Skip to main content

माझी राधा - ४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 30/04/2022 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो चेहेरा दिसताच माझ्यात काहीतरी बदल होताना मला जाणवतोय. ते मोहक हसू माझ्या ही चेहेर्‍यावर पसरत जाते. मघा बासरी वाजवताना ऐकू आलेल्या पैंजणाच्या आवाजाची ओळख पटते मागील दुवा http://misalpav.com/node/49987 मी बासरी वाजवताना मुग्ध होऊन पहाणारा. हा चेहरा मी पहिल्यांदा पाहिला ते ही डोळ्यासमोर उभे रहाते. कदम्बाच्या झाडाला टेकून बासरी वाजवत होतो. त्या वेळेस रागदारी वगैरे काही असतं हेच माहीत नव्हते. बासरी वाजवत होतो. माझे लक्ष्य नव्हते. समोरच्या पायवाटेवरून काही गवळणी पाणी आणायला म्हणून निघाल्या होत्या. माझी बासरी ऐकून त्या काही काळ थांबल्या असतील.

वसंतात मृगजळ खास

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 29/04/2022 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

वैशाखाची ऊन्हं ..

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 29/04/2022 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली, वळीवाची आठवण उमलून आली. बहाव्याने केली रिती फुलांची पखाल, पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली.. सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे, वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे. चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी, धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे. सुकलेले पात्र, मधे खोल खोल डोह, सुटता सुटेना कसा जीवनाचा मोह. काठावर कुणी वेडा सूर तोलणारा, कंठी त्याच्या मल्हाराचा ओला अवरोह. ऐकुनिया बकुळी ती लाजली जराशी, चित्त तिचे उडुनिया गेले कुणापाशी? नादावले मन तिचे उतू उतू जाई पायापाशी म्हणूनच नव्हाळीची राशी. वैशाखाची उन्हं मग गंधमय झाली वळीवाची आठवण दूरदूर गेली...

रावळगुंडवाडी स्पेशल : हुलग्याची ओट्टिगे आमटी

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शुक्रवार, 29/04/2022 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आमटीची दीक्षा मला आमच्या मल्लाप्पा नावाच्या शेजार्‍याने दिली. मल्लाप्पाने दोन लग्नं केली. पहिली बायको एका वर्षातच गेली. मल्लाप्पाची पहिली बायको त्याची प्रेयसी. तिला साखरपुड्याच्या दिवशी मल्लाप्पाने कुडल संगमाला पळवून नेली आणि लग्न केले. मूळची रेसिपी तिची असं मल्लाप्पा म्हणतो. नंतर ती वारल्यावर मल्लप्पाच्या आईनं त्याचं लग्न परस्पर ठरवून टाकलं. लग्नाच्या दिवशी हा परत कुडल संगमाला एकटाच पळून गेला. दोन दिवस तसाच ऐक्य लिंगाजवळ बसून राहिला. शेवटी कुणी भटक्या साधूने त्याला समजावून परत प्रपंचात ढकलले.

(थू)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 29/04/2022 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा पाभे सरांची तू http://misalpav.com/node/50075

थू -१

तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग तू हसते अशी छाती माझी धडधडे ग गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग तू स्वत:ला चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता समजते ग बलाढ्य तुझ्या पुढे नाजूक माझा जीव घाबरुन जातो ग

-o-o-o

तू

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 29/04/2022 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
तू चालते अशी झाडावरची वेल ग अंगावरती पानं फुलं ल्यायते ग तू हसते अशी झरा वाहतो ग खळखळाटानं हासणं पिकतं ग तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग येता येता सुगंघ आणतो ग तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग - पाषाणभेद २९/०४/२०२२
काव्यरस

अरबी समुद्राची राणी

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 29/04/2022 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
कोची-एर्नाकुलम ही केरळमधील महत्वाची शहरे असून अलीकडील काळात त्यांच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढला आहे. कोची-एर्नाकुलमच्या आसपास अनेक विशेष आर्थिक क्षेत्र स्थित आहेत. त्याचबरोबर कोची हे दक्षिण भारतातील एक मोठे नैसर्गिक बंदर असून नौदलासाठी आणि व्यापारी कंपन्यांसाठी युद्धनौका आणि अन्य जहाजे बांधणारी कोचीन शिपयार्ड लिमिटेडची मोठी गोदी इथे आहे. इतकेच नव्हे तर भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय, तेलशुद्धिकरण प्रकल्प, केरळ उच्च न्यायालय अशा अनेक महत्वाच्या संस्थाही इथे आहेत.

जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) - अंबाजोगाई.

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 26/04/2022 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच केलेल्या मराठवाडा दौऱ्यात परळी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले 'श्री वैजनाथ' मंदिर, अंबाजोगाई येथील आमची कुलदेवी 'श्री योगेश्वरी' मंदिर, आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळ आणि जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) अशा ठिकाणी भेट दिली त्याचा हा थोडक्यात वृत्तांत. 14 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता घरी नाश्ता केल्यावर डोंबिवली ते परळी असा सुमारे 435 किमीचा प्रवास सुरु झाला.

भारतातील रस्ते-अपघात

लेखक केदार भिडे यांनी सोमवार, 25/04/2022 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझी बहीण गाडी चालवत असलो तर रस्त्यावर अन्य चालकांना शिव्या घालत आमचा प्रवास सुरु असतो. अर्थात, असे चालक दरवेळी आम्हाला काही त्रास देतात असे नव्हे, मात्र त्यांचे वागणे अन्य लोकांच्या अपघातास कारणीभूत ठरू शकते म्हणून आम्ही त्यांना शिव्या घालतो, आमच्याच गाडीच्या बाहेर ऐकू जाणार नाहीत एवढ्याच आवाजात.

दोन क्षण विरंगुळ्याचे - पानशेत

लेखक मालविका यांनी सोमवार, 25/04/2022 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीनिवास च्या भावाबहिणींच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो. पानशेतला त्याच्या बहिणीच फार्म हाऊस आहे. तिथे जमायच ठरलं. पानशेतला मी प्रथमच जात होते. शिवाय श्रीनिवास च्य भावाबहिणींना भेटायची उत्सुकता होती. सलग सुट्टी आल्याने आम्ही आधी औरंगाबाद - शेगाव दौरा करून साधारण साडेतीन/ चारच्या दरम्यान पानशेतला पोहोचलो. पानशेतच धरण दिसल आणि नंतर दिसणार्या पाण्याने डोळ्यांचा बरं वाटलं. औरंगाबाद, नगर असे रखरखीत प्रदेश पार करून आल्याने या पाण्याच्या नुसत्या दर्शनाने डोळ्यांचा थकवा दूर गेला.गुगल मॅप प्रमाणे चाललो होतो . हळूहळू वस्ती विरळ होऊन डोंगर चढायला लागलो.