Skip to main content

पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन

लेखक दीविरा यांनी रविवार, 09/01/2011 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन समस्त मिपाकर मायबाप, लेखनाचा पहिलाच प्रयास आहे,कृपया सांभाळून घेणे. साहित्य: १. स्वछ तुकडे पापलेटाचे हवे असतील तितके. २. लसूण आवडीनुसार. ३. आले आवडीनुसार. ४. लाल तीखट आवडीनुसार. ५. हळद चीमुटभर. ६. लिंबू. ७. गरम मसाला आवडीनुसार. ८. पिठ तांदळाचे लागेल तेवढे ९. तेल तळन्या पुरते. १०.मीठ चवीप्रामाणे. कृती: प्रथम मासा धुऊन घेणे. मग त्याला साहित्यातिल सगळे(तांदळाचे पिठ सोडुन) ईतर सगळे चोळून ठेवणे १०-१५ मीनिटस. मग तांदळाचे पिठ एका ताटात घ्या आणि त्यात पीसेस घोळवून तव्यात तळुन घेणे. फीश करी. साहित्य: १. नारळ १/२ २. लसुण ३-४ पाकळी. ३.

ऍबल कॉन एला

लेखक निनाद यांनी रविवार, 09/01/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट कथा - वय सुचवणी १५ + साठी ऍबल कॉन एला Hable con ella (इंग्रजी मध्ये - टॉक टू हर.) बेनिनो आणि मार्को एका नृत्य नाटिकेमध्ये शेजारी शेजारी बसतात. बेनिनो मार्कोला पाहतो आणि एका प्रसंगामुळे त्याच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून तो त्याच्या लक्षात राहून जातो. बेनिनो हा पेशाने नर्स आहे आणि तो एका इस्पितळात काम करतो. त्याची अनेक वर्षे आजारी असलेली आई नुकतीच वारली आहे. या इस्पितळात बॅले नृत्य करणारी सुंदर तरुणी ऍलिशिया, अपघातात कोमात गेल्याने बेशुद्ध आहे. बेनीनी तीची सुशृषा करतो आहे. बेनीनी तिच्या प्रेमात पडलेला आहे.

भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील

लेखक भीडस्त यांनी रविवार, 09/01/2011 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना आमच्या वर्गात भावड्या नावाचा वर्गमित्र होता. भावड्या पायर्‍या पार करत करत आमच्या वर्गात पोहोचता झाला नव्हता तर एकाच पायरीवर अंमळ जास्तच रेंगाळल्याने स्वारी आमच्या बरोबर वर्गात दाखल झाली होती. त्यामुळे भावड्या इतर वर्ग सोबत्यांपेक्षा थोराडच दिसे. वर्ण देखील महाराष्ट्र देशीच्या उन्हातान्हात तापल्याने चांगलाच रापलेला. भरीत भर म्हणून त्या अनगढ वयातल्या आम्हा सगळ्या १२-१३ वर्षीय मित्रांसाठी भावड्या म्हणजे सर्वज्ञ असे. त्याच्या पोतडीतले किस्से म्हणजे अलिबाबाची गुहाच जणू. तर असा हा आमचा भावड्या आमच्या वर्गात असताना, त्या एका वर्षात त्याने उडवलेली ही काही धमाल.

'पझल' – मध्यमवयीन स्त्रीचा ‘स्व’शोध

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 09/01/2011 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
पझल (२००९) – दिग्दर्शिका: नातालिआ स्मर्नॉफ (अर्जेंटिना) Rompecabezas - Film Poster चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एका घरात पार्टी चालू असते. घरची गृहिणी झटत असते. स्वयंपाकघरातून तऱ्हतऱ्हेचे पदार्थ आणून घरातल्यांची आणि पाहुण्यांची सरबराई करत असते. हळूहळू लक्षात येतं की खुद्द तिचाच वाढदिवस साजरा करायला लोक जमले आहेत. पण तिला मात्र आराम नाही.

गोलमाल कटलेट

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 08/01/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
हि पाककृती म्हणजे एक 'classified' सिक्रेट आहे. पण आत्ता पर्यंत हे कटलेट एवढ्या लोकांनी आवडीने खाल्ले आहे कि आता ह्याचं गुपित सांगायला काहीच हरकत नाहीये. हि पाककृती म्हणजे एक saviour आहे. उ.दा. गेला पूर्ण आठवडा आमच्या कडे पाहुणे आणि रिलेटेड फिस्ट चालू आहे. रोज केलेल्या पदार्थातून काही न काही थोड्या फार प्रमाणात उरतं. आणि मग अचानक फ्रीज मधली सगळी जागा गायब होते. अश्या वेळी, हे गोलमाल कटलेट एक उत्तम ब्रेकफास्ट किंवा उपाहार ऑप्शन ठरतं.

घरकाम/बालसंगोपन व जीडीपी

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 08/01/2011 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी आपल्या मनात एखादा विचार रुंजी घालत असतो. आणि कर्मधर्मसंयोगाने तोच विचार मांडणारं किंवा निदान त्याचा उल्लेख तरी करणारं पुस्तक हाती येतं. मग वाटतं की हा, आपला विचार अगदीच चुकीचा नव्हता. किंवा आपल्या आधी निदान काही लोकांनी तरी या दृष्टीकोनातून या विशिष्ट प्रश्नाकडे बघितलं आहे. घरकाम हे जीडीपी* मध्ये कसं मोजतात? किंवा मोजतात का? याबाबत विचार करताना माझं असंच झालं. 'बाईमाणूस' हे उत्तम पुस्तक नुकतंच हाती आलं. (बाईमाणूस या वाचनीय पुस्तकाविषयी हा लेख नाही. पण ते वाचायच्या काही दिवसच आधी माझ्या मनात या प्रश्नाविषयी विचार चालू होता.) त्यात करुणा गोखलेंनी स्त्रीमुक्ती चळवळीचा आढावा घेतलेला आहे.

परा आणि धमु

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 08/01/2011 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
'रामदासांचा अर्थबोध' या धाग्यात लिहिलं होतं - "पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत." अशी आणि ही या दोन शब्दांतील अंतर दूर झाले आहे. ;) 'सामना'च्या 'फुलोरा'मध्ये आज मिपाचे दोन वीर झळकले आहेत. परिकथेतील राजकुमार - प्रसाद ताम्हणकर. धमाल मुलगा - कैवल्य देशमुख. पराने लिहिलंय ते दहावी-बारावीची तयारी या विषयावर वेबविश्वात काय चालतं याविषयी, तर धमुने लिहिलं आहे दुबईच्या 'गोल्ड सूक'विषयी. फुलोरावर क्लिक करा. दोघांचेही लेख वाचा. दोघांचेही अभिनंदन.