Skip to main content

विदेश .....!! [थोडा टाईम पास ]

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 26/01/2012 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी विदेशात होतो किती मस्त मजेने जगलो कैफात असा होतो हे जग विसरुनी मी गेलो मज आठवण येता तिथली जीव कासावीस होतो माझा आठवूनी गुलाबी थंडी हुडहुडी भरे अंगाला त्या विदेशातील घरे कशी मस्त लाकडी होती काचेच्या खिडकी मधुनी आभाळ उतरुनिया येई ह्या देशामधली गर्दी नि गोंगाट कसा भरलेला..? ह्या गाड्या मधली गर्दी मी घामाने ओला ओला नव्हता देव्हारा तेथे मी उघडला छोटा बार संध्याकाळी बसता मी विसरुनी जातो पार मी विदेशात होतो किती मस्त मजेने जगलो............!!
काव्यरस

" भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 26/01/2012 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वधर्मसमभाव सुखाने रमतो येथे माणुसकीला जपण्या जो तो बघतो येथे अतिथी आदर सन्मानाने घडतो येथे भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! |१| प्रतिकूल निसर्गातही चढाई शत्रूवरती जवान जखमी होउन लढतो सीमेवरती बलिदानाचा गर्व सांडतो भूमीवरती येथ जन्मलो, येथ वाढलो, बाळगतो अभिमान ! |२| सणवारांचे महत्व जपणे आहे एकीसाठी लहान मोठा भेद विसरणे जाणिव नित्यासाठी वैरभाव मतभेद विसरणे घडता भेटीगाठी संस्कारांचे वैभव अमुचे, बाळगतो अभिमान !

चुकते कोण??

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 25/01/2012 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील बाईमाणसाला जास्त काम लावू नये, शक्यतो स्वत:चा हातभार वाढवावा,असे माझे मत आहे. असो. आई-वडिल, मुलगा-सून, नातवंडे असे भरलेले कुटूंब दिसणे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. त्यातही जी काही थोडी कुटूंबे आहेत, तिथे सूनांना योग्य वागणूक मिळत नाही. बायकांनी नेहमी घरकाम आणि नवर्‍याने तंगड्या पसरुन टीव्ही बघत चमचमीत खाण्याच्या फर्माईशी सोडायच्या असे समीकरण सर्रास दिसते. [ आमच्या गणपासारखे काही अपवाद सोडून...] माझ्या गावाला (झुमरीतलैय्या) ओळखीचे अशा एक कुटूंबात आई-वडिल, दोन मुले -सुना, नातवंडे आहे. तर झाले काय... धाकटा मुलगा दुबईत नोकरी करतो.

२०१२... अजून काय???

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 25/01/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी ऑफिसमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे ईमेल चेक करत बसलो. कामाचा प्रचंड कंटाळा आला होता (तो नेहमीच येतो म्हणा ;)). एक नियम नेहमी पाळतो, क्लायंटचे ईमेल सगळ्यात शेवटी चेक करतो. साले एक से एक मनहूस असतात, कारण त्यात नेहमीच एकच चर्चा असते टार्गेट्स..टार्गेट्स आणि टार्गेट्स. म्यानेजरचा पहिला ईमेल बघितला, त्याला हाय प्रायोरीटी असं मार्क केलं होतं. ***ATTENTION*** म्हटलं झालं, काही तरी नवीन जबाबदारी दिली असणार. रागातच तो ईमेल उघडला आणि त्यात सूर्याचे काही फोटो दिले होते.

चुकते कोण?

लेखक स्वातीविशु यांनी बुधवार, 25/01/2012 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील वडिलधा-यांना जास्त काम लावू नये, शक्यतो स्वत:चा हातभार वाढवावा,असे माझे मत आहे. असो. आई-वडिल, मुलगा-सून, नातवंडे असे भरलेले कुटूंब दिसणे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. त्यातही जी काही थोडी कुटूंबे आहेत, तिथे ज्येष्ठांना योग्य वागणूक मिळत नाही. जेष्ठांनी नेहमी समजुन घ्यायचे आणि लहानांनी नेहमी चुका करायच्या असे समीकरण सर्रास दिसते. [ काही अपवाद सोडून...] माझ्या गावाला (वाई) ओळखीचे अशा एक कुटूंबात आई-वडिल, दोन मुले -सुना, नातवंडे आहे. तर झाले काय... धाकटा मुलगा मुंबईत नोकरी करतो. त्याची बायकोसुद्धा चांगल्या कंपनीत नोकरी करते, अर्थात घरकामातही ती अजिबात कमी पडत नाही.

शाळा : प्रत्येकाच्या मनातली

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 25/01/2012 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्‍याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे.

!! श्रद्धांजली !!

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 25/01/2012 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुण्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली..... संतोष माने नावाच्या एका माथेफिरू S.T महामंडळाच्या कर्मचाऱ्याने बिचाऱ्या ९ माणसांना कारण नसताना चिरडले आणि कित्येक लोकांना जखमी केले.. याच्यावर काय लिहावे तेच कळत नाही....डोके बधीर आणि सुन्न झाले आहे. या घटनेत मृत पावलेल्या सर्व नागरिकांना !! श्रद्धांजली !!

<<< यक्षावाणी शापीत जगायचे ..!! >>>

लेखक सुहास.. यांनी बुधवार, 25/01/2012 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20497 आंजाच्या खफवर मी फ्लर्ट करीत बसायचो तिच्यावर गेम साधण्यासाठी काही 'चाल' शोधीत असायचो मला हवे ते काव्य मिळत नव्हते काय करावे कळत नव्हते..? कधीतरी ती भांडली होती भटोर्‍यासारखी फुलली होती काहीतरी बोलायचे होते व्यनी-मनी पुढ्यात होते पण थापा पटल्याच नाही धाग्यातले धाग्यात मरुन गेले हे कसे झाले ,,? हे कधी झाले ..?? तिच्या डोळ्यात दबंग सले ,!! कसे स्वप्न बघत होतो रोजच पिवुन झुलत होतो मग जागा झालो नि हे काय झाले ,? नातेच मुळी हरवून गेले शब्दच कसे मुखावरी आले ..? शब्द बंबाळ ... नि माझे शब्द ठसवुन गेले 'जिव
काव्यरस