Skip to main content

मी गीता व्हावे......

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शनिवार, 28/01/2012 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तन मन वाणी अंजन डोळे काया व्हावे जीथे तीथे तू जाशी तेव्हा छाया व्हावे गात्रे गात्रे शामल शामल तुंदिल तुंदिल येशोदेने केलेली ती माया व्हावे जन्मोजन्मी ओठावरची सटवी व्हावे काळ्या काळ्या श्रीकृष्णाची राधा व्हावे कौरव पांडव लढण्या जमले कुरुक्षेत्री त्या पार्थाच्या मी नाशामधली बाधा व्हावे जेव्हा जेव्हा भारत "भू"ला येई ग्लानी तेव्हा तेव्हा रायाची मी गीता व्हावे मकरंद २१०२१०९१

माझ्या मना

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/01/2012 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मना माझ्या मना तू माझ्या मना मला तू तरी समजून घे ना उगा नको तू प्रश्न विचारू उत्तर मला माहीत नसेल ना न ऐकले तुझे अन भेटलो तिला का भेटलो तेव्हा ते मला कळेना दुर ती गेली निघूनी सोडून मला आठवण तिची कधी काढू नको ना होती का काही तिची मजबूरी? ती तरी का सांगेल कोणा? असेल का रे स्थिती तिची अशीच माहीती का तुला? तू मला सांग ना! - पाषाणभेद

लिअँडर पेसचं हार्दिक अभिनंदन!

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 28/01/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ भारतीय टेनिस पटू लिअँडर पेस याने पुरूष दुहेरीतील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा झेकोस्लोव्हाकियाच्या रॅडेक स्टेपॅनेक च्या जोडीने जिंकून अकरावं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवलं आहे. ३८ वर्षांचा पेस आणि ३३ वर्षांचा स्टेपॅनेक यांनी अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायन या जुळ्या भावांचा ७-६ (७/१), ६-२ असा पराभव केला.

ब्लोगबद्दल थोडस ...

लेखक शेफ चेतन यांनी शनिवार, 28/01/2012 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावरच माझ हे पहिले लेखन.चू.भू.द्या.घ्या. नुकताच मी माझा ब्लोग तयार केला.मी पाहिलेले इंटरनेटवर आणि मिपाकरांचे ब्लोग ह्यांमध्ये अनेक गोष्टी अशा होत्या ज्या मला माझ्या ब्लोगवर ताकाव्याशा वाटल्या.ब्लोग तयार करताना ज्या अडचणी मला आल्या आणि येत आहेत त्यांचे समाधान मिपाकर निश्चित करतील अशी अशा आहे.अडचण्नींची यादी खाली देत आहे. १. मी जी लेबल्स तयार केली आहेत त्या लेबलमध्येहि मला सबलेबल हवी आहेत.ती कशी घ्यायची? २.काहींच्या ब्लोगवर गोल फिरणारी पृथ्वी होती ती कशी घ्यायची. ३.templet नुसार गजेट बदलतात का? ४.मला ब्लोग मधले लेखन आधी टाकलेले प्रथम असे हवे आहे तसे करण्यासाठी काय करावे. ५.

Pollo Alla Cacciatora (ईटॅलियन हंटर चिकन)

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 28/01/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ५०० ग्राम चिकन तुकडे करुन घेणे (हाडांसकट तुकडे घेतले तरी चालेल ) २ कांदे बारीक चिरून ४-५ टोमॅटो बारीक चिरून ३-४ लसुण पाकळ्या २ वाट्या रंगीत भोपळी मिरच्या बारीक चिरुन (भोपळी मिरच्यांऐवजी मश्रुम, सेलेरी वापरली तरी चालेल ) ७-८ पाने बेसीलची १ टेस्पून रोझमेरी हर्ब बारीक चिरून २-३ टीस्पून काळीमिरीपूड १/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स मीठ चवीनुसार ३-४ टेस्पून मैदा १/२ -३/४ कप वाईन (तुम्ही कोणतीही वाईन वापरु शकता रेड किंवा व्हाईट) ऑलिव्ह ऑईल

जोडींया स्वर्गमें ...

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 28/01/2012 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
हेतु : सहज टीपी नेनेंबाईंनी मध्यंतरी झुल्यावर बसुन एक कमेंट केली होती, कल्पना करतो आहे की त्यावर मान्यवरांच्या कश्या प्रतिक्रिया आल्या असत्या !! ;) अर्थात आमच्या चेपुकर मित्रांनी यातल्या काही वाचल्या असतीलच माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. दादा कोंडके : हिच्यामायला !! म्हण्जी देवाला बी ' जोड्या जुळवा ' अस प्रश्न असतो म्हणा की ! बाकी येव्हढ्या जोड्या जुळवताना पार घोडा लागत असेल, म्हणजे हिकडन तिकड फिरायसाठी . ************************************************************************ माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. मक्या अनासपुरे : आस्स हाय कां ते !

मिपाची घटना - एक प्रकटनात्मक चौकशी..

लेखक कॉमन मॅन यांनी शनिवार, 28/01/2012 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळाच्या सर्व सन्माननीय सभासदांना सप्रेम नमस्कार, काही प्रश्न आमच्या मनात आले ते इथे विचारत आहे - १) मिपाच्या वापरासंबंधीची, इथे वावरण्यासंबंधीची, लेखनासंबंधीची, प्रतिसाद देण्यासंबंधीची एखादी स्वतंत्र घटना अस्तित्वात आहे काय? १-अ) असल्यास कोठे वाचावयास मिळेल? वरील प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर कृपया खालील प्रश्न गैरलागू समजावे - २) अशी एखादी घटना अस्तित्वात असावी काय? २-अ) सदर घटना समितीमध्ये कोण कोण मंडळी असावीत?

टेलिफोनची ट्रॅजेडी !!

लेखक जयवी यांनी शनिवार, 28/01/2012 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
कुठलीही गोष्ट नसते तेव्हाच तिची खरी किंमत कळते…… असं कोणीतरी म्हटलंय ना……… ते अगदी मनापासून पटलं गेल्या काही दिवसात. ह्म्म्म्म……. आणि ती गोष्ट म्हणजे आमचा फोन. आमची Land Line. गेल्या दोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽन महिन्यापासून आमचा हा फोन अक्षरश: मृतवत पडला होता. अगदी बघवत नव्हतं हो…….. कधी मधी त्याच्या छातीला कान लावून थोडी तरी धुगधुगी उरलीये का………. हे बघत होतो आम्ही आळीपाळीने. पण कसलं काय…….. ! शेवटी चक्क कोमातच गेला !! कोमात गेला तो आणि मरणप्राय अवस्था झाली आमची. आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस झाला आणि अगदी त्याचीच वाट बघत असल्यासारखा फोन २ दिवसानंतर गेला……… गेला म्हणजे…….मेलाच !

Some Beautiful Sketches Drawn By My Son Mandar..........

लेखक anirudh यांनी शनिवार, 28/01/2012 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ऐश्वर्या राय (Using Soft Color Pastels):-
100_3807 -------------------------------------------------///////////////////////////----------------------------------------------------