Skip to main content

मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अ‍ॅप)

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 01/02/2012 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अ‍ॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अ‍ॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील. मिपा अ‍ॅप हे अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल.

(गिरनार पर्वतावर रंजिताची - गुरूंशी भेट)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 01/02/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
सदरच्या विडंबनाकरता तामिळनाडूमधील काही महिन्यांपूर्वी सिने अभिनेत्री रंजिता आणि स्वामी नित्त्यानंद यांच्यातील गाजलेल्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. या स्कँडलबाबत अनेक संकेतस्थळांनी आणि हिंदी-इंग्रजी व सर्व दाक्षिणात्य वाहिन्यांनी काही काळ सातत्याने प्रकाश टाकला होता. सबब, या विडंबनाकरता आणि केवळ मौजमजा म्हणून इथेही त्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. मिपा मालक-चालक आणि संपादकवर्गाची त्याबाबत हरकत नसावी! -- तात्या.

सीएमईचे शेफारलेले सैनिक

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 01/02/2012 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
ही बातमी पहा http://www.esakal.com/eSakal/20120201/5672551390416047564.htm पुण्यात लकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी आहे. ती तोडली म्हणून पोलिसांनी सैन्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना पकडले आणि दंड मागितला म्हणून त्यांनी पोलिसांना चोपून काढले. एवढेच नाही तर नंतर आपल्या सहकार्‍यांना बोलवून लकडीपुलाजवळ धुडगूस घातला. लोकांना मारले, पत्रकारांना मारले, कॅमेरे फोडले, शिवीगाळ, धमक्या वगैरे होतेच.

उपीट / उपमा

लेखक Pearl यांनी बुधवार, 01/02/2012 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
उपीट / उपमा: साहित्यः १ वाटी जाड रवा, तूप, साखर, मीठ, भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लिंबू/लिंबाचा रस, कढीलिंब, जिरे, हिंग, तेल खालील गोष्टी ओप्शनलः बारीक चिरलेली कोथिंबीर, खोवलेले खोबरे, काजू, शेव, फरसाण, शिजवलेले मटार क्रुती: थोड्या तूपावर रवा भाजून घ्या. एका कढइमध्ये तेल घेउन त्यात हिंग, जिरे घालून फोडणी करा. त्यात कढीलिंब, मिरच्यांचे तुकडे, शेंगदाणे घालून परता. मग काजू घालून परता. मग कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परता. मग त्यात ३ वाट्या पाणी, मटार, टोमॅटो, मीठ, साखर व ४/५ थेंब लिंबूरस घाला.

ॐ मणी पद्मे हुं

लेखक शुचि यांनी बुधवार, 01/02/2012 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
ॐ मणी पद्मे हुं - हा अतिशय मधुर असा तिबेटीयन मंत्र असून, हा अवलोकीतेश्वर या करुणामूर्ती बुद्धाचा मंत्र आहे. तिबेट, जपान, कोरीया, व्हिएतनाम,थायलंड आदि विविध देशातील बुद्धधर्मीय लोक या मंत्राचे उच्चारण करतात. वर म्हटल्याप्रमाणे, अवलोकीतेश्वर ही करुणेची देवता असून निर्वाणपद त्यागून ही देवता हालकष्टात पिचत असलेल्या प्राणीमात्रांचा उद्धार करण्यासाठी झटते अशी कथा/प्रवाद रूढ आहे. ॐ मणी पद्मे हुं हे संस्कृत रूप झाले तर याच मंत्राचे तिबेटी रूप ॐ मणी पेमे हुं असे आहे. अर्थात मंत्राच्या उच्चारणापेक्षा त्यामागील भाव हा महत्त्वाचा.

मी ?? म्हातारा ???

लेखक गवि यांनी मंगळवार, 31/01/2012 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली. का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्‍याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे.. "मी.. ?? म्हातारा ???" ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे.. ........................ मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध.. जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो.

ते दिवस सुंदर होते ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 31/01/2012 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात कधीतरी छान दिवस येतात . खूप मनासारख्या घटणा घडत राहतात. कुणाचेतरी आशीर्वाद आपल्यामागे असतात . आणि हे खूप खरे असते. मला अचानकपणे छान नोकरी मिळाली.मिळेल की नाही असे वाटत असताना मिळाली.कुणाचा वशिला नव्हता. डोक्यावर कुणाचा हात नव्हता. तशी ह्या महानगरात कुणाची तशी ओळख नव्हती.गावाच्या मुलाची जशी परिस्थिती तशी माझी होती पण वरच्याचा हात होता. त्याने बोट पकडले होते. आणि मी त्याच्या आधाराने वाट तुडवीत होतो. . मुंबईत छोटासां फ्ल्याट होता काकाचा. ते निवृत्त झाले होते.नि. जरा निवांत जगावे म्हणून ते गावी आले होते. निसर्गात ते मनापासून रमत होते.गावाकडची थंड हवा त्याना हवी होती.