असे का?
"तुला हा रोजचा अनुभव असेल"?
???
"तरी सुद्धा तपासुन पहा".
????
तुला एक मुलगा मला पण एकुलता.
?????
"अगदी स्वतः च्या घरातुन सुरु कर".
?????
"मी म्हणतो ते पटते का बघ".
काय पटायला पाहीजे? काय तपासु?
"मी अगदी जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली. कधी मारले नाही. ओरडले नाही. अगदी जास्त हट्ट केल्यावर थोडेसे डोळे वटारणे ह्या वरच थांबलो. एवरीथींग बाय बुक. तरी सुद्धा असे का हे कळत नाही.
नेमके काय कळत नाही?
"नाही म्हणजे नाते संबंधात मुलाचा ओढा आईकडे जास्त असतो आणि मुलीचा बापाकडे. असे का? तुझा काय अनुभव?
दहा च्या पट्टीवर तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या संबंधाला मार्क किती? आणि आईला किती"?
मला ६/१०.
गोष्ट एका माणसाची - १
|| ॐ ||
पावसाची रिपरिप अजुनही थोडी चालु होती . गेला आठवडाभर पाऊस काही ऐकायच नाव घेत नव्हता . सारे ओढे नाले अगदी भरभरुन नर्मदामाईला मिठी मारत होते . नर्मदेच्या प्रचंड प्रवाहाचा खळखळाट इथे ही ऐकु येत होता . इतकया दुरवरही ...अगदी स्पष्ट ...त्यात आजच्या ह्या जराश्या उघडीपी मुळे जणु रातकिड्याना जागे केले होते अन तेही सुरात सुर मिळवायचा प्रयत्न करत होते त्याला शेजारच्या पिंपळपानांच्या सळसळीचीही सोबत होती . सार्यानाच जणु लय सापडली होती . हवे मध्ये प्रचंड गारवा भरुन राहिला होता. नुसताच गारवा नव्हे तर तिथेही निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली होती . मातीचा, झाडांचा, पानांचा, गवतांचा,....
दीप
तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे
गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले
शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने
अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...
काव्यरस
कविता
तु मला नेहमी विचारायचीस ना
की कश्या रे जमतात तुला कविता ..?
मी तुझ्या आठवणीत पेन फक्त कागदावर ठेवतो
मग आपोआप वाहतात शब्दांच्या सरिता ...
सु.द.मोरे
गोंय (गोवा) - पाटणें बीच - १
गोवा! हा शब्द जरी नुसता ऐकला तरी माझ्या अंगात एक चैतन्याची लहर फिरून जाते; इतका गोवा मला आवडतो. स्पेसिफिक कारण असे कोणतेही नाही. आता अगदी जरी जोर लावून विचारलेच कोणी तरीही कदाचित नक्की कारण सांगता येणार नाही पण प्रयत्न करतो, गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ!
पहिल्यांदा गोव्याची सफर घडली १५ वर्षांपूर्वी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यावेळी, त्या वयानुसार, मला गोवा भेटला आणि भावला तो बांद्याच्या चेकपोस्टवर. बांद्याची चेकपोस्ट पार करून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि नजरेला पडलेला नजारा म्हणजे रस्त्याच्या बाजूला ओळीने असलेले बियर बार्स आणि वाइन शॉप्स.
मुद्राराक्षस किंवा एका अंगुलीयकाने.
लॉर्ड ऑफ द रिंग्जचे जरा जुनाट पद्धतीने केलेले वर्णन आहे.
मनाला समाधान देणारी घटना (आपले मत अपेक्षीत आहे)
हि कथा वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगावे
***************************************************************
तो काळच असा होता कि त्यावेळी माझे मन पूर्णपणे अध्यात्ममय झाले होते. दर वर्षी श्रावणात ग्रंथ वाचण्यासाठी गावात मला बऱ्याच ठिकाणी मागणी असायची. (ऐकाणारांच्या मते ) मी वाचून अर्थ सांगितला कि सगळे समजते. त्यामुळे रात्री दोन ठिकाणी आणि सकाळी एका ठिकाणी ग्रंथ वाचण्यासाठी मी जात असे. याच्यापेक्षा जास्त वेळ मी देऊ शकत नसे. तर त्यावेळी मी पूर्ण अध्यात्म मय झालो होतो. शिवाय पहिल्यापासून माझ्या मनात भक्तीची खूप आवड निर्माण झाली होती.
द सिंपसन्स : वेगळेपणातले वेगळेपण
सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्या एका परिवाराभोवती फिरते.
मिसळपाव