हे पाहा: माय ऑक्टोपस टीचर
कटाक्ष-
नेटफ्लिक्स माहितीपट
वेळ - ८५ मिनिटे
भाषा- इंग्रजी
ओळख-
क्रेग फॉस्टर हा दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर राहणारा चित्रपट निर्माता 'माय ऑक्टोपस टीचर' या माहितीपटाचा निवेदक आणि ऑक्टोपस सोबत विभागून मुख्य पात्र आहे. अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरच जडणघडण झालेली असल्यामुळे क्रेगसाठी समुद्र नवा नाही. स्वतःची चित्रपटांशी संबंधित कारकिर्द एका निराशेच्या कालखंडातून जात असताना क्रेगची पावले बालपण ज्या समुद्रात तासनतास डुंबत घालवले तिकडे वळतात.
मिसळपाव