कर्माचरण
राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥धृ॥
जनांसंगे गेलो देवा तिर्थ यात्रेला ।
दगडच्या मुर्तिमध्ये तुला शोधियेला।
नाही भेटलास तिथं झालो मी रे दु:खी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥१॥
उपवास केले नाना नवस सायास ।
लागला ना कधी देवा तुझा निजध्यास।
मंदिरात जाऊनिया नाही झालो सुखी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥२॥
ऐकले मी कीर्तन कथा प्रवचन ।
आवरेना तरी माझे चंचळ मन ।
केले अवगुण ते ही चातुर्याने झाकी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥३॥
वाचले ग्रंथ पोथ्या केले पारायण ।
नाही कळ्ले तरी कोठे आहे नारायण।
भक्तिच्या नावावर केली फेका-फेकी ।
आयुष्य हे निघोनिया गेले
सन्मान
लोक विचारती आम्हा, का दर्द आमच्या शायरीत आहे
अहो व्यथांना सन्मानिण्याची, हीच आमची रीत आहे
वाटते दु:खासही कधी,दिसावे सुंदर आपणही
लेखणीत म्हणून ते आमच्या, यथेच्छ शृंगार करीत आहे
ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही
ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे
कधी करतो सलगी, बोचर्या जुन्या क्षणांशी
वागणे जरासे आमचे, आमच्याच विपरीत आहे
घेतला दगाही काही, ऐश्या सफाईने आम्ही
दगाबाज अजून आमची, वाहवा करीत आहे
काव्यरस
शोध
काही शे वर्षांपूर्वी कोणीतरी एक शोध लावला
म्हणे चंद्र हा सूर्याचे तेज वाहतो
नाही असेल खरे, सिद्धही झाले होते म्हणे
.
.
बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने
कधी तुला पहिलेच नसेल
पहिले असते तर
.
.
नको जाऊ दे
झाले ते बरेच झाले
.
.
काय तर म्हणे चंद्र सूर्याचे तेज वाहतो
असेल असेल :)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(खुप दिवसांपूर्वी लिहीलेली कविता)
हवं असं कुणीतरी
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर असो तुझा साथ
काटेरी वाटेवर विश्वासाचा घट्ट हात
शोधात अशा मी प्रेमा तुझ्या
ओवाळून टाकीन जीव तुजवर , होशील का तू माझा सख्या ?
ना कधी सोडून जाईन
ना अंतर तुला मी देईन
वचन हे माझे नाहीत नुस्तेच शब्द ,
नाही हे खोटे, ना हे म्रुगजळ,
तुझे आश्रू सामावण्यात - सदैव माझी ओंजळ
एकट्याने जगणे नाही हे इतके सोपे
एकमेकांवर अवलंबून जगण्यात देखील वेगळीच मजा असते
" काळजी करू नकोस , आहे मी " असे एकच प्रेरणादायी वाक्य
अनेक अडचणींना सामोरे जाणे होते ज्याने शक्य
पटेल तुला हे नक्की कधीतरी
तेव्हा तू ही म्हणशील , हवं असं कुणीतरी
-- प्रिया
असुर कोण ? (२)
असुर कोण ? (२)
भारतात जी परिस्थिती होती ती युरोप, आफ़्रिका, मध्य आशिया, चिन सगळीकडे सारखीच होती. आर्य व असुर बरोबर रहात होते. त्यांच्या देवता, आचारविचार, आराधना सगले जवळजवळ सारखेच होते. त्यातील काही आर्य-असुर भारताकडे गेले. काही तेथेच राहिले. चार-पाचशे वर्षांनी भारतातले काही अनार्य परत पश्चिमेकडे परत फिरले. पण आता त्यांना आढळले की स्थानिक असुरांमध्ये बराच फरक पडला आहे. आता "इंद्र" ही प्रमुख देवता नाही. आता तेथे "विरोचन" प्रमुख देवता आहे. अजुनही दोघे वरुण, सूर्य, अग्नी यांना पुजत होते. अहुरमझ्दा (महान असुर) हाच पुढे असुरांचा इन्द्र झाला. म्हणजे देव-असुर यांच्यात फरक पडावयास सुरवात झाली होती.
मग पुन्हा सामसूम...!
अगदी निवांत, निर्मनुष्य ठिकाण..निवांत पहुडलेल्या रेल्वे लाईनी... त्यांचा एकमेकींशीही काही संवाद नाही.. दिसभर बोलणार तरी काय एक-दुसरीशी आणि किती?
एकाकीपणा.. अगदी तासंतास...!
आणि मग अचानक एक उत्साहानं भरलेलं धावतं विश्व येतं..
विलक्षण उत्साह.. विलक्षण गती.. !
नानविध लोकांनी भरलेलं, गजबजलेलं एक धावतं विश्व.. कोण आहेत ही नानविध लोकं?
ती द्योतक आहेत..
मध्य वयातील वादळ -पुढे
कर्करोग स्तनांचा
मध्य वयातील वादळ
मध्यवयातील वादळ- पुढे
-----------------
काही गोष्टीत आपल्या मित्रांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन आपण पुढे जात आहोत.
चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते.
पर्शियन, अरबी, फारसी इ भाषा आणि प्राचीन लिप्या
पारशांचा धर्मग्रंथ अवेस्तात असुरांना अहुर असे म्हणलेय. पर्शियन भाषेत 'स' नसल्याने त्याचा उच्चार 'ह' असा होतो उदा. सप्तसिंधू चा उल्लेख हप्तहिंदू वगैरे. आणि त्यात देवांना शत्रू म्हणून दाखवलेय असे कुठेतरी वाचले होते.
असिरीया हा पर्शियन साम्राज्यातलाच प्रदेश.
असुर कोण (१) या धाग्यावरील भाषा आणि लिपीच्या संदर्भातील प्रतिसाद या धाग्यात हलविले आहेत. - संपादक मंडळ
कार्यकर्ते येती घरा...
लेखाला शीर्षक काय द्यावं हा प्रश्न अनेकदा आ वासून उभा रहातो. हा लेख लिहिताना देखील त्याने तेच केलं. मग त्याने उघडलेल्या मोठ्ठ्या तोंडात 'माझ्या तोंडात कचरा टाका' असं म्हणत चोच वासून बागांमध्ये उभे राहिलेल्या पेंग्विनांच्या पुतळारूपी कचरापेटीच्या आजूबाजूला जितक्या सहजतेने आपण कचरा टाकतो तशी काही नावं भिरकावून बघितली. 'बिपिन कार्यकर्तेंनी अमेरिका प्रवास केला हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न', 'आंगतुक पाव्हण्याचं मोठ्या मनाने आदरातिथ्य करून अमेरिकेत जपलेली भारतीय संस्कृती', 'कार्यकर्तेंचं राजपण, आजपण, उद्यापण' वगैरे अनेक नावं लिहिली.
मिसळपाव