Skip to main content

सरदार सरदार

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 27/01/2012 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार सरदार सरदार सरदार तुम्ही माझं अंमलदार काळजी तुमची करते लवकर परतावं सवत चाकरी झाली माझी ओढून नेई तुम्हा युध्दावर वाट पाहिल तुमची दारी दासी सेवा करीते थोडं शेजघरी पडावं तुम्हाविण व्याकुळ चिमणा जीव काय घडलं तेथे कुणी सांगावं मन लागेना कामी दिसभर घास जाईना ओठी काय करावं धिर करून देते निरोप आता माझी काळजी आहे उलीशी महाराष्ट्राचा पसारा मोठा पुर्‍या ताकदीनिशी युध्द लढावं चला नाही अडवीत, तुम्ही जावं तेज तलवारीनं दुष्मना मारावं मस्तकी मोती शिरपेच खोचावं विजयी विराला पंचारतीनं ओवाळावं - पाषाणभेद (दगडफोड्या)
काव्यरस

कुत्री आणि टोळ

लेखक ए.चंद्रशेखर यांनी शुक्रवार, 27/01/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख लिहायला घेताना का कोण जाणे, मला लुई कॅरॉल (Lewis Carroll) हे टोपणनाव घेतलेल्या लेखकाने लिहिलेल्या 'ऍलिस इन वन्डरलॅन्ड' (Alice in Wonderland) या पुस्तकातल्या काही प्रसिद्ध पंक्तींची खूप आठवण येते आहे. या पंक्ती आहेत
"The time has come," the Walrus said, "To talk of many things: Of shoes--and ships--and sealing-wax-- Of cabbages--and kings-- And why the sea is boiling hot-- And whether pigs have wings."
एकमेकाशी काहीही संबध नसलेल्या अनेक गोष्टींचा या पंक्तींच्यात जो असंबद्ध मेळ घातलेला आहे त्याला बहुदा कोठेही तोड नसेल.

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 27/01/2012 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्‍या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस.

पास्ता विथ 'रस्टिक' बेसील सॉस

लेखक Mrunalini यांनी शुक्रवार, 27/01/2012 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पास्ता - १ कप बेसील - १ वाटी पाने ऑलिव्ह ऑईल - ७-८ मोठे चमचे काळी मिरी पावडर - २ चमचे लसुण - २ पाकळ्या मिठ चवीनुसार चीज सजावटीसाठी कृती: १. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्या साठी ठेवावे. त्यात थोडे मिठ व १ चमचा ऑलिव्ह ऑईल टाकावे. २. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पास्ता टाकावा. ३-४ मिनिटे हा पास्ता शिजु द्यावा. पास्ता शिजल्यावर, त्यातील सर्व पाणी गाळुन घ्यावे. ह्या पास्ताला वरतुन थोडे तेल लावावे. त्यामुळे ते चिटकत नाहीत. ३. आता खलबत्त्यामधे बेसीलची पाने वाटुन घ्यावी. हि पाने वाटताना त्यात थोडे थोडे ऑलिव्ह ऑईल टाकावे.

स्वारगेटचा यमदूत

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 27/01/2012 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेटमधल्या एका डोके फिरलेल्या माने नामक एका एस टी बस ड्रायवरने तलवार चालवतात तशी बस चालवून अनेक लोकांना ठार वा जखमी केले. आता त्यावर बरीच चर्चा होईल. पण हा प्रकार थांबवता आला असता का? एस टी किल्लीशिवाय सुरू होणार नाही असे धोरण अमलात आणणे.

फुलगोबीची सुकी भाजी

लेखक वपाडाव यांनी शुक्रवार, 27/01/2012 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
या क्षेत्राचा तसा बिल्कुलच अनुभव नसल्याने इतके दिवस ज्या धाग्यांना फाट्यावर मारत असु, तिथे येउन पाकृ द्यावी लागणे म्हणजे अजबच आहे. पण भाजी करण्याचा पैला-वैला प्रयत्न अन तो ही सफल... म्हणुन म्हटले "लोहा गरम है मार दो हथोडा"... ================================================================ तर फुलगोबी म्हंजे फ्लॉवरची सुकी भाजी कशी बनवायची? सामग्री :: (२ जणांसाठी) मोठ्या फ्लॉवरच्या फुलातील २ लहान फुलं, मोहरी, जिरे, हळद, तिखट, काळा मसाला, अर्धे गाजर, लसुन-आलं पेस्ट, मीठ अन तेल. कृती :: सर्वप्रथम फ्लॉवरचे हातानीच लहान-लहान तुकडे करुन घ्या. मग ती फ्लॉवर धुवुन घ्या.