Skip to main content

स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार

लेखक चित्रा यांनी सोमवार, 10/01/2011 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
पाश्चिमात्य तसेच भारतातील स्त्रीमुक्तीवादी चळवळींचा माझा अभ्यास नाही, हे या लहानशा लेखाच्या प्रारंभीच सांगून टाकते. तेव्हा या लेखात जे काही आहे, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणांमधून आले आहे, त्यात माझे अनुभव जेव्हा कधीतरी स्त्रीमुक्तीवादी लेखिकांच्या स्त्री किंवा मिळून सार्‍याजणी सारख्या मासिकांमधून ज्या कथा/कादंबर्‍या किंवा लेख हाती लागले त्यांच्याशी आपोआप जोडले गेले, कधी त्यात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी जे काही समान पाहिले त्यामधून ही मते कधी टोकदार तर कधी बोथट होत गेली.

केतकीच्या बनी तिथे..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 10/01/2011 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
केतकीच्या बनी तिथे... (कृपया येथे ऐका)
१९७०-७५ चा काळ असावा तो. किंवा ७०चं दशक म्हणुया. संध्याकाळी पावणे सात की सात वाजता आकाशवाणी मुंबई 'ब' वर केवळ १५ मिनिटांचाच मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागायचा. त्यात हे गाणं अगदी हटकून ऐकायला मिळायचं.

गुळाची पोळी........

लेखक निवेदिता-ताई यांनी सोमवार, 10/01/2011 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य--- एक वाटी बेसन पिठ, एक ते दीड वाटी रिफ़ाईंड, पांढरे तिळ एक वाटी, गुळ चांगला पिवळा दोन ते अडीच वाट्या, वेलदोडा पुड एक चमचा,तांदूळ पिठी. पारीसाठी- एक वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक,चिमुटभर मिठ, एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालुन पिठ घट्ट भिजवुन ठेवा.

हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी

लेखक रुपाली प्रा॑जळे यांनी सोमवार, 10/01/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
८ ते १० कचोरी साठी साहित्य : १. हिरवी तुरीची दाणे २ वाट्या २. हिरवी मिर्ची ३ ते ४ ३. जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार) ४. तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार) ५. मैदा २५० ग्राम ६. खाण्याचा सोडा चिमुट्भर ७. तिळ १ टिस्पुन ८. तेल तळण्याकरीता कृती : १. हिरवी तुरीची दाणे व हिरवी मिर्ची मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावीत. २. त्यामधे तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार) व जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार) घालुन मिक्स करा. ३. मैद्यात मिठ,चिमुट्भर खाण्याचा सोडा ,तिळ, २ टिस्पुन गरम तेल घालुन मळावे. ४. मैद्याचे छोटे गोळे करुन पुरीसारखे लाटुन घ्यावे. ५.

दुधी हलवा

लेखक गणपा यांनी सोमवार, 10/01/2011 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
नुसते बघता काय करा हात लांब आणि दुधी हलवा

रंग-रुप जास्वंदीचे

लेखक जागु यांनी सोमवार, 10/01/2011 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम पुज्य गणपतीच आवडत फुल म्हणजे जास्वंद. जास्वंदीचा पुजेपासुन आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केला जातो. जास्वंदीचे मुळ, पान फुल अगदी सगळ्याचाच औषधा मध्ये वापर केला जातो. केसांच्या संवर्धनासाठी जास्वंद ही वरदान ठरली आहे. पुर्वी जास्वंद ही लाल रंगात जास्त दिसायची पण निसर्गनिर्मित जास्वंदीला आता कृषीतज्ञांनी वेगवेगळी रुप व रंग दिले आहेत.

तात्पर्यात गडबड? नेहमीच्या कथा..

लेखक गवि यांनी सोमवार, 10/01/2011 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून (किंवा लहानपणीच !!) नेहमी ऐकलेल्या काही कथा. त्यातली एकदोन सँपल उदाहरणं उचलून दाखवतो. यातल्या काही कथा तर उदाहरण / चांगले विचार / बोध याकरता सांगितल्या जातात..अजूनही सांगितल्या जातात का माहीत नाही. पण बर्‍याच कथा त्या त्या वेळी शाळेतल्या बाई किंवा आजूबा आज्जींकडून ऐकून घेतल्या. आता त्याविषयी उलट विचारही मनात येतात : १) द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्रहरण करणार्‍याच्या मनात शरम उत्पन्न करणं किंवा त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं अशा प्रकारे मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला..?

चित्रपटातील "तानापिहिनिपाजा"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी सोमवार, 10/01/2011 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
'चित्रपट' हे असे एक माध्यम आहे की ज्याच्या जादूने जगातील सर्वच स्तरावरील लोक प्रभावित झालेले असतात. सुरूवातीच्या काळात दोन घटकांची करमणूक असे जरी चित्रपटाचे स्वरूप असले तरी कालानुरूप त्याला विविध तंत्राची जोड लाभली, नवनवीन कल्पना मूर्त स्वरूपात पडद्यावर मांडून त्यावर रसिकांची मते जाणून घ्यावीत असे या क्षेत्रातील दिग्गजांना वाटू लागले, वेळोवेळी नव्या प्रवाहाची त्यात भर पडत गेली आणि जगभर 'चित्रपट म्हणजे निव्वळ मनोरंजन’ नव्हे तर तो एक अभ्यासही होऊ लागला.

निष्पर्ण वृक्षावर पक्षी घरटी नाही बांधत !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 10/01/2011 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षापासून तो वृक्ष उभा ! निष्पर्ण ! उघडा !! पर्णहीन ! म्हातारा खंगलेला !! निष्पर्ण वृक्षावर पक्षी येत नाही वस्तीला नाही बांधत आपल्या पिल्लासाठी घरटे वृक्ष आसुसलेला पक्ष्यासाठी !! बांधारे घरटे माझ्या अंगणात फुकट देतो .फक्त येऊन राहा . बांधा घरटे.! रात्रीची तेवढीच मला सोबत भीती वाटतेरे मला एकटेपणाची एके दिवशी माणसांची जमात मला नष्ट करतील नि नेतील मला जाळायला आपले टीचभर पोट भरण्यासाठी !!!
काव्यरस