मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेषेवरची अक्षरे दिवाळी २०११: अंक चौथा

मेघना भुस्कुटे · · विशेष
मंडळी, सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही. इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे. दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे. अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत. तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो... ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद संपादक रेषेवरची अक्षरे २०११

वाचन 12694 प्रतिक्रिया 11
Permalink

मेघना, तुझे आणि सर्व टीमचे मनःपुर्वक अभिनंदन. खरं तर मागच्या आठवड्यात विचारणारच होतो. सलग चार वर्षे हा उपक्रम चालवत आहात तुम्ही. स्पृहणिय! अंक जरूर वाचेन.
Permalink

रेषेवरची अक्षरे दिवाळी अंक प्रकाशित करणार्‍या सर्व मंडळीचे अभिनंदन...!!! धनंजयचा आणि नचिकेतचा लेख वाचून संपवला. आपल्या वैचारिक जाणीवा रुंदावतात ते अशा काही लेखनाने. -दिलीप बिरुटे
Permalink

अभिनंदन! अंक सुरेख आणि अतिशय दर्जेदार आहे.
Permalink

कौतुकाबद्दल आभार मंडळी! काही चुका, तक्रारी, सुधारणा, सुचवण्या... यांचंही स्वागत आहे. त्यानंही खरंच खूप मदत होते...
Permalink

अंक चांगला काढला आहे. संपादक-लेखक-लेखिका-कलाकारांचे अभिनंदन! सहज सुचले म्हणून: "लैंगिकता आणि मी" या सदरात डॉ. आनंद नाडकर्णींचा लैंगिक शिक्षणावरून लेख चांगला ठरला असता.