मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जवसाची खमंग चटणी

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्यः १/२ वाटी जवस/ अळशी/ Flax Seeds १२-१५ कढीपत्ता ३ टीस्पून तीळ १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून जिरेपूड मीठ व साखर चवीपुरतं तेल . पा़कृ: पॅनमध्ये थोडया तेलात (साधारण १/२ टीस्पून) कढीपत्ता तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावा. . त्याच तेलात जवस परतून घेणे. . थोडा खमंग सुवास आला की त्यात तीळ घालून परतणे.(करपवु नये) . थोडे गार झाले की त्यात मीठ, साखर, लाल तिखट, जिरेपूड व तळलेला कढीपत्ता घालून मिक्सरमधून फिरवून घेणे. खमंग जवसाची चटणी तयार. . जवस अतिशय पौष्टीक आहे त्यात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असते :)

वाचन 31702 प्रतिक्रिया 34