मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सकाळ प्रकाशन - ललित लेखन - एका खेळियाने

जे.पी.मॉर्गन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मिपाकर मित्रहो, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील. या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे. लोभ आहेच - तो वाढत रहावा हीच विनंती. जे.पी.मॉर्गन

वाचने 7234 वाचनखूण प्रतिक्रिया 21

तुषार काळभोर गुरुवार, 09/22/2022 - 16:10
मिपाकरांसाठी अभिमानाने ऊर भरून यावा अशी बातमी! अवांतर : खालील लिंक मी कायमस्वरुपी गुगलड्राइव्हवर ठेवली आहे. हवं तेव्हा क्लिक करून हरवून जाण्यासाठी. https://misalpav.com/user/994/authored

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/22/2022 - 16:44
माॅर्गनभौ अभिनंदन. पुढील लेखना साठी शुभेच्छा. अर्थात पुस्तक तुमच्या नावाने प्रसिद्ध होणार नाव कळाले तर इतरांना अभिमानाने सांगता येईल.