Skip to main content

मस्त थंडी घट्ट बर्फाळलेली ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 11/01/2011 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी मस्त थंडी घट्ट बर्फाळलेली पहाटे पहाटे धुक्यात कालवलेली घरांचे फक्त आकार दिसत असतात भुतासारखे भुताचे कान डोळे तुटके हात अर्धवट ..कसेबसे तसे घरांचे अवशेष भासत असतात धुक्यात हरवलेले स्वप्नात हरवून जातात पाखरांचे थवे पाखरांचे आवाज थिजून जातात घट्ट मिटून बसतात झाडापानात मन त्यांचे कावरे बावरे .. झाडे स्वतातच मग्न ध्यान लावून बसतात काही झाडे ओकीबोकी पाने झडून टक्क बावरतात कोणीतरी दूरवरून कवडसा पाडावा तसा सूर्याचा गर्भ कोवळा प्रकाश गुदगुल्या करीत अंगावर उगाचच कुरवाळीत राहतो थंडीच्या जाणीवेचा उगाचच वाढत जातो अहंकार शेकोट्या पेटल्या जातात पेटवल्या जातात ह
काव्यरस

मदत हवी आहे.

लेखक चिप्लुन्कर यांनी मंगळवार, 11/01/2011 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टम वर काम करू इच्छित आहे. त्या संदर्भात माझे ज्ञान शून्य आहे. त्या संदर्भातील शिक्षण मला ठाणे किंवा डोंबिवली मध्ये कोठे मिळू शकते? आणि साधारण त्यात खर्च , वेळ किती लागेल व कोणता नवा कोर्स आला आहे याची माहिती हवी आहे. आपला चिपळूणकर.

मासे १९) खुबे

लेखक जागु यांनी मंगळवार, 11/01/2011 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
खुबे हे खाडीच्या दलदलीत (चिखलात) सापडतात. खुबे पकडण्यासाठी खुबे पकडणारी माणस लाकडी फळी घेउन चिखलात उतरतात. फळीवर गुडगे ठेउन फळीचा आधार घेउन हे खुबे गोळा केले जातात. ह्या खुब्यांची शिंपली सारखी पांढरी शिंपली आपल्याला समुद्र किनारी सापडतात. कदाचीत ते समुद्रातील खुबे असतील. त्याच्या बाहुल्या, तोरणे बाजारात मिळतात. दलदलीच्या ह्या टाकलेल्या शिंपल्यांना आम्ही लहानपणी भातुकलीच्या खेळात चुल करण्यासाठी घ्यायचो. तसेच भांड म्हणूनही खेळ करायचो. तिन शिंपल्या तिन टोकांना एकत्र लावुन ह्याची चुल करायची व वरती एक शिंपलि भांड म्हणून ठेवायची.

क्षणभर विश्रांती

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 11/01/2011 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
परवा 'क्षणभर विश्रांती' हा एक सुंदर मराठी चित्रपट बघण्यात आला. चित्रपटाला खरेतर खूप आकर्षक कथा वगैरे आहे अशातला भाग नाही, उलट ह्या चित्रपटाची कथा साधी सरळ आणि सहज उलगडत जाणारी आहे.

१२७ अवर्स

लेखक सेरेपी यांनी मंगळवार, 11/01/2011 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राने काही दिवसांपूर्वी अचानक विचारलं, '१२७ अवर्स' च्या प्रायवेट स्क्रीनिंगचे पासेस आहेत. मला जायला जमणार नाही, तुला जायचं असेल तर सांग'. त्या क्षणापर्यंत मला हि काय भानगड आहे पत्ता नव्हता. तशी मी काही फार 'मूव्ही बफ' वगैरे म्हणण्यासारखी नाही, पण एका कंटाळवाण्या संध्याकाळी कोणी फुकट पास देत असेल तर नाही का म्हणा? म्हटलं दे. तर संध्याकाळी घाईघाईने थेटरात. कसला चित्रपट, कोणाचा काही माहित नव्हतं. शेवटी २-३ मिनिटं उशिराने पळत पळत जाऊन बसलो.

दुधी हलवा (खर्रा-खुर्रा )

लेखक गणपा यांनी मंगळवार, 11/01/2011 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
काल कलादालनात दुधी हलव्यावरुन एक पांचट विनोद केला. काही दर्दी मिपाकरांनी निषेधही नोंदवला. सर्वप्रथम त्या बद्दल सर्वांची माफी मागतो. त्या दुष्कृत्याच ( म्हणजे मी केलेल्या विनोदाच.... त्यांच्या निषेधाच नव्हे) प्रायश्चित्त घ्याव, अस मनापासुन वाटु लागल.

‘मेजॉरिटी’ - बहुमतात सामील होण्याचं प्रशिक्षण

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 11/01/2011 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
Majority - poster आफ्रिकन, मध्यपूर्वेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या चित्रपटांमध्ये अनेकदा भारतीय संस्कृतीसारख्या संवेदना किंवा आस्थाविषय दिसतात. त्यामुळेच कधीकधी आपल्या समस्या या त्यांच्याही झालेल्या दिसतात. 'मेजॉरिटी' या तुर्की चित्रपटाच्या बाबतीत असंच झालं. मर्तकान या तरुण मुलाची ही गोष्ट आहे. आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात ते त्याला हळूहळू सामील करून घेत आहेत. मित्रांबरोबर भटकणं, गाड्या उडवणं, पब/डिस्कोमध्ये जाऊन यथेच्छ 'एन्जॉय' करणं असा त्याचा दिनक्रम आहे.

...

लेखक अभिषेक९ यांनी सोमवार, 10/01/2011 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे पान कोरे-करकरीत आहे, अगदी पांढरे शुभ्र .... इतके की पेन टेकवायची पण भय... कदाचित त्याचे सौंदर्यच नष्ट होईल... मागची पाने गच्च आहेत आहेत असंख्य रंग लाल, पिवळा, निळा, भगवा गडद्द आहे, गुलाबीपण आहे ... पण फिक्कट.. आहेत अनेक अक्षरे काना, मात्रा, अनुस्वार सगळे सुष्पष्ट आहे, जोडाक्षरेही आहेत... पण खोडलेली... आहेत आकडे पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आहेत, भागाकारही आहे...
काव्यरस