साहित्यः शिजवलेले बटाटे ३/४, २ वाट्या शिजवलेले (मटार + गाजर + कॉर्न + श्रावण घेवडा शेंगा), बारीक रवा, तेल, तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, बारीक चिरलेला लसूण, ब्रेड २/३, किंचित मिरपूड(ऑप्शनल)
क्रुती:
१)एका बाउलमध्ये शिजवलेले बटाटे मॅश करून घ्या. दुसर्या बाउलमध्ये शिजवलेले (मटार + गाजर + कॉर्न + श्रावण घेवडा शेंगा) मॅश करून घ्या. आणि आता ते चांगले एकत्र करा.
२) ब्रेड ओले करून लगेच पिळून घेऊन वरील मिश्रणात घालून चांगले एकत्र करा. मग त्यात चवीनुसार तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, मिरपूड आणि बारीक चिरलेला लसूण घाला. आणि मिश्रण एकजीव करा.