परत दिवाळी येणार. लोकं "महागाई किती वाढली आहे!" म्हणणार आणि लक्ष्मीरोडवर खरेदीसाठी झुंबड उडवणार.
परत "हॅप्पी डिवाली" वगैरेचे मेसेजेस मिळणार, मी मग ह्याचे त्याला, त्याचे ह्याला असं करून ते परत करणार.
आयटी मधलं पब्लिक चितळे मधुन तयार फराळ आणणार आणि चॅटींग करताना किल्ला, घरकुल, न-उडलेल्या फटाक्यातली दारु काढुन उडवण्याचा आठवणींबद्द्ल भरभरुन बोलणार. "बाहेर" असलेले जास्तच नॉस्टॅल्जीक होणार.
मी पण, ह्यावेळी घरापासुन लांब आहोत पण 'आकाशदिवा तरी घरीच करुन लावायचा' असं ठरवणार पण परत न-करायला काहितरी निमित्त सापडणार.
मागच्या वर्षीपेक्षा एक्-दोन ऑनलाईन दिवाळीअंक जास्त निघणार. पण बहुतेक कागदी दिवाळीअंकावर बायकांचीच गुळगुळीत चित्रं असणार.
नटनट्या प्रेक्षकांना कोलगेट्छाप हसुन, "भरभराटीची, सुख-सम्रुद्धीची-सुरक्षीत" वगैरे विशेषणं लाउन, लांबलचक दिवाळीच्या शुभेच्छा देणार.
मारवाड्यांची मिठाईची दुकानं ओसंडुन वहात असणार आणि कुठेतरी, गुजरात मधुन आलेला कितीतरी शे-किलो भेसळयुक्त खवा-मावा जप्त होणार.
टिव्हीमधल्या कार्यक्रमात, बायका, ताटातुन आणुन घरभर तेलाच्याच पणत्या लावणार आणि षटकोनी बांबुच्या काड्यांनी केलेलाच आकाशदिवा लावणार.
पण लोकं मात्र तेलाच्या, मेणाच्या किंवा इलेक्ट्रीक पणत्या लावणार आणि पंनास रुपयांचा चायनिज आकाशदिवा घेणार.
दिवाळीच्या तोंडावर, "भारनियमन बंद करा" म्हणुन विरोधीपक्ष मागणी करणार आणि खेड्यात दोन-चार तास जास्त लोडशेडींग होणार.
बॅंकाही ग्राहकसेवेसाठी सज्ज झालेल्या असणार आणि पिशवी घेउन पेंशनसाठी रांगेत उभे असलेल्या अजोबांना एखादंतरी सोन्याचं नाणं घेण्याचा आग्रह होणार.
फटाकेमुक्त दिवाळीसाठी आवाहनं होणार, पण हजार-हजाराच्या माळा २-३ मिनिटात हजारो रुपयांचा धुर करत कानाचा पडदा फुटोस्तोवर वाजतच राहणार.
खास दिवाळीसाठी रांका नवीन दागिने लाँच करणार.
'त्याचा' बोनस बायकोच्या पाडव्यात आणि बहिणीच्या भाउबिजेत कधीच संपलेला असणार, पण तरीही गुरखा "शाब दिवाली कुशी" म्हणत लाचार चेहर्यानी दारात उभा असणार.
गायक-गायिका ऐन दिवाळीत, घरचं अभ्यंग-स्नान वगैरे सोडुन मायबाप रसिक-श्रोत्यांसाठी महागडी तिकीटं असलेले "पहाटगाणी" वगैरे कार्यक्रम करणार.
मुख्यमंत्री, पंतप्रधान, 'श्रीमंत लोकांच्या गरीब देशाला' दिवाळीच्या शुभेच्छा देणार.
दुसर्या दिवशी पेपरमध्ये मात्र, दिवाळीच्या संध्याकाळी फुटपाथवर झोपलेल्या भिकार्याचा "समाजिक विषमता" दाखवणारा फोटो येणार.
...दिवाळी परत येणार.
विशेष
वाचने
4201
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
यायलाच हवी ना!
कागदी दिवाळीअंकावर बायकांचीच
पैसातैशी सहमत प्रत्येक
मागच्या पानावरुन पुढे.
देन यू एन्जॉय इट विथ द डिफरन्स
च्यायला!
+१
In reply to च्यायला! by धमाल मुलगा
आवडला
In reply to च्यायला! by धमाल मुलगा
+१
In reply to आवडला by स्मिता.
+१
In reply to आवडला by स्मिता.