एक संध्याकाळ "संतूर"लेली
संतूरच्या सुरांनी दरवळलेली एक संध्याकाळ ..... कुवेतच्या वाळवंटात एक सुखद, तरल, गोड झुळूक !!
संतूर हे वाद्यच मुळी अतिशय आनंदी आणि Romantic आहे आणि ते वाजवणारे जर साक्षात पंडित शिवकुमार शर्मा असतील तर.... ह्याहून जास्त कुणी काय अन् कशाची अपेक्षा करेल ..... ?
मंचावर ७४ वर्षे वयाचा अतिशय देखणा तरुण ..... आपल्या सुरांनी समोर जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. तरुणाई अजून वेगळी काय असेल ? कमालीचं आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले शिवाकुमारजी आपल्या आदबशीर बोलण्यानं मैफिलीची सुरवात करतात. फक्त कान नाही तर डोळे सुद्धा आसुसून वाट बघायला लागतात. काय पेश करणार आहेत ते छानपैकी समजावून सांगतात.
मिसळपाव