेऊन केल्यास फसणार. कारण भांडे, त्यातला पदार्थ आणि बाहेरचे अवन म्हणून वापरायचे भांडे हे दुप्पट होत नाही. त्या वेळी दोन batch काढाव्या.
धन्यवाद .. ज्यांचं कडे ओव्हन
दोन्ही अवनसमध्ये फायदे तोटे आहेत.
In reply to धन्यवाद .. ज्यांचं कडे ओव्हन by चौकस२१२
इलेक्ट्रीकवाला ठराविक आकारात
ओके.
In reply to इलेक्ट्रीकवाला ठराविक आकारात by चौकस२१२