साहित्यः- गाजरे अर्धा कि., कांदे ६-७ मध्यम, बटाटे २ (ऐच्छीक), काजूगर एक वाटी, आले-लसूण पेस्ट (१ इंच आले+१०-१२ लसूण पाकळ्या), खसखस पाव वाटी, पांढरे तीळ पाव वाटी, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट्,तेल पाच चमचे, आमचुर एक छोटा चमचा,मीठ, साखर, ह्ळद, मोहरी, जीरे, कोथिंबिर.
क्रुती:- खसखस, तीळ वेगवेगळे भाजुन पावडर करून घ्यावी. आले-लसूण पेस्ट करावी. गाजराचे छोटे लांबट तुकडे करावे. कांदे पातळ उभे चिरावे. काजुगर कोमट पाण्यात भिजवावे. बटाटे गाजराप्रमाणेच लांबट चिरावे. कोथिबिर धुऊन बारीक चिरावी.
कढईत तेल गरम करावे. मोहरी, जीरे घालावे. मोहरी तडतडली की कांदा घालावा. पाच मिनिटे परतावा.