Skip to main content

नाटकवाला

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 08/01/2011 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
तसं म्हणाल तर बालपणापासूनच नाटक अंगात मुरलेलं. हवी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी रडण्याचं नाटक करायचं किंवा एखाद्या किर्तनकाराची हुबेहूब नक्कल करीत वाहवा मिळवायची. शालेय जीवनात अनेक सोंगे करुन उपस्थितांना हसवलं. 'चोरीचा मामला' मधील सदाशिवरावांची व्यक्तिरेखा साकारली. 'वेड्यांच्या इस्पितळा'त पोस्टमन म्हणून वावरलो. कॉलेजच्या पहिल्या वर्षी पु.लं. च्या 'सारं कसं शांत शांत' मधील भटजीची भूमिका करून अनेकांची शाबासकी सुद्धा मिळवली.

नाही ... (गझल)

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शनिवार, 08/01/2011 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
नाही मला कधीही नव्हते म्हणायचे 'नाही'च शब्द पण का ओठात यायचे ? अवरुन घेत जातो माझ्या मनास मी तू यायचे त्वरेने ते विस्कटायचे मी झेलतो निखारे वणव्यात तू उभी कोणा कुणास आता मग शांतवायचे ? घालीत भीक नाही मी संकटा तुला तू सारखे कशाला दारी फिरायचे ? माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ? - स्वानंद
काव्यरस

सोपे कोडे

लेखक शुचि यांनी शनिवार, 08/01/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकदमच सोप्पं कोडं घालते आहे. पण या धाग्यावर अधिक कोडी घालावीत. (१) ३ खोकी आहेत. (२) एका खोक्यात फक्त काळे हातमोजे, दुसर्‍या खोक्यात फक्त पांढरे हातमोजे आणि तीसर्‍या खोक्यात काळे आणि पांढरे हातमोजे आहेत. (३) तीनही खोक्यांवर निखालस चूकीच्या रंगांच्या चिठ्ठ्या लावल्या आहेत. प्रश्न - कमीत कमी किती प्रयत्नांत तुम्ही हातमोजा उपसून, खोकी आणि रंग बरोबर जुळवून व्यवस्थित चिठ्ठ्या लावू शकाल?

चला साळंत जाउया (शाळा)

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/01/2011 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी, साँदेश ची तहान पेढ्यावर... ;) शाळा म्हटली की बालमित्र त्यांच्या सोबत केलेल्या गमती जमती, काही विशिष्ट तास..उदा. मोस्ट कॉमन गणित,विज्ञान ई. जास्तीत जास्त झणांना कंटाळ्वाणा वाटणारा... मग त्यात विरंगुळा काय तर खिडकीजवळची जागा असेल ,दरवाज्या जवळची ही चालते..

आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण...

लेखक बाबुराव यांनी शुक्रवार, 07/01/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मा.आमदार. हर्षवर्धन जाधव [कन्नड चे आमदार]यायला शिघ्र कृती दलाच्या जवानांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी आले असता मुख्यमंत्र्यला भेटाला जाचं म्हून त्यायला जी मारहाण केली त्यायचे समर्थन होऊ शकत नाही. हर्षवर्धन जाधव यायनी पोलिसायचे अनाधिकृत धंद्याला आळा घातला आन त्यायचा बदला म्हून त्यायला टींगराच्या बाजूला रक्त गोठेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली असे म्हणले जाऊ लागले हाये. ते म्हणले माझे किडनीचे आपरेशन झालेलं हाये त्या बाजूला मारु नका. तव्हा पोलिसायनी जाणूनबूजून त्यायला त्याच बाजूला हानलं अशी बातमी पाह्यला टीव्हीवर मिळली.

पाटोडीची भाजी

लेखक रुपाली प्रा॑जळे यांनी शुक्रवार, 07/01/2011 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
अस्सल झणझणीत विदर्भातली भाजी येथे देत आहे. साहित्य : चनादाळ पिठ दिड वाटी, आले लसुन पेस्ट २ टीस्पुन, कीसलेले सुके खोबरे २० ग्राम, तेल १०० ग्राम, कडीपत्ता, हिरवि मिर्चि २, कोथी॑बीर, तिखट, मिठ, हळ्द, जिरे,का॑दा-लसुन मसाला स्वादानुसार. कृती : चनादाळ पिठात तिखट, मिठ, हळ्द, जिरे स्वादानुसार घालुन भिजवावे. जाडसर पोळी लाटून चौकोनी काप करावेत. कढईत तेल घालुन का॑दा परतावा. त्यात चिरलेली हिरवी मिर्ची ,कडीपत्त,तिखट, मिठ, कीसलेले सुके खोबरे ,आले लसुन पेस्ट ,हळ्द, जिरे,का॑दा-लसुन मसाला स्वादानुसार घालून फोडणी द्यावी.

हिरवा पाचू

लेखक जागु यांनी शुक्रवार, 07/01/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
पाचुचे बन असते अस ऐकल आहे. खाली पाचुची रोपे आहेत व पाचुच्या जुड्या. सध्या पाचु फुलतो आहे. ह्या पाचुचा मंद वास मोहीत करतो. अजुनही काही बायका हे पाचु डोक्यात घालतात आवडीने. पाचुचा उल्लेख कुठल्यातरी गाण्यातही आहे.

वन लाइनर्स

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 07/01/2011 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व) व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच . त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.