Skip to main content

रवी चतुर्वेदी आता पद्मश्री !

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी बुधवार, 15/02/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी चार वाजता उठून भारत आणि ऑस्ट्रेलीयाची कसोटी पाहणा-या क्रिकेट चाहत्यांचा या वेळी चांगलाच हेटा झाला. वाईटातल्या वाईट पद्धतीने कसं हरावं याचा नमुनाच भारताच्या संघाने यंदा सादर केला. मात्र ऑस्ट्रेलीयामधील पहाटे उठून पाहिलेले सामने असोत किंवा वेस्ट ईंडिजमधले रात्री जागुन पाहिलेले क्रिकेट असो, ती मजा, ते थ्रील काहीतरी वेगळंच असतं. पुर्वी भारताबाहेरील सामन्यांसाठी रेडिओवर अवलंबुन रहावं लागायचं. "धूप खिली हुई और दर्शकोंमें उत्साह" या वाक्यापाठोपाठ येणारा हजारो प्रेक्षकांचा आवाज असो, किंवा "... अगली गेंद...ऑफइस्टंप के काफी बाहर..

भारत "IT" मध्ये प्रगत आहे म्हणजे नक्की काय आहे?

लेखक चेतनकुलकर्णी_85 यांनी बुधवार, 15/02/2012 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, मी एका सरकारी संधोधन आणि विकास प्रबोधानीत काम करतो..माझ्या कामा निमित्त गेल्या आठवड्यात एका अमेरिकन स्थित बेंगलोर मधील "software" विकसित करणाऱ्या कंपनी बरोबर संबंध आला ...आम्हाला त्यांच्या कडून एक "software" घ्यायचे होते जे अभियांत्रिकी शी निगडीत होते.परंतु त्यांनी हजार सबबी सांगून (अमेरिकन कायद्याचा हवाला देत... व "end use certificate" वर सही करणे आवश्यक आहे जे अर्थातच शक्य नव्हते ...) आमची ऑफर नाकारली. ह्या घटने वरून असा प्रश्न पडतो कि आपण रोज वाचतो कि भारतीय "IT" कंपन्यांनी इतकी प्रगती केली वगैरे वगैरे..

अ हेरिटेज वॉक..

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 15/02/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपासून ठरत होतं, पण योग यायचा होता. तो या शनिवारी आला. काळ्या घोड्याचंही एक निमित्त होतंच. फोनाफोनी करत, मोडकांना ट्रेनची सफर(ही हिंदी/मराठी बरं का, इंग्रजीमधली नव्हे) घडवत फोर्टात पोचलो. एलआयसीच्या दर वळणानजिक दिसणार्‍या शाखेबरोबरोबर रामदासांची ब्रांच ही तर नव्हे अशा शंका मनी बाळगत एकदाचे त्यांच्या हापिसात पोचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतानाच रामदासांनी टेबलाखालून एक मोठं बाड बाहेर काढलं, '१९४५ ते बहुधा १९५६ पर्यंतचे टाईम मासिकाचे अंक' होते ते. खजिनाच तो, दुसरा शब्दच नाही!! हापिसातून उतरून खाली आलो, आणि अलीबाबाच्या पोतडीतून एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली.

जय जय रघुवीर समर्थ...!

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 15/02/2012 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तरुण तडफदार उमेदवार मा. श्री. स्पा राजे डोंबिवलीकर (ठाकुर्लीकर--- > चो... बस्स) यांचा मी हापिसात काम करीत असताना (ल्ह्यायचं आस्तंय ;) ) फोन आला. डोक्यात ऑफिस नि कानात स्पाचा आवाज! काही कळेना म्हणून थांब मीच तुला फोन करतो म्हणून फोन ठेवला. नंतर नेहमीप्रमाणे खरडाखरडीतच नक्की काय विषय होता असे विचारले असता स्पाने ऐतिहासिक शैलीत 'समर्थांनी बोलावलंय, शिवथरघळीत जायचंय' म्हणून खरडवलं. शोधाशोध करतो म्हणून सांगून कामाला लागलो. ११, १२ फेब्रुवारी शनिवार, रविवार ठरलं. स्पा, सूड नी किसन हे त्रिदेव नेहमीप्रमाणे पाठीवर बॅग्ज घेऊन डोळ्यासमोर होतेच.

मेमरी कार्ड वापरता ? .......हे माहित आहे का?

लेखक कोल्हापुरवाले यांनी बुधवार, 15/02/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पैकी असे बरेच लोक आहेत जे मेमोरी कार्ड वापरतात. आज काल बर्याच प्रमाणात ओंनलाइन शॉपिंग केलं जात. बऱ्याच वेब साईट्स वर कमी किमती मध्ये अशी उत्पादने विकली जातात. जेव्हा आपण कार्ड विकत घेत असतो तेव्हा फक्त "किमंत" हा निकष लावला जातो. पण बर्याच लोकांना हे कदाचित माहित नसाव कि जे कार्ड आपण वापरतो त्याचे बरेच प्रकार असतात. मेमरी कार्ड चे वेगवेगळे क्लास असतात तुम्हाला असा जाणवलं आहे का तुम्ही घेतलेलं नाव कोर कार्ड खूप स्लो आहे.? फोटो काढला तरी सेव व्हायला खूप वेळ लागतो? या सगळ्याला १ गोष्ट जबाबदार असते ती म्हणजे मेमोरी कार्ड चा क्लास. आता म्हणाल त्याचा आणखी कसला क्लास ?

ब्युटी अँड द बीस्ट

लेखक शुचि यांनी बुधवार, 15/02/2012 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा व्हॅलेन्टाइन डे , " ब्युटी अँड द बीस्ट" हा कार्टून सिनेमांमधील माझा सर्वात लाडका सिनेमा पाहून मी साजरा केला. लहानपणी बाबांबरोबर हा सिनेमा पाहील्याचे आठवते. तेव्हा खूप म्हणजे खूपच आवडला होता. स्नो व्हाईट , लेडी अँड द ट्रँप वगैरे सिनेमे तर या सिनेमापुढे कुछ भी नही असे तेव्हा वाटले होते. याचे मुख्य कारण स्नोव्हाईट इतकी गोरीपान, फुलासारखी छान आहे की तिच्याशी स्वतःला "आयडेंटीफाय" करताच येत नाही. याउलट ब्युटी अतिशय "प्लेन" आणि पुस्तकी कीडा आहे. लहानपणी मी सहज ब्युटीशी स्वतःला आयडेंटीफाय करू शकले असावे. ते असो.

प्रतापगडाला कसे जावे !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 14/02/2012 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
काही माहिती हवी आहे प्रतापगडाबाबत गडाची उंची किती आहे. खालून वर चढत जाणे शक्य आहे का ! की फारच उंच आहे नाइट स्टे करण्यास काही सोय आहे का? वरती पिण्याचे पाणी मिळेल का जेवण वर मिळू शकेल का अथवा आपले आपण बनवण्यास परवानगी असेल का अन्य कोणती काळजी घ्यावी