बहारो फूल बरसाओ....
बहारो फूल बरसाओ मेरा महेबूब आया है......
हिंदी सिनेमातलं हे गाणे जणू खास बँडवाल्यांसाठे मुद्दाम होउन लिहीले असावे असेच वाटते. मला तर लहानपणी हे गाणे सिनेमातले नसून लग्नातले आहे असेच वाटायचे.
लहानपणे म्हणे टीव्हीवर एकदा हे गाणे लागले होते तेंव्हा मी आईला विचारले होते की "आई या गाण्यात बँडवाले कुठे आहेत? वरात कुठे आहे. काहीतरी चुकतय." माझा प्रश्न ऐकून घरातले सगळे खो खो हसत सुटले होते. तो एक किस्साच होऊन बसला होता. कोणतेही लग्न असले आणि त्यात हे गाणे वाजू लागले की सगळे इतर कुठे पहायच्या ऐवजी माझ्याकडेच पहायला लागतात. इतक्या वर्षांनंतरही.
मिसळपाव