जगात नक्की कोणत्या देशाचे चांगले चालले आहे?
मिपाकरांकडून मला सतावत असलेल्या एका प्रश्नाचे उत्तर मिळेल ही अपेक्षा आहे. जगात नक्की कोणत्या देशाचे चांगले चालू आहे आणि तो देश येत्या काही वर्षात वर्चस्व गाजवेल?
अमेरिका गेली अनेक वर्षे वर्चस्व गाजवत होती पण २००७-०८ पासून तिथे आर्थिक संकट आले आणि त्यातून ते पुरते सावरलेले दिसत नाहीत. इराक आणि अफगाणिस्तानातील युध्दांमध्ये त्यांचा वारेमाप खर्च झाला आहे.मध्यंतरी त्यांचे क्रेडिट रेटिंगही कमी झाले असे वाचल्याचे आठवते.
युरोपात तर प्रश्न मोठाच आहे.अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या आहेत. बडा घर आणि पोकळ वासा अशी त्यांची अवस्था.
मिसळपाव