Skip to main content

दिवाळी २०११

दीपावली साठी घरी बनवलेल्या पणत्या :)

लेखक पूनम ब यांनी मंगळवार, 01/11/2011 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसळ पाव कराना दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..या दिवाळी ला मी स्वताच घरी पणत्या बनवल्या..खूप छान अनुभव होता..रंगीत माती आणि गव्हाची कणिक याचा वापर करून सुंदर पणत्या तयार करता येतात.

दिवाळीचा फराळ : बेसन आणि खोबर्‍याचे लाडू

लेखक गणपा यांनी गुरुवार, 27/10/2011 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!! दिवाळी म्हटलं की रांगोळी, दिव्यांच्या रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजी सोबत आठवतो तो दिवाळीचा फराळ. तसा मी लहानअसल्या पासून तिखटखाऊ. फराळातल गोडं धोड सहसा आवडत नाही. अपवाद म्हणजे बेसनाचे लाडू. तर आजची सुरवातच या आपल्या लाडक्या बेसनलांडूंनीच करु.

भारताबाहेरील दिवाळी

लेखक विकास यांनी गुरुवार, 27/10/2011 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
नव्वदच्या दशकात जेंव्हा अमेरीकेत आलो, तेंव्हा ज्या काही गोष्टीं दुरावल्या असे वाटले त्यात दोन सण होते - एक अर्थातच गौरी-गणपती, तर दुसरा दिवाळी. याचा अर्थ बाकीच्या सणांना मिस केले नाही असे नाही, पण हे प्रकर्षाने आठवत होते...तस म्हणलं तर आज देखील हे सण घरातच जास्त असतात, त्यात कुटूंबियांप्रमाणे मित्रमैत्रिणींचा सहभाग असतो आणि अर्थातच मराठी मंडळाचे कार्यक्रम... बाकी बाहेर वातावरण "तेच ते, तेच ते"!

दिवाळी

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 26/10/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती प्रकाशाची करतील उधळण निमित्य आहे दिवाळीचं रांगोळ्यानी सजेल अंगण मित्र मंडळी जमतील आप्त फराळ होईल क्षणात फस्त मग शुभेच्छांच्या वर्षावात आनंदून जाईल आसमंत ..! अंगणात राँगोळी सभोवती पणत्याँची आरास दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या सहपरिवारास

छायाचित्रे- खास मिपासाठी

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 26/10/2011 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो/मैत्रिणिंनो, अगोदर मला सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा देऊ देत. सर्व मिपाकरांना व त्याच्या कुटूंबियांना माझ्या दिपावलीच्या शुभेच्छा, कृपया यांचा स्विकार करावा. आपल्यासमोर काही दारूकाम करत आहे, त्याची मजा लुटावी...