गरीबांसाठी नगद नारायण
या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री श्री. पी.चिदंबरम यांनी त्यांच्या शब्दात, "गेम चेंजर" योजना जाहीर केली, ज्यानुसार सरकारी दारीद्र्य रेषेखालील व्यक्तीस/कुटूंबास गॅस, पेट्रोल, पेन्शन, रोजगार योजनेंतर्गत रोजहार, शिक्षण, आरोग्य इत्यादींसाठी जी काही अप्रत्यक्ष सबसिडी होती ती आता त्यांच्या आधारकार्डाचा वापर करून प्रत्यक्ष म्हणजे नगद रुपात त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जाणार आहे. चिदंबरम आणि जयराम रमेश यांनी याला "तुमचा पैसा तुमच्या हातात! " असे म्हणले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या मुळे जो पैसा व्यवस्थेतील तॄटीमुळे गळतीस लागतो, तो आता प्रत्यक्ष हातात पडल्यामुळे भ्रष्टाचारास आळा बसेल आणि गरीबांना फायदा होईल.
या योजनेअंतर्गत, सरकारी अंदाजानुसार दारीद्र्य रेषेखालील कुटूंबाच्या बँकेच्या खात्यात घरटी, सरासरी रू. ४०,००० इतके वार्षिक नगद सरकार कडून जमा होतील. १ जानेवारीपासून ही योजना, १५ राज्यांत आणि ५१ जिल्ह्यात अंमलात येणार आहे. चिदंबरम यांच्या म्हणण्यानुसार यामुळे सरकारी तोजोरीवर अतिरीक्त बोजा तर पडणार नाहीच पण पैसे वाचणारच आहेत. अर्थात किती आणि कसे ते त्यांनी सांगितलेले नाही.
कुठल्याही देशातील कुठल्याही सरकारने कधिही "लोकहीतवादी" म्हणत जर योजना जाहीर केली, ज्यात पैशांची transaction आहे, तर त्यावर संशय घेणारे अर्थातच असतात. त्या संशयात जसे राजकारण हा एक मुद्दा असतो तसेच त्या योजनेची व्यवहार्यता पण चर्चेत येते, येयला हवी आहे. भाजपा आणि कम्युनिस्ट पक्षाने या योजनेस विरोध केला आहे. त्यातील राजकीय वास हा लोकसभेच्या पुढील वर्षाअखेरच्या (किंवा त्या सुमारासच्या) निवडणू़का आहेत. त्यामुळे ही जनतेस दिलेली लाच आहे असा आरोप केला गेला, ज्यावर अर्थातच चिदंबरम चिडले. पण व्यवहार्यतेच्या मुद्द्यात विरोध करायची कारणे आहेत: (१) सर्वच गरीबांकडे बँकेचे खाते नसते. (२) बँका प्रत्येकास जवळ नसतात (३) आत्ता जे काही सबसिडीतून अप्रत्यक्ष मिळायचे, ते प्रत्यक्ष पैशाच्या रुपात मिळाल्यावर त्याच गोष्टींवर पैसा खर्च होईल याची खात्री नाही. विशेषतः पुरूष तो पैसा इतर गोष्टींसाठी (दारू, धुम्रपान इत्यादीसाठी) अतिरीक्त पैसा म्हणून सहज वापरू शकतील. (४)अजून या कॅटेगरीतील जनता अंगठेबहाद्दर आहे. त्यांचे अंगठ्यांचे ठसे हे सतत हाताच्या कामाने (तसेच वृद्धापकाळाने) बदलतात जो प्रश्न होऊ शकतो. ...
थोडक्यात असा पैसा वाटप योग्य आहे असे आपल्याला वाटते का? का हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे? यामुळे भ्रष्टाचार थांबू शकेल का पद्धत बदलेल? जर पद्धतच बदलणार असेल तर ती कशी बदलेल असे वाटते? राजकारणाचा विचार केल्यास तमाम भ्रष्टाचार प्रकरणे आणि कुठलीच ठोस पाऊले आणि विकास घडवू न शकल्याने संपुआ घायकुतीस आले आहे का, ज्यासाठी हा अजून एक (desperate) प्रयत्न करून बघणे चालले आहे?
त्याही व्यतिरीक्त एक महत्वाचा मुद्दा: अशा प्रकारे प्रत्यक्ष नगद हवाली करून आपण आधीच गरीब असलेल्या जनतेस अजून नाकर्ते (/आळशी) तर करत नाही आहोत ना?
वाचने
11472
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
हा पैसा कुठे खर्च होतोय हे
In reply to हा पैसा कुठे खर्च होतोय हे by कवितानागेश
नसावा
In reply to नसावा by विकास
अश्या प्रकारे पैसे डायरेक्ट
In reply to अश्या प्रकारे पैसे डायरेक्ट by कवितानागेश
पाईपलाईनला गळती आहेच. पण समजा
कल्पक योजना
In reply to कल्पक योजना by श्रीरंग_जोशी
तो विनोद !
In reply to तो विनोद ! by चौकटराजा
कृपया विकी पहा
काही उत्तरे
क्लिंटन ..सुरेख विवेचन.
In reply to क्लिंटन ..सुरेख विवेचन. by अविनाशकुलकर्णी
+१
क्लींटन यांच्या प्रतिसादाने
उत्तम लेख
In reply to उत्तम लेख by पैसा
++ १
फुडस्टँप + कामाचा आळस
In reply to फुडस्टँप + कामाचा आळस by विकास
राजकारण
In reply to राजकारण by क्लिंटन
हो/नाही
नाण्याच्या दोन बाजू
चांगले पाऊल
In reply to चांगले पाऊल by पिवळा डांबिस
मान्य
In reply to मान्य by क्लिंटन
सहमत
In reply to सहमत by हंस
पॅरलल करन्सी
In reply to पॅरलल करन्सी by क्लिंटन
स्वामीनॉमिक्स
In reply to स्वामीनॉमिक्स by नितिन थत्ते
लेख
प्रणवदा फॉर्म्युला?
In reply to प्रणवदा फॉर्म्युला? by मैत्र
अहो,
यात एक्/दोन अपत्यांची अट जरूर
In reply to यात एक्/दोन अपत्यांची अट जरूर by जयंत कुलकर्णी
+
विकासरावांचे चर्चाप्रस्ताव
In reply to विकासरावांचे चर्चाप्रस्ताव by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्या पटला
मागे बँकींग इन्क्लुजनची एक
In reply to मागे बँकींग इन्क्लुजनची एक by अन्या दातार
डोंबलाचे इन्क्लुजन!
चांगला चर्चाविषय.. वेळ गवसताच
महिनाभरातली दुसरी उत्तम चर्चा
थोडक्यात
लोक कदाचित आळशी नाही बनणार......!!!
अग्रलेख
In reply to अग्रलेख by ऋषिकेश
धन्यवाद!
धन्यवाद
- राजस्थानमधे जे पायलट स्केलवर असे प्रकल्प झाले ते फसले होते.
- सरकार अशी नगद गरीबांना देत असताना ती ज्या सबसिडीसंदर्भात दिली आहे, ती सबसिडी रद्द करण्यास तयार नाही. म्हणजे ज्याला अकाउंटींग/टॅक्सच्या भाषेत "डबल डिपिंग" म्हणतात तसेच काहीसे होत आहे.
- गरीब कोण हे ठरवण्याचा हक्क गावच्या सरपंचास दिला गेला आहे. एका व्यक्तीस असे अधिकार असणे हे घातक आहे. का, याची अनेक कारणे आहेत, ती येथे लिहीत बसण्याची गरज आहे असे वाटत नाही.
पण मग ज्याच्यामुळे "रोगापेक्षा इलाज भयंकर" असे ठरू शकते, असे म्हणत explore करूच नये असे वाटत नाही. पण त्यात पारदर्शकता कशी राहील आणि योजनेची समिक्षा ३ त ६ महीन्यांच्या कालावधीत करून बदल कसे करता येतील हे ठरवणे देखील महत्वाचे वाटते. पण जानेवारीत चालू केलेली योजना अगदी फसते आहे, असे जून-जुलै मधे ध्यानात आले, तरी सद्य सरकारला बदलणे शक्य होणार नाही, कारण त्यावेळेस निवडणुकांचे वारे वाहू लागलेले असतील आणि तसे करणे म्हणजे मतदारांना पाठ फिरवायला लागण्यासारखे आहे. इतकाच यात "catch22" मुद्दा आहे असे वाटते. बाकी सबसिडीसंदर्भातः गरीबांसाठी योजना असायला हव्यातच पण त्या कालानुरूप बदलणे देखील महत्वाचे आहे असे वाटते. तसेच त्या योजनांचे अंतिम ध्येय हे गरीबीतून लोकांना बाहेर काढणे, त्यांना सक्रीय करत स्वतःच्या पायावरच उभे रहायला लावणे हे ध्येय असणे महत्वाचे वाटते. हे काम एकाच वर्षात होणारे नाही की कायमस्वरूपी पूर्ण होणारे नाही. पण एखादी व्यक्ती अथवा कुटूंब जर अशा योजनांमुळे कायमस्वरूपी गरीब रहाणेच पसंद करू लागले तर ते या योजनेचे इतर सर्व व्यावहारीक अडचणींमुळे येणार्या अपयशांपेक्षा अधिक अपयश असेल असे वाटते.In reply to धन्यवाद by विकास
लोकसत्ता
In reply to लोकसत्ता by आळश्यांचा राजा
उत्तम मुद्दे.
