मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिरची भजी

Bhakti · · पाककृती
च पाऊस तर काही जायचं नाव घेत नाही तेव्हा म्हटलं जे करायचे राहिले आहे.. ते मिरचीचे भजे आज करावे. अगदी झणझणीत!!! साहित्य: सात आठ कमी तिखट मिरच्या एक छोटी वाटी तांदळाचे पीठ एक मोठी वाटी डाळीचे पीठ जिरे ओवा, हिंग हळद चवीपुरतं मीठ हवा असेल तर खायचा सोडा मिरचीसाठी सारण- बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला. कृती: पहिल्यांदा मिरच्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात आणि मध्ये चिरून त्यातील बिया काढून घ्याव्यात. चिरलेल्या मिरच्या मीठ चोळून बाजूला ठेवाव्यात. आता सारण साठी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात थोडासा डाळीचे पीठ हळद गरम मसाला तिखट एकत्र करावे आणि हे सारण मिरचीच्या आत भरावे व मिरची थोडीशी दाबून बंद करावी. मिरची तळण्यासाठी ज्याप्रमाणे आपण भजाचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, जिरे, ओवा, हळद एकत्र पाणी टाकून भिजवावे हवे असेल तर किंचित सोडा टाकावा. मिरची डाळीच्या पिठात घोळवून घेऊन गरम गरम तेलात खरपूस होईपर्यंत तळून घ्यावी. ज्यांना तिखट खायची सवय नाही त्यांनी या मिरचीच्या भज्यांचा पोळीबरोबर स्वाद घ्यावा.

वाचन 9644 प्रतिक्रिया 0