चुकवू नये अशी - कहानी
नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर एका दमट दुपारी ती दारातून बाहेर पडते - विद्या वेंकटेशन-बाग्ची; सहा-सात महिन्यांची पोटुशी, चालताना दम लागणारी. टॅक्सीचालकांचा गराडा तिच्याभोवती पडतो. त्यातला एक जण चलाखीने तिच्या बॅगचा ताबा घेतो आणि तिला आपल्या टॅक्सीत बसवतो. बहुतेक लोक घराचा किंवा हॉटेलचा पत्ता सांगतात, पण चालकाला आश्चर्य वाटते कारण तिला जायचं असतं कालीघाट पोलीसचौकीत.
पोलीसचौकीत ती तक्रार नोंदवते. तिचा नवरा - अर्णब बाग्ची - लंडनहून दोन महिन्यांपुर्वी नॅशनल डेटा सेंटरमध्ये असाईंनमेंटवर आलेला असताना अचानक गायब झालेला आहे; तिच्याकडे त्यांच्या लग्नात काढलेला त्याचा एकमेव फोटो आहे.
मिसळपाव