Skip to main content

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

लेखक चिर्कुट यांनी गुरुवार, 13/12/2012 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा दिवाळीच्या काळात १ आठवड्याच्या सुट्टीवर घरी गेलो होतो. माझे वाढलेले आकारमान पाहुन बरेच टोमणे बसत होते, तरीही फराळ/इतर खाणं हादडणे चालूच होते. :) पण एके दिवशी अचानक लक्षात आलं की माझा मलाच मी उचलत नाहीये.. :( त्यात माझ्या घरी शुगरची हिस्ट्री आहे, त्याची भीती आहेच. मग ठरवलं की आता शेंडी तुटो वा पारंबी, वजन कमी करणारच.. मी असं बोलून दाखवायचा अवकाश की सल्ल्यांचा भडीमार सुरु झाला. 'एक वेळचं जेवण बंद कर', हे खाणं सोड, ते खाणं सोड, असा व्यायाम कर, तसा प्राणायाम कर, नुसतं हैराण करुन सोडलं होतं सगळ्यानी.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 13/12/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.

खूप दिवसांपूर्वी कुठेतरी असं वाचलं होतं की पिकांना वाढीच्या काळात संगीत ऐकवल्यावर त्यांची उत्तम  वाढ होऊन सकस व भरपूर उत्पादन होते. गायींना दोहताना संगीत ऐकवल्यास दूध सरसरीपेक्षा जास्त मिळते. पशु पक्ष्यांप्रमाणेच वनस्पतीनाही जीव असतो हे जीवशास्त्रात वाचले. पण वनस्पतींना ‘आत्मा’ असतो का ? प्राण्यांना जसे शिकवले तर त्यांच्याकडून विविक्षित कृती करवून घेता येतात तसे वनस्पतींचेही असते काय ?  उच्चारित किंवा अनुच्चारित आज्ञा / सूचना / विनंती त्यांना समजते काय ? गोनीदांच्या कादंबऱ्यातून झाडांशी बोलण्याचे प्रसंग खूपदा दिसले आहेत.

कैसे दिन बीते, कैसे बीती रतिया

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 13/12/2012 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
पंडीत रविशंकरजींना श्रद्धांजली वाहण्याच्या निमीतानं त्यांनी स्वरबद्ध केलेलं एक अनोखं गाणं चित्रपट अनुराधा, कवी शैलेंद्र ..हाये.. कैसे दिन बीते कैसे बीती रतिया पिया जाने ना ..हाये.. कैसे दिन बीते कैसे बीती रतिया पिया जाने ना नेहा लगा के मैं पछताई सारी सारी रैना निन्दिया ना आई जान के देखो मेरे जी की बतिया.. पिया जाने ना ..हाये.. कैसे दिन बीते कैसे बीती रतिया पिया जाने ना रुत मतवाली आ के चली जाये मन में ही मेरे मन की रही जाये खिलने को तरसे नन

माळरानी खडकात जेव्हा रुजते बियाणे...

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 13/12/2012 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील भिजायची नाहीत. कमी ओलीमुळे दाणा पीठाळला नि उगवण चांगली झालीच नाही. उगाच कुठतरी फुटा दोन फुटावर मोड दिसत होता. अर्ध्या एकर शेतात पेरलेल्या भुईमुगाच्या विरळ मोडांकडे हताशपणे पाहत रायाजी बसला होता. वीस किलो बी त्याने बाराशे रुपयांचे घेतले होते.अजून जगुनानाचे पैसे दिले नव्हते.

माझी बाईक भ्रमंती - दक्षिण भारत

लेखक नानबा यांनी गुरुवार, 13/12/2012 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची असं बरेच दिवस मनात असावं, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय यावा, आणि मग अचानक एके दिवशी ती संधी स्वत:हून चालत आपल्या दारी यावी, याहून दुसरा आनंद तो कशात असणार? माझ्या बाबतीत असंच काहीसं घडलं. कित्येक दिवसांपासून बाईकवरुन कुठेतरी लांब भटकायला जायचं मनात होतं, आणि यंदाच्या दिवाळीत अखेरीस ती संधी आली. मी आणि सोबत अजून ३ riders नी सुट्ट्यांचा फ़ायदा घेऊन एक आठवड्याचा बेत ठरवला, आणि जागा ठरली ती दक्षिण भारतातील कर्नाटकाची किनारपट्टी आणि पश्चिम घाटांमधील काही भाग.

वालक्या

लेखक वसईचे किल्लेदार यांनी बुधवार, 12/12/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणी माझ्या बऱ्याच आठवणीत असणारा आमचा वालक्या... माझ्यापेक्षा साधारण 10-15 वर्षे मोठा असेल. नक्की सांगता येणार नाही. सर्वांसाठी फक्त वालक्याच. त्याच्याही नजरेत कधीही कुणासाठीही दुजाभाव दिसला नाही. कुणाच्याही खिजगणतीत नसणारे हे एक अजब रसायन. बहुधा देवाला दुर्लक्षून जन्मला असावा. त्यामुळेच ईतर कुणीही त्याच्याकडे फारसे लक्ष देतांना पहाण्यात आले नसावे. सकाळी सकाळी शाळेच्या समोर, रस्त्याकडेला हा उभा. अंगात काळसर, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि खाकी विजार. ती हि अर्धी. पायात चप्पल असल्याची कधी पहिलीच नाही. पाय सतत चालते, पण जागीच.

प्रॉन्स - मशरुम करी

लेखक दिपक.कुवेत यांनी बुधवार, 12/12/2012 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रॉन्स - मशरुम करी बायको: काय रे उद्या डब्याला काय हवयं? मी: काहीही चालेल (हे आपलं मोघम उत्तर पण ती काय देणार आहे ह्या कडे हळुच कानोसा :) तशी मला खोडी नाही पण नुसते परतलेले मुग म्हणा कींवा नुसती भेंडी घश्याखाली नाही जात...गेलाबाजार नीदान त्यात किमान कांदा तरी हवा. काय करणार जीभेचे चोचले... असो, तर सर्व पर्याय संपले की बायको हळुच प्रेमळ विनंती वजा आदेश करते...ठिक आहे मग तुला हवं ते तु कर. थोडक्यात मला (बायकोला) आराम दे. मग तसा ४/५ दिवस भाज्या खाउन मलाही कंटाळा आलेला असतो...अशा वेळि मासे / प्रॉन्स मनापासुन आवडत असल्याने ते अशा आणिबाणिच्या वेळेस कामाला येतात.

अपने होने पे मुझको यकीन आ गया...

लेखक मोदक यांनी बुधवार, 12/12/2012 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
********************************************************************************* सदरचा लेख मिपावर प्रकाशित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल सुचेता कडेठाणकर यांचे खास आभार. "महा अनुभव" या मासिकामधून साभार. ********************************************************************************* चीनच्याही पलिकडे आहे मंगोलिया. या देशातल्या गोबीच्या वैराण वाळवंटातून तब्बल सोळाशे किलोमीटर चालून आलीय सुचेता कडेठाणकर. सलग ५२ दिवस चाललेल्या या कष्टप्रद पायपिटीतून ती तावून सुलाखून निघालीय. गोबी हे आशियातलं सर्वाधिक लांबीचं वाळवंट. ते अंतर पायी पार करणं म्हणजे भल्याभल्या गिर्यारोहकांनाही आव्हान वाटतं.