Skip to main content

केबल कफ कॅप

लेखक जयवी यांनी सोमवार, 12/03/2012 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवसांपूर्वी नेटवर सर्फिंग करता करता क्रोशे कामाचा एक सुरेख ब्लॉग दिसला. तो बघतांना एक केबल कफ कॅप दिसली. मनापासून आवडली. ३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली. तिथे एकाच रंगात होती.

बालपण

लेखक संदीप२७ यांनी सोमवार, 12/03/2012 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे पुन्हा एकदा त्या निरागसकतेचे प्रतिक व्हायचे आहे.. कधी घाबरता जगातील दुष्ट प्रवृत्ती,गोष्टींना हलकेच आईच्या कुशीत शिरायचे आहे पुन्हा एकदा मला तिच्या कुशीतील उबदारपण अनुभवायचे आहे..

एकदाच यावे सखया...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 12/03/2012 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)
अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा.

मेरे अवगुन चित ना धरो...

लेखक चैतन्य दीक्षित यांनी सोमवार, 12/03/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोण गती जगलो हे जीवन? केली किति पापे? हरि, हरि आता सगळ्या दु:खा, शिणलो भवतापे | आयुष्याची गाडी उताराला लागली आणि मागे वळून पाहिलं तर दिसलं ते अविचारानं जगलेलं जीवन. आनंदाच्या क्षणी धुंद-मत्त होऊन तुला विसरलो, दु:ख झालं तेव्हा माझं कर्म न पाहता तुलाच विचारले की "हाच का तुझा न्याय?" सुख-दु:खांच्या लाटांमध्ये हेलकावे घेत, मन नाचवेल तसा नाचलो पण काही केल्या मला माझं वागणं तपासून पहावंसं वाटलं नाही. मी माझ्या चुका मात्र पाहिल्याच नाहीत.तुला विसरलो रे मी!

अचप्पम / अच्चप्पम

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 12/03/2012 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ३०० ग्राम तांदळाचे पीठ २ अंडी दीड वाट्या नारळाचे दूध (मी कॅनमधले वापरले आहे ) १ टेस्पून काळे तीळ १/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, अचप्पम / अच्चप्पम हे बेताचेच गोड असतात) १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स (ऱोझ एसेन्सचा ही वापर करु शकता) अचप्पम / अच्चप्पम बनवण्याचा साचा . पा़कृ: एका भांड्यात तांदळाचे पीठ व नारळाचे दूध एकत्र मिक्स कर

मंत्रालयाच्या दारातल्या उपेक्षिताचं मनोगतं

लेखक रघु सावंत यांनी रविवार, 11/03/2012 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
१०/०५/२००५ साली मंत्रालयाच्या दारात एका शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता .ती घटना इतकी मनात कोरली की आजही ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिल कि अंगावर काटा उभा राहतो.

दुधिया हलवा ---

लेखक निवेदिता-ताई यांनी रविवार, 11/03/2012 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य -- एक छोटा कोवळा दुधी भोपळा, एक लिटर दुध, दोन चमचे साजूक तूप, पाच टे.स्पून साखर किंवा आवडीप्रमाणे, काजू - बदाम काप, थोडे बेदाणे, थोडीशी वेलदोडा पुड. कॄती -- प्रथम भोपळ्याच्या साली काढून घ्या. खिसून घ्या. आता कढईमध्ये तूप घाला व त्यावर भोपळा खिस घालून चांगला परतून घ्या व आता त्यामध्ये दूध घाला, गॅस बारीक करा, आता तुमचे काम फक्त येताजाता ते ढवळत रहाणे. तुमचे काम तुम्ही करु शकता, मिपावर येउन गप्पा मारु शकता.कारण हे तयार व्हावयास जवळ जवळ एक तास तरी जातो. आता हे दुध आटत जाउन त्याचा छान खवा बनू लागतो.

मराठी गझल.

लेखक तर्री यांनी रविवार, 11/03/2012 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मित्र गंगाधर मुटेसाहेबानी काल हझल पेश केली. तेंव्हा पासून मराठी गझलेकडे परत आलो. माझ्याकडे गझलां संग्रह अगदीच थोडा आहे. ( तुलना :नाट्य-संगीत / शा.संगीत / भावगीत). गझल कवितेसारखी वाचून मजा घेता येत नाही. त्यामुळे ज्या गझलांना चाली लावण्यात आल्या त्याच माझ्या ऐकण्यात आल्या.पण त्यांची संख्या अगदीच कमी.मुख्यत: प.हृदयनाथांच्या काही गझला व भिमरावांच्या थोड्याफार. हा संग्रह वाढवायला मिपा सारखे माध्यम नाही. तर दोस्तहो आपल्या आवडत्या गझला गुंफत चला. माझ्याकडच्या काही गझला सांगतो :- १. तू नाभातते तारे ( भीमराव) २. आंदाज आरश्याचा ( भीमराव) ३.आयुष्य तेच आहे ( भीम राव ) ४.