Skip to main content

भारताचे भावी पंतप्रधान...

लेखक कोदरकर यांनी रविवार, 18/09/2011 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो सध्या एक चर्चा आपल्या देशात रुजत आहे ती म्हणजे कोण असेल भारताचा भावी पंतप्रधान... राहुल गांधी चा तो जन्मसिध्द अधिकार आहे असे देशाला समजविले जात आहे आणि बहुतांश लोक हे ग्राह्य मानतात .. निदान सत्ताधारी नेते हाच विचार करत असावेत की अजुन ५ वर्ष मंत्री पद राहुल राहुल करत उप भोगावे.. जन्मसिध्द अधिकार या व्यतिरिक्त बाकी लायकी वादग्रस्त असुनही... त्यातुन च नरेन्द्र मोदी यांचे नाव ही काही जन वजनदार मानतात.. त्यांच्या मागे एक राज्य व्यवस्थित संभाळण्याचा अनुभव आणि प्रशासनावरील मजबुत पकड हा जमेचा भाग.. आज देशाला असलेली मजबुत नेत्याची गरज पाहता.. मोदींच्या पारड्यात मत टाकुन थोडा धोका पत्करावा वाटतो... आपले मत ???

वाचने 2830
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मुसलमान समाज मत निर्णायक ठरेल..तो समाज एक संध एक गठ्ठा मते डालतात ते.. आजचे वातावरण पहाता भारतिय राजकारणाचे दशा व दिशा मुसलमान समजाच्या हातात आहे असेच म्हणावे लागेल.

अण्णांच्या आंदोलनामध्ये राहुल गांधी पूर्ण दडून बसले होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर फार मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

चार्मींग प्रिंस शुड बी फ्युचर प्राईम मिनिस्टर ऑफ ईंडीया. आफ्टरऑल ही हॅज इट इन हिज जीन्स यु नो! ही लुक्स व्हेरी क्युट अँड हॅन्डसम. वू......म्मा. ईट इज हिज बेस्ट क्वालिफीकेशन फॉर इट.

In reply to by पाषाणभेद

त्यातून त्यांनी आणखी तो सुलेमान की कोण, त्याच्याकडून शर्ट टराटरा फाडून टाकण्याची विद्या शिकून घेतली, तर सोन्याहुन पिवळे.

अनुक्रमे एनर्जी, रिटेल, कन्स्ट्रक्शन, खाण उद्योग,ऑटोमोबाईल या क्षेत्रातील कंपन्यांना कोण जिंकून यायला हवे आहे?

मोदी(राष्ट्रीय लोकशाही आघाडी), नितीशकुमार (कदाचित तिसरी आघाडी), कॉंग्रेस कदाचित राहुलला पंतप्रधान पदासाठी पुढे आणणार नाही त्याऎवजी अजून एखादा मनमोहन हुडकला जाईल, आणि मायावती हे प्रमुख पर्याय दावेदार असतील. @ ऋषिकेश केंद्रात राज्यकर्ता कुणीही आला तरी त्याला एनर्जी, रिटेल, कन्स्ट्रक्शन, खाण, ऑटो इत्यादी उद्योगक्षेत्र आणि संस्थागत निवेशक यांच्यापुढे लोटांगण घालावेच लागते.

In reply to by अवरंग

केंद्रात राज्यकर्ता कुणीही आला तरी त्याला एनर्जी, रिटेल, कन्स्ट्रक्शन, खाण, ऑटो इत्यादी उद्योगक्षेत्र आणि संस्थागत निवेशक यांच्यापुढे लोटांगण घालावेच लागते.
:) आता असं बघा क्रिकेटमधे म्याच फिक्सिंग होते. तसं तर प्रत्येक टिम जिंकल्याने कोणत्या ना कोणत्या बुकीचा फायदा असतोच पण टीम एकच जिंकते! आणि जिंकून आल्या नंतर टिमला इतर धेंडांशी वैर घेण परवडत नाहीच न जाणो पुढच्या म्याचला त्याच्याकडून 'ऑफर' यायची