मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांगल्याचे औक्षण करूनी..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मेंदी भरले पाऊल घेऊन पहाट अवतरली.. अलगद नाजूक, धरतीवरती चाहूल थरथरली.. जागी झाली सृष्टी सारी ऐकून भूपाळी निळेजांभळे क्षितिज तेव्हा झाले सोनसळी क्षितिजावरती डोकावुनीया हळूच तो हसला आळसावल्या चराचराला सूरही गवसला लगबग झाली दहादिशांतुन तया पाहण्याला ओलेत्याने सज्ज जाहल्या जणू स्वागताला धरतीवरती शिंपण झाले सडा रांगोळ्यांचे मनी मानसी दीप उजळले नविन आशांचे काळोखाची संपून जाईल मुजोर बळजोरी आकांक्षांची किरणे येतील हसून सामोरी नविन आशा आकांक्षांनी भरु दे ही झोळी मांगल्याचे औक्षण करूनी हसेल दिवाळी.. - प्राजु

वाचने 3150 वाचनखूण प्रतिक्रिया 11

जाई. 25/10/2011 - 22:49
मस्त प्राजुतै दिवाळीला सुंदर काव्याचा फराळ दिलास

प्रचेतस 25/10/2011 - 22:53
सुंदर, मंगलमयी कविता. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

पैसा 26/10/2011 - 00:01
तुला पण दिवाळी शुभेच्छा!

चित्रा 26/10/2011 - 00:56
दिवाळीच्या प्रसन्न पहाटेचे वर्णन आवडले.