हॉम राँग
हॉम राँग The Overture
हॉम राँग हा चित्रपट एका थाई 'रनत एक' (उच्चार योग्य आहे का ते कळवणे, रनाड् असाही उच्चार ऐकल्या सारखे वाटले!) संगीतकाराच्या आयुष्याचा प्रवास उलगडतो. चित्रपटाचा काळ सुमारे १८८० ते १९४०.
सॉर्न हा संगीताची उपजत देणगी आणि समज असलेला मुलगा आहे. परंतु त्याच्या भावाचा संगीताच्या नादातून वाद आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला रनत एक संगीत वाद्यांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो चोरून एक पडक्या बुद्ध मंदीरात या रनत एक या वाद्याची आराधना करतो.
मिसळपाव