In reply to उत्तम मुद्दे. by ऋषिकेश
सरपंचाला निर्णायक अधिकार
In reply to सरपंचाला निर्णायक अधिकार by श्री गावसेना प्रमुख
इथे जास्त धोका
In reply to इथे जास्त धोका by पैसा
धोका तर दोघही पद्धतीने
In reply to लोकसत्ता by आळश्यांचा राजा
-१
- साधारण २५,००० कुटूंबियांसाठी ही योजना चालू केली गेली.
- या कुटूंबांना सबसिडीने स्वस्त असलेल्या मालाऐवजी, त्या सबसिडी इतकी रक्कम मिळणार होती.
- या योजने अंतर्गत सरकारनेच असे ठरवले की या २५,००० कुटूंबांना रेशनकार्डावर जे काही रू. १५.२५ प्रतिलिटरने केरोसिन मिळत होते ते सबसिडी प्रत्यक्ष खात्यात जमा झाल्याने, बाजारभावाने म्हणजे, रू. ४९.१० प्रतिलीटरने घ्यावे लागेल.
- वास्तवात, केरोसिनचा भाव तो झाला, पण खात्यात दर तीन महीन्यांनी जमा होणे अपेक्षित असलेली सबसिडीच जमाच होत नव्हती.
- लोकांना या योजनेबाबत काहीच आक्षेप नाही, पण वास्तवात त्यातून पैसे जसे जमा होयला हवेत तसे होत नाहीत असे दिसले.
- बातमीत म्हणल्याप्रमाणे याचा, विशेष करून मागासवर्गीयांना तोटा होऊ लागला. कारण त्यांना महीन्यास रू. ४५ इतकेच केरोसिनला द्यावे लागत, ते अचानक वाढून तिप्पटीहून अधिक म्हणजे रू. १५० इतके झाले आणि ती नगद खात्यात जमा झाली नाहीच...
थोडक्यात जर हे २५,००० च्या गावास झाले तर पुढच्या प्रायोगिक प्रकल्पात लाखो कुटूंबे समाविष्ट झाल्यावर काय होईल आणि अजून पुढे सर्वत्र झाल्यावर काय होईल हा मुद्दा आहे. हा मुद्दा बरोबरच आहे आणि तो सगळ्यांनाच माहीत आहे. तरी देखील वर दिलेल्या राजस्थानमधील बातमीत तसे झालेले दिसले नाही हे स्वागतार्हच आहे. पण स्वामिनॉमिक्स मधे देखील ते (डबल सबसिडी) म्हणले आहे. मी अजून देखील कुठेतरी वाचले आहे (दुवा हुडकून देईन), आज तरी सरकार हे स्पष्ट बोलण्यास तयार नाही. कदाचीत एकदा परत सत्ता हातात आल्यावर तसे करेलही. त्या आधी करायचे असेल तर विरोधक आणि जनतेलाच त्यावरून जाब विचारावा लागेल. नाही विचारला तर, "आंधळ दळतयं" सारखीच अवस्था होणार. यात नवीन कदाचीत नसेलही, पण असे अधिकार एकाच व्यक्तीस/प्दास असणे आपल्यास योग्य वाटते का? जर नसले तर त्या पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेणे योग्य का आत्तापर्यत चालत आहे म्हणून पुढे देखील तसेच रेटा करत तेच चालवायचे? त्यात आत्ताच बिझनेस टूडे मध्ये वाचले की जयराम रमेश म्हणतात, जो पर्यंत बँकींग व्यवस्थ पूर्ण होत नाही (म्हणजे ती तशी नाही हे ते मान्य करत आहेत), तो पर्यंत अंगणवाडी आणि तत्सम प्रकारातील कर्मचार्यांकडून हे नगद पैसे गरजूंपर्यंत पोचवले जातील! म्हणजे काय परत मिडलमन आलाच, तेच प्रॉब्लेम. बरं हे सर्व निवडणूक होण्याआधीच्या वर्षात तसेच चालू रहाणार आणि पैसा कुठल्या गरजूंच्या खिशात पडणार हा प्रश्नच आहे.In reply to -१ by विकास
आर्ग्युमेंट
चलनवाढीचे काय?
काही प्रश्न