Skip to main content

तयार करा हिरवं पान

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 26/10/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
तयार करा हिरवं पान
दिवाळीचा फराळ खावून केलं जेवन काथ लावून तयार करा हिरवं पान ||धृ|| हिरव्या पानाच्या होsss हिरव्या पानाच्या शिरा हळूहळू खरडा देठ शेवटाला लागल तो पण खुडा तोंडानं म्हणा आपलं खुशीतलं गानं राया तुमी माजबी लावा की हो पान ||१|| पुढं ओढा जरा होsss पुढं ओढा डबा पानाचा तुम्हां जवळी त्यातच ठेवली पहा सुपारी चिकनी अडकित्यामधी फोडा तिला हाती धरून पानावर मग पसरा बारीक कतरून ||२|| प्रेमाचा गुलकंद लावा तुम्ही पानाला तयार झाल्यावर हातामधी द्या त्याला जवळी या आता खावून पान थांबून जा थोडं मन रिझवून ||३|| - पाषाणभेद
काव्यरस

वाचने 1025
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

असते आपापली शिस्टीम. हो का नाय हो पाभे?