Skip to main content

पंजाबी चिकन करी

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 10/01/2011 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
कालच केली होती ही चिकन करी. सगळे तुडुंब जेवले आणि मग ४ तास झोप ताणून दिली. आणि संडे साजरा झाला! असो. हि चिकन करी करायला जरा जास्त वेळ लागतो म्हणजे bachelor चिकन करी एवढी सोपी कृती नाहीये कारण ह्यात मसाला वाटून घ्यायला लागतो. पण डेफिनेटली वर्थ द एफर्ट!

बायको : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 10/01/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
बायको : नागपुरी तडका थोडीशी पगली, थोडीशी सायको देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥१॥ सलवार घाल म्हनलं तं नववारी घालते कपाळाच्या मंधामंधी गोल कुंकू लावते टिकल्या-मिकल्या लावाच्या फ़ंदात पडत नाही गळ्यामंधी गुंजीभर सोनं मिरवत नाही थोडशी येडपट, थोडीशी सायको देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥२॥ सिनेमा पाहू म्हनलं तं भागवतात जाते माह्यासाठी मुठभर शिरनी घेऊन येते मास-मच्छी-अंडीले हात लावत नाही तरी बाप्प्पा तीले काही देव पावत नाही थोडीशी भोळसट, थोडीशी सायको देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥३॥ सार्‍यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते कवाकवा पानी पिऊन तशीच झोपी जाते सड

स्त्री-मुक्तीची एक दुर्लक्षित बाजू

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 10/01/2011 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच पुण्याच्या सकाळने एक स्त्री-मुक्तीवर नैमित्तीक-रुदन-पुरवणि काढली होती. त्यात अनेक प्रभृतीनी भुई धोपटली होती. ते वाचून माझ्या डोक्यात एक विचार आला की समजा परमेश्वराने प्रसन्न होऊन समस्त स्त्री जातीस मुक्त होण्याची irrevocable guarantee दिली तर काय काय व्हायला हवे? मुख्य म्हणजे समता दर्शक कल्पना / रुढी निर्माण व्हायला हव्यात. सध्या स्त्री-मुक्ती प्रामुख्याने चूलीपासून मुक्ती मिळवण्यात घुटमळत आहे. समाजाच्या काही थरात हे काही प्रमाणात शक्य झाले आहे (आम्ही त्या थरात येतो!). आमच्या घरात मी अशाच एका पुरुषप्रधान रुढीचे उच्चाटन करण्यासाठी एका समांतर रुढीची स्थापना करायचा प्रयत्न करत आहे.

नाना पाटेकर

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 10/01/2011 05:35 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/lokprabha/20110114/metkut.htm नाना पाटेकर नुकताच ६० वर्षे वयाचा झाला. (पण तो ९० चा झाला तरी नाना पाटेकरच रहाणार. नानासाहेब वगैरे लिहिवत नाही.) शिरीष कणेकरांचा त्याच्यावरचा एक फर्मास लेख. नाना हा एक उत्तम अभिनेता आहे ह्याविषयी कुणाच्या मनात संदेह असू नये. त्याचबरोबर भीडभाड न बाळगता बिन्धास आपले मत रोखठोक मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्याची प्रसिद्धी आहे. एक अस्सल मराठी गडी. मोठमोठी भाषणे न ठोकता कृतीने आपले मराठीपण ठासून मांडणारा हा एक मराठी माणूस म्हणूनही मला याचे कौतुक वाटते.

'बार्डसाँग्ज' - पौर्वात्य तत्त्वज्ञानाचं आख्यान

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 10/01/2011 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
Bardsongs - Poster 'बार्डसाँग्ज' हा सँडर फ्रँकेन या एका डच दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. तो घडतो मात्र गरीब देशांत. यात तीन कथा आहेत. एक राजस्थानमध्ये घडते; एक आफ्रिकेत माली या देशात, तर एक लडाखमध्ये घडते. तिन्ही कथांना लोककथांचा बाज आहे. हिंदू, मुस्लिम आणि बौध्द अशा तीन धर्मांच्या व्यक्तिरेखा यात केंद्रस्थानी दिसतात. तिन्ही कथा पौर्वात्य तत्त्वज्ञान उलगडणार्‍या बोधकथा म्हणता येतील अशा आहेत. पौर्वात्य देशांतल्या मौखिक, गीतकथनपरंपरेच्या शैलीनुसार, त्या त्या भौगोलिक परंपरेनुसार संगीत वापरून गोष्ट पुढे नेली जाते.

साळुंकी

लेखक विकास यांनी रविवार, 09/01/2011 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
(फोटोशॉप वगैरे) संस्करणविरहीत छायाचित्र. 1600×1065 pixels – 135KB ISO: 100 Exposure: 1/160 sec Aperture: 9.0 Focal Length: 200mm Latitude: 17.550000° N Longitude: 74.333333° E

विकांताची खादाडी : डाल तडका

लेखक सुहास.. यांनी रविवार, 09/01/2011 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : तुरडाळ जिरे-मोहरी कांदा टमाटे लाल मिरची मसाला हडळ...आपल हे...हळद कडीपत्ता कोंथबीर प्रमाण स्वताच ठरवायचे आहे. कृती : १ ) तुरडाळ शिजवुन घ्या . मी कुकर वापरला. (एक शिट्टी !) २) शिजेपर्यंत कांदा-टमाटे कापुन घ्या ३) कढईत आधी तेल टाका, मोहरी आणि जिरे तड-तड वाजायला लागले की चिरलेला कांदा टाका. ४) कांदा चांगला हलवुन घ्या. लाल झाला पाहिजे.

कथा गाजराच्या हलव्याची

लेखक यकु यांनी रविवार, 09/01/2011 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
हा गाजराचा हलवा अगदी स्पेशल आहे. यात अनेक प्रकारचे अनुभव मिळतील, त्यामुळे ही पाककृती काळजीपूर्वक वाचावी. आज काही काम नव्हतं आणि घरीही कुणी नव्हतं. सहज चहा प्यायला बाहेर पडलो तर बाजारात लालबुंद गाजरं विकायला आलेली दिसली. शेजारीच काजू, बदाम, किसमीस वगैरे ड्रायफ्रूटही विकायला ठेवले होते. गाजराचा हलवा करून पाहाण्याची चांगलीच संधी होती. मग एक किलो गाजरं, प्रत्येकी पन्नास ग्रॅम काजू, किसमीस आणि बदाम आणि साताठ विलायची, लिटरभर दूध असं जय्यत सामान घेऊन घरी आलो. गाजराचा हलवा आजपर्यंत कितीही वेळा खाल्ला असला तरी, प्रत्यक्ष करून पाहाण्याची पहिलीच वेळ होती.

एकटेपण...!

लेखक जयवी यांनी रविवार, 09/01/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाला सगळ्यात जास्त भिती कशाची वाटत असेल …..मरणाची ?? अं हं……चुकलात…. !! अहो… एकटेपणाची. बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो पण एकटं राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो. किंबहुना ह्या गोष्टीचा तो विचार करणंही टाळतो. कधी कधी गोंधळ, गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूर पर्यंत कोणीच दिसायला नको, जवळ असायला नको. एकांत हवा. पण एकांत आणि एकटेपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत सुद्धा काही वेळापुरताच हवासा वाटतो. नंतर त्या एकांताचं रुपांतर एकटेपणात होतं आणि मग तो नकोसा होतो. लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं शिवाय आई, बाबा सुद्धा हवे असतात.

माहिति पाहिजे

लेखक अनिल आपटे यांनी रविवार, 09/01/2011 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
खालील शब्दाचा अर्थ काय ? श्रीवरा = संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांची पहिली भेट कुठे झाली? कृपया मार्गदर्शन करावे अनिल आपटे