Skip to main content

शोधू किती बहाणे...

लेखक सांजसंध्या यांनी गुरुवार, 29/11/2012 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
आधार टाळण्याचे, शोधू किती बहाणे एकांत पाळण्याचे, शोधू किती बहाणे शिशिरात मोग-याचा, फुलला इथे फुलोरा गजरा न माळण्याचे, शोधू किती बहाणे ती भेट त्या दिसांची, रात्रीस ओढ देते विरहास भाळण्याचे, शोधू किती बहाणे देहात जागणा-या, वणव्यात आग आहे इच्छांस जाळण्याचे, शोधू किती बहाणे ही ओल पावसाची, स्वप्नास स्पर्शणारी नक्षत्र गाळण्याचे, शोधू किती बहाणे आशा जरी न होती, ना नांदते निराशा आनंद चाळण्याचे, शोधू किती बहाणे संध्या २९.१२.२०१२
काव्यरस

गरीबांसाठी नगद नारायण

लेखक विकास यांनी गुरुवार, 29/11/2012 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री श्री. पी.चिदंबरम यांनी त्यांच्या शब्दात, "गेम चेंजर" योजना जाहीर केली, ज्यानुसार सरकारी दारीद्र्य रेषेखालील व्यक्तीस/कुटूंबास गॅस, पेट्रोल, पेन्शन, रोजगार योजनेंतर्गत रोजहार, शिक्षण, आरोग्य इत्यादींसाठी जी काही अप्रत्यक्ष सबसिडी होती ती आता त्यांच्या आधारकार्डाचा वापर करून प्रत्यक्ष म्हणजे नगद रुपात त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जाणार आहे. चिदंबरम आणि जयराम रमेश यांनी याला "तुमचा पैसा तुमच्या हातात! " असे म्हणले आहे.

चावडीवरच्या गप्पा - स्मारक

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 29/11/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “काय मंडळी, कशी काय झाली दिवाळी?”, भुजबळकाका, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत. “ठीक ठाक! महागाईने त्रस्त असलेल्या लोअर मिडलक्लासला परवडेल अशीच झाली.”, नारुतात्या उसने हसू चेहेर्‍यावर आणत. “हो, पण बाळासाहेबांच्या जाण्याने दिवाळीचा आनंद झाकोळला मात्र गेला.

पंख

लेखक ज्ञानराम यांनी गुरुवार, 29/11/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा.. हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा.. तु असताच सोबत , नाही तमा ग कसली.. बेभान बरसूदे ह्याला , तुझ भिती कसली ग असली.. क्षण क्षण होऊदे चिंब , अन गात्रात मुरुदे थेंब. भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग.. थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग. सर ओसरेल आता , चोचीत थेंब घे ग. ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात, बघ थांबेल पाऊस आता , मग परतूया घरट्यात..
काव्यरस

झटपट चॉकलेट मफिन्स

लेखक खादाड अमिता यांनी गुरुवार, 29/11/2012 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
Chocolate muffins पुन्हा एकदा पाक्रु कडे वळायचे ठरवले आहे. आता आधी सारखे वरचेवर पोस्ट करता येण अवघड दिसतंय पण प्रयत्न प्रामाणिक असेल. अवघड का? अहो, ११ महिन्याचा आमचा 'राजस' काही वेळ देईल तर नं! असो. आता पटकन मफिन्स करून बघा पाहू.

धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 29/11/2012 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...??? प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D र ला ट जोडले कसेतरी यमक जुळले बसल्या बसल्या कविता पडली हे मलाच कसे नाही कळले??? अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे.. कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून, पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून... यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ... पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' *(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)

राजे संभाजी

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 29/11/2012 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
धगधगता अंगार होता अतुलनीय वीर होता वाघासारखा शूर होता *****संभाजीराजा जेवढा हळवा कवी होता तेवढाच कणखर बाणा होता रणांगणी धधडणारा वणवा होता ***** संभाजीराजा धर्माचा अभिमानी होता मराठा असण्याचा गर्व होता शूर सिंहाचा छावा होता ***** संभाजीराजा मातृपितृ भक्त होता भवानीमातेचा दास होता स्वराज्याचा प्राण होता ***** संभाजीराजा राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर

नेहेमीच असं होतं, असं नाहि !

लेखक जेनी... यांनी बुधवार, 28/11/2012 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमीच असं होतं ,असं नाहि.. पण जेव्हा होतं ,तेव्हा सगळ बेचैन होतं कुठल्याशा एका अनामिक भितीनं , सगळच जग हळुहळु व्यापून जातं ... अश्यावेळी मायेच्या एकाच शब्दाची फुंकरहि बास होते पण ती भोवताली घुटमळणार्‍या कुठल्याच मुखातुन येत नाहि. असं का?.. अगदी कासाविस ..! बराच वेळ जातो ,सुचत मात्र काहिच नाहि , आजुबाजुला खळखळुन हसणारं कुणीतरी हवय असं वाटु लागतं ..पण ..पण आत्ता कुणीच नाहि ! कुठेतरी शुन्यात नजर लागते,फार उशिर झालाय ह्याचीहि तेव्हा काळजी नसते.. कुठे जायचय ?
काव्यरस