Skip to main content

धनवान माणूस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 20/02/2012 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
एक धनवान माणूस होता.. पण मुलगा अगदी वाया गेलेला होता.. व्यसने व मजा मौज या खेरीज त्याला दुसरा नाद नव्हता.. पित्यास त्याची खूप काळजी होती.. ...

वेलेंटाईन डे ( लग्नानंतर चा)

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 20/02/2012 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
तारुण्य.... नव तारुण्य नव दांम्पत्य सोबतीला दोन गुबगुबीत अपत्य कामाच्या धकाधकित वेळ जातो कसा कळतच नाही सांय समयी थकुन येता लगेच चहा नि बिस्किट खोल्या लहान गर्दी महान सखे तरि राहतेस प्र शांत रात्र प्रहरी धुंद प्रणय जिवाणु विषाणुंचा कहर सारं काही पचवतेस सुख हि नि दु:ख तुझा एंटी वायरस खरंच भारदस्त..... अपडेट होतो आपोआपच सकाळ ची लगबग..... डबा नास्ता मुलांची घाई सारं सारं आवरतेस झ्टपट वारध्क्य..... आता मी सेवा निवॄत्त नि तु पण रजोनिवॄत्त दंतकांति गमावलेले ओठ रोजच बघतात वाट...
काव्यरस

बारवीचे जंगल व आक्षीचा समुद्र..

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 20/02/2012 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी अचानक एखादा छंद आपला ताबा घेतो. वेळात वेळ काढुन, कधी महत्वाच्या कामांनाही टांग मारुन आपण त्या दुनीयेत हरवायला बघतो. जे आपण करायला बघतो ते कितपत जमतय, याबाबत उत्सुकता तर असतेच. अशीच काही मी काढलेली छायाचित्र, आपल्या सुचनांसाठी आणी माझ्या सुधारणांसाठी... सुरवात आक्षीच्या किणार्‍यावरचे काही वेडर्स.. सॅन्ड प्लोव्हर्स.. कळपाने फिरणारे, कळपाने उडणारे...

एकच - लिंगाणा

लेखक sagarpdy यांनी सोमवार, 20/02/2012 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गराज राजगड आणि स्वराज्याचे तोरण - तोरणा किल्ला यांच्या मधोमध, सह्याद्रीच्या कुशीत लपलेला प्रचंड सुळका - लिंगाणा. हा किल्ला शिवरायांनी १६४८ मध्ये चंद्रराव मोरेना पराभूत केल्यानंतर बांधला. सुळक्याचा आकार हा शिवालीन्गाशी बरेच साधर्म्य दाखवत असल्याने त्याचे नाव लिंगाणा असे पडले. या किल्ल्याचा मुख्य वापर हा तुरुंग म्हणून होई. मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आलेल्या कैद्यांना शिड्यांच्या मदतीने सुळक्यावर चढवण्यात येई आणि शिड्या काढून घेत. सुळका योग्य उपकरणे (किमान एक दोरी) असल्याशिवाय उतरणे शक्य नाही.

दमलेल्या ( पृथ्वी ) बाबाची कहाणी

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 20/02/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबापुरी नगरात वर्दी दिली भारी आदर्शचा राजा गेला नांदेडच्या वारी मुंबईतल्या पालिकेवर मारु बघ खेळी तिजोरीच्या चावीसाठी झुलतोमी उरी !! ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना .... मंत्रालयात उशीरा मी असतो बसून भंडावले डोके युत्या - आघाड्या करून तास तास जातो पास टेंडर करुन एक एक मंत्री जातो फाईली ठेऊन अशा वेळी काय सांगू काय काय वाटे यमुनेचे पाणी सर्व चहुकडे दाटे !! ना ना ना ना ना ...
काव्यरस

सैनिकी शिक्षणातून राष्ट्रनिर्माण.

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 20/02/2012 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
एका बाजुला स्वराज्य हा आपला जन्म सिद्ध अधिकार मिळविण्यासाठी घनघोर प्रयत्न चालू असताना या देशातल्या काही महान द्रष्ट्या असामींनी शेकडो वर्षांच्या आक्रमणांनी उध्वस्त झालेल्या या राष्ट्राच्या पुनर्निमाणाची तयारी स्वयंस्फुर्तीने आणि असामान्य देशभक्तीच्या जोरावर सुरु केली होती.

समुद्र-शंखशिंपले

लेखक शुचि यांनी रविवार, 19/02/2012 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राची गाज ऐकणे हा तुझा आवडीचा छंदच होता म्हणा ना. आपण कॉलेजचे तास बंक करून समुद्रकिनार्‍यावर गाज ऐकत तासनतास घालवले आहेत. तुला समुद्र आणि आकाशाच्या शांत नीळाईची ओढ असायची. समुद्राचा धीरगंभीर आणि मर्यादाशील स्वभाव तुला आकर्षित करायचे. याउलट समुद्रपक्षांची झेप, नारळीची झाडे, भणाणणारा खारा वारा हे माझे वीक पॉईंट्स असत. मला आकर्षक वाटणारी अजून एक गोष्ट जी केवळ माझ्या हट्टाखातर तू करत असे ती म्हणजे - चपला हातात धरून, मऊ मखमली रेतीतून चालणे. आठवतं तुला सुबक, कंगोरेदार , सोनेरी अथवा शुभ्र शंख-शिंपले मिळवण्यासाठी मी किती अट्टाहास करीत असे ते.

वॅलेंटाईन डे

लेखक रघु सावंत यांनी रविवार, 19/02/2012 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
वॅलेंटाईन डे खरं म्हणजे तूला सांगायची गरज नाही तुलाही माझ्या प्रमाणे ठाऊकच असणार कारण आजचा दिवसच असा आहे माझ्य मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे मला आठवते आपली ती पहिली भेट तेव्हाच माझ्या ह्र्द्याचा ठाव घेतलास थेट या सगळ्या आठवणी आज आठवतात खास कारण आजचा दिवसच असा आहे माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे तुझी माझ्या करिता उठलेली प्रत्येक नजर माझ्या करिता एक वेगळी अदा आहे म्हणुन तर मी तूझ्यावर फिदा आहे या देहाचा रोम रोम तूझी वाट बघतोय आज कारण आजचा दिवसच असा आहे माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे तुझं नेहमी स्वप्नात माझ्या येणं येऊन मला मोहून शहारून सोडणं मला तर ते आज पण हवं आहे कारण
काव्यरस

राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट !

लेखक मालोजीराव यांनी रविवार, 19/02/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज शिवजयंती...छत्रपतींच्या जीवनातल्या अनेक गूढ अद्याप संशोधन चालत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे भवानी तलवार, शिवजयंतीच्या निमित्ताने आज हा लेख लिहावासा वाटला.खाली दिलेल्या माहितीमध्ये मिपाकर नक्कीच अभ्यासपूर्ण भर टाकतील ! पुरेसा वेळ न मिळाल्याने लेख थोडा घाईगडबडीत झाला कृपया सांभाळून घ्या ! भवानी तलवार (जगदंबा तलवार) उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली.