Skip to main content

बार बार देखो हजार बार देखो !

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 08/03/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या काळात हेमंत कुमार, नौशाद, सचिन देव बर्मन, रोशन, शंकर जयकिशन हे लोक प्रसिद्धिच्या शिखरावर होते त्या काळातही प्रसिद्धिपासून दूर राहून काम करणारी काही माणसे होती कलाकारापेक्षा त्याची कला अधिक प्रसिद्ध व्हावी असं भाग्य फ़ार थोड्यांच्या वाट्याला येतं. संगीतकार रवी, जयदेव हे त्यापैकीच रवी यांचे काल मुंबईत निधन झालं. पण ते रसिकांसाठी अनेक सुरेल आठवणी मागे ठेवून गेले आहेत. हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल याउलट आहे रवी यांचे जरा त्यांच्या कलाकृतीवर नजर टाकूया दिल की थी आरजू की कोइ ये

स्वप्नांस बाप आहे .!

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 08/03/2012 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे ) अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे.. स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा.. रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे. झाला सराव आता, बांबूस सारण्याचा.. स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा.. बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा.. गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना. झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा.. त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे. स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा.. नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी. आहे खडा पहारा, गल्लीत सासर्‍याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत

(का? का? का?)

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/03/2012 05:31 या दिवशी प्रकाशित केले.
(का? का? का?) (मुळ भांडवल आमचेच, म्हणजे हे!) अवेळीही कुणी का लिहीत जाती दिवसा रातीही का जागे राहती प्रतिसाद नच का कुणी देती वेळेवर का सारेच झोपती का न त्यांचे कॉम्पुटर जळती का न त्यांचे किबोर्ड तुटती प्रतिसाद देण्या तुम्ही का थांबले गिनीपिग उगा का प्रथम धजावले कंपुबाज सारे का जमून येती येथे येवूनी कट्ट्यावर का जाती का संपादक उगाच येथे असती "की, आम्ही येथे आहो" असे सांगती हा मी एकटाच का कधीचा बोलतो येथे कविताहूनही का येथेच विडंबतो - का बे

का? का? का?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/03/2012 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
का? का? का? पानांनाही कधी का येतो गंध फुलासारखे हुंगून होण्या धुंद पाण्याला कधी चढते निळाई जंगलात का असते हिरवाई रंग फुलांचे इतके का आगळे पाहून असे का होते ते नकळे डोंगरावर ते वृक्ष उभे का सावली देण्या ते तेथे का आकाशात ढग का जमून येती आता येथे मग कोठे जाती वारा भणाण उगा का वाहतो "की, मी येथे आहे" असे सांगतो हा मी एकटाच का कधीचा आलो येथला नसूनही का येथलाच झालो - पाभे
काव्यरस

आकाश उजळले होते,,,

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 08/03/2012 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आपल्या गुर्जींनी म्हणजेच अतृप्त आत्म्यांनी एका प्रतिसादात त्यांना सुरेश भटांच्या 'एल्गार'ची आठवण आली म्हणून सांगितले आणि आमच्याही मनात त्यासरशी त्यांची आठवण ताजी झाली. s.y ला असताना सुरेश भटांच्या गजला आमच्या अभ्यासक्रमात होत्या. खरं तर त्या वेळीच आमची आणि सुरेशभटांच्या गझलांची खरी ओळख झाली म्हणायची. त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये जणू एकप्रकारचा जादूच होता. आजही ती गझल वाचताना किंवा ऐकताना त्यातील श्ब्द न् शब्द मनाच्या खोल गाभार्‍यात कुठेतरी चर्रर्र करुन जातो. त्यातीलच गुगलमध्ये सापडलेली ही एक गझल=>
काव्यरस

गोबी मंचुरिअन

लेखक Pearl यांनी गुरुवार, 08/03/2012 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
गोबी मंचुरिअन हे माझं एकदम आवडतं स्टार्टर (पर्यायी मराठी शब्द सुचवा). ह्या रेसिपीची चव बर्‍याच प्रमाणात रेस्टॉरंट स्टाइल लागते.

भांग अ‍ॅट फर्स्ट (अ‍ॅन्ड लास्ट) टाइम

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 08/03/2012 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व 'सीनियर' मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता.